Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही

आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही

Proper Method of Eating Mango: दररोज आंबा खाऊनही वजन (weight) आणि शरीरातील उष्णता (heat) दोन्हीही कंट्रोलमध्ये राहू शकतं... त्यासाठीच या काही खास टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 02:28 PM2022-05-14T14:28:35+5:302022-05-14T14:29:46+5:30

Proper Method of Eating Mango: दररोज आंबा खाऊनही वजