शिराळा तालुक्यात 19.2 मि. मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 02:54 PM2020-07-08T14:54:24+5:302020-07-08T14:56:59+5:30

सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 19.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

19.2 min in Shirala taluka. I Rainfall record | शिराळा तालुक्यात 19.2 मि. मी. पावसाची नोंद

शिराळा तालुक्यात 19.2 मि. मी. पावसाची नोंद

Next
ठळक मुद्देशिराळा तालुक्यात 19.2 मि. मी. पावसाची नोंद24 तासात सरासरी 7.1 मि. मी. पावसाची नोंद

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 19.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये 

मिरज 3.1 (135.4), तासगाव 3.4 (143.3), कवठेमहांकाळ 2.3 (209.9), वाळवा-इस्लामपूर 9.8 (183.1), शिराळा 19.2 (406.3), कडेगाव 16.8 (177.2), पलूस 6.5 (133.2), खानापूर-विटा 6 (247.6), आटपाडी 0.3 (153.6), जत 0.8 (80.6)


वारणा धरणात 16.70 टी.एम.सी. पाणीसाठा

 जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 16.70 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

 शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 37.28 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 5.90 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 3.31 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 5.66 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 2.03 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 12.76 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 3.92 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 76.25 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

 धरणातून सोडलेला विसर्ग क्युसेक्स मध्ये 

कोयना 2111, वारणा 815, कण्हेर 24, राधानगरी 1100, कासारी 250, उरमोडी 500, अलमट्टी 1130.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी

कृष्णा पूल कराड 8 (45), आयर्विन पूल सांगली 9 (40) व अंकली पूल हरिपूर 10.10 (45.11).

Web Title: 19.2 min in Shirala taluka. I Rainfall record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.