What does a women director put when she writes her own story? | दिग्दर्शिका जेव्हा स्वत:च चित्रपटाची कथा लिहितात तेव्हा त्यातून त्या काय सांगतात?
दिग्दर्शिका जेव्हा स्वत:च चित्रपटाची कथा लिहितात तेव्हा त्यातून त्या काय सांगतात?

 -मनस्विनी प्रभुणो-नायक


बायकांकडे गोष्ट सांगण्याची कला असते आणि त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप काही असतं. अगदी आपल्या आई, मावशी, काकू, आजीचं उदाहरण बघितलं तरी खात्नी पटू शकते. असं म्हणतात की, छोटय़ाश्या कथेला कसं रंगवून सांगावं हे बायकांकडून शिकायला हवं. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मला या गोष्टीचा प्रत्यय आला. 
पन्नास दिग्दर्शिका आणि पन्नास चित्रपट यांची यादी हातात येताच या चित्रपटांबद्दल आणि त्याच्या दिग्दर्शिकांबद्दल अधिक माहिती गोळा करीत असताना लक्षात आलं की, यातल्या जवळजवळ सगळ्याच दिग्दर्शिकांनी आपल्या चित्रपटाची कथा स्वत: लिहिली आहे. 
कथेस कारण..
खरं तर चित्रपटाची कथा लिहायला कशी सुचली त्यामागची प्रत्येकीची कथा वेगळी आणि खूप काही शिकविणारी. ‘आधी सुचलेल्या छोटय़ाश्या कथा बीजाला छान रुजू दिलं मग त्याची सविस्तर गोष्ट लिहून काढली की, चित्रित करायची सगळी दृश्यं डोळ्यासमोर जशीच्या तशी तयार होतात. हा आपल्या चित्रपटाची आपणच कथा-पटकथा लिहिण्याचा फायदा  असतो’ असं  ‘अँटिगनी’ या चित्नपटाची दिग्दर्शिका सोफी डेरास्पेशी बोलताना तिनं सांगितलं. इफ्फीमध्ये  ‘अँटिगनी  ज्या दिवशी दाखवला गेला त्यादिवशी सोफी उपस्थित होती. याच काळात चित्रपटासाठी कथा- पटकथा लिहिणा:या लेखकांबरोबर एक परिसंवाद आयोजित केला होता. त्या परिसंवादात मेघना गुलजार, पटकथा लेखक जुही चतुर्वेदी, पूजा लढा सुरती, मधुरा पालित आणि स्तंभलेखक सुमेधा वर्मा ओझा यांचा सहभाग होता. मेघना गुलजार या दिग्दर्शिका असल्या तरी त्यांच्या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या आहेत. तलवार आणि त्यापाठोपाठ राजी चित्रपटाची निर्मिती केलेल्या मेघना गुलजार यांना ऐकण्याची सर्वानाच उत्सुकता होती.  ‘जेव्हा एखादा विषय डोक्यातून जात नाही, त्या विषयावर आपण चित्रपट काढू या असं मनातून वाटायला लागतं तेव्हा मी बाकीच्या विषयांपासून अलिप्त व्हायला लागते. त्या काळात वेगळं काही सुचत नाही. पण मला अजून कोणाशी तरी बोलून, चर्चा करून लिहायला आवडतं. त्यामुळे दुस:या व्यक्तीच्या सहकार्यानं डोक्यात असणा-या गोष्टीला आणखी कोंब फुटू लागतात. आजूबाजूला घडणा:या  घटना मला प्रेरित करत असतात. आपल्या लेखनामागची प्रक्रिया सांगताना मेघना गुलजार यांनी लिखाणाबाबत आळशी आहोत हेदेखील प्रांजळपणो कबूल केलं. 
वास्तवाची गोष्ट
इफ्फीमधील यावर्षीचे बहुसंख्य चित्रपट  नातेसंबंध  या सूत्रात गुंफलेले होते. त्यात आई-मुलगी, वडील-मुलगा, सावत्र  आई अशा नात्यांना वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपापल्या परीनं या सा-या दिग्दर्शिकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. नातेसंबंध हा गुळगुळीत झालेला विषय आहे असं वरवर जरी वाटलं तरी या सा-या दिग्दर्शिकांनी नात्यातील वेगळी बाजू शोधण्याचा आणि ती निराळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न आपापल्या चित्रपटाच्या माध्यमातून केलाय. वास्तवात घडणा-या घटना या सा-याजणींना चित्रपट निर्मिती करायला प्रेरित करतात. या पन्नास दिग्दर्शिकांमध्ये वास्तवातील घटनांवर आधारित चित्नपट काढणा-या  अनेकजणी होत्या. पेरू या छोटय़ाश्या देशातील मेलीना लिओनी हिचा ‘सॉँग विदाउट अ नेम’ हा चित्रपट तिच्या संपादक वडिलांच्या एका घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट मेलिनानं आपल्या वडिलांना जे पेरूमधील ‘ला रिपब्लिक’  वृत्तपत्राचे संस्थापक संपादक होते त्यांना समर्पित केलाय. 1980 च्या काळात पेरूमध्ये मोठय़ा प्रमाणावर लहान मुलांची तस्करी व्हायची आणि या मुलांना युरोप- अमेरिकेत विकलं जायचं. मेलिनाच्या वडिलांनी त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवला होता. 1980सालच्या यासंदर्भातील अनेक घटना मेलिनाच्या डोक्यातून गेल्या नाही. त्या सगळ्या घटना एका कथासूत्रात गुंफून ‘सॉँग विदाउट अ नेम’ या चित्रपटाची निर्मिती झाली.
चिनी मातीतले नाते आणि संघर्ष
नात्यातील भावनिक गुंतागुंत, सामाजिक संवेदनशीलता, नात्यातील संघर्ष, राजकीय परिस्थितीवरील जळजळीत भाष्य दिग्दर्शिकांच्या चित्रपटांच्या माध्यमातून अनुभवायला मिळालं. यावर्षी पाच सहा चिनी चित्रपटांचा इफ्फीमध्ये समावेश होता ज्यात ऑलिव्हर स्यू-क्यूएन चान या युवा दिग्दर्शिकेचा    ‘स्टील ह्युमन’ हा चित्रपट बघायला मिळाला.या चित्नपटातून ऑलिव्हर स्यू-क्यूएन चाननं तिच्या युवा पिढीलासतावणारे, जाणवणारे प्रश्न मांडले आहेत. हॉँगकॉँग शहराच्या मागणीमुळे फिलिपिन्समधून अनेक तरुणी घरकामासाठी हॉँगकॉँगमध्ये येतात. या फिलिपिनो घरकामगार मुलींचं अस्थिर जीवन, कुटुंबाची असलेली जबाबदारी, हातातून निसटून जाणारं लग्नाचं वय अशा सा-या गोष्टी डोळ्यादेखत घडत असताना ऑलिव्हर त्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हती. अर्धागवायू झालेल्या पन्नाशी उलटलेला रुग्ण आणि त्याची देखभाल करायला येणा-या  तरुणीची कथा म्हणजे हा चित्रपट. त्याकाळात रक्ताची नाती जवळ हवीत, त्याकाळात पूर्णपणो परावलंबी बनलेल्या नायकाला आधार देणारी फिलिपिनो मुलगी आणि त्यांचा व्यावहारिक नात्यापासून सुरू झालेला प्रवास ऑलिव्हरनं संवेदनशील पद्धतीनं दाखविला आहे. 
किशोरवयातलं अवघड पालकत्व 
आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन मिळविणा-या  सेल्मा विल्हुनेन आणि किर्सिक्का सारी या दिग्दर्शिका-पटकथाकार द्वयींच्या  ‘स्टुपिड यंग हार्ट’ या चित्रपटाचा इफ्फीत समावेश होता. चित्रपटाच्या नावानंच लक्ष वेधून घेतलं होतं. नात्यांमधला एक वेगळाच पैलू या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळाला. किशोरवयातलं पालकत्व असाच फक्त विषय नव्हता तर त्या निमित्तानं किशोरवयीन मुलांची घुसमट, अमेरिकेतील आर्थिकदृष्टय़ा अस्थिर असलेल्या वर्गाचं चित्रण, अर्धवट वयातील मुलांना हाताशी धरून हिंसा, द्वेष पसरवण्याचे कृत्य करणारे वेगवेगळे गट आणि या गटांना बळी पडणारे तरुण अशा अनेक गोष्टींच्या साहाय्यानं कथानक पुढे जातं.  अमेरिकेत किशोरी मातांचा प्रश्न हा मोठा असला तरी त्या वयात आनंदानं पालकत्व निभावणारी अनेक किशोरवयीन जोडपी अमेरिकेत बघायला मिळतात. चित्रपटाची लेखिका आणि पटकथाकार किर्सिक्का सारी हिनं या चित्रपटाचा विषय कसा सुचला यासंबंधी एक गोष्ट सांगितली. किर्सिक्काची मदतनीस जी चाळीशीच्या जवळपास पोहोचलीय आणि तिचा नवरा ज्यानं वयाची चाळिशी पार केलीय, तो अद्यापही आपल्याला मूल हवं की नको अशा संभ्रमावस्थेत आहे. या दोघांना एकदा अगदी किशोरवयातील कोवळा मुलगा हॉस्पिटलमध्ये भेटला. त्याची गर्लफ्रेण्ड त्यावेळी बाळंत होत होती. इतक्या लहान वयातल्या मुलांना पालकत्व कसं जमणार ? जबाबदारीची काही जाणीव तरी आहे का यांना? असे अनेक प्रश्न त्यांना पाहताच मनात उभे राहिले. पण एकीकडे चाळिशीतला पुरुष जो अजूनही पालकत्व स्वीकारायला घाबरतोय आणि दुसरीकडे ती कोवळी मुलं ज्यांना पालकत्व माहीत नसतानाही मोठय़ा आनंदानं ते त्याला सामोरं जात आहेत अशी परिस्थिती होती. आपल्या मदतनीसकडून ही घटना ऐकताना किर्सिक्काला ‘स्टुपिड यंग हार्ट’ ची कथा सुचली. लेनी आणि किरा या पात्रांच्या माध्यमातून किशोरवयीन पालकांच्या अस्थिरतेचा सामना ब-याच वेगवेगळ्या मार्गानं घेऊन जातो.  अस्पर्शित अशा अनेक पैलूंना स्पर्श करण्याची ऊर्मी या सा-या दिग्दर्शिकांच्या चित्रपटांमधून बघायला मिळाली. वरवर साधी सोपी वाटणारी नाती अंतरंगात गुंतागुंतीची-जटिल अशी वाटू लागतात. यातला प्रत्येक चित्रपट हा एखाद्या कादंबरीसारखा होता. त्यातील पात्रं, प्रत्येक पात्रांचं संयोजन, परस्पर संबंध कथानकाशी गुंतवून ठेवणारे होतं. जागतिक पटावरील या सा-याजणींच्या कलाकृतींनीं छान बौद्धिक खुराक पुरवला.

(लेखिका पणजीस्थित मुक्त पत्रकार आहेत.)

nayakmanaswini21@gmail.com 

 

 

Web Title: What does a women director put when she writes her own story?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.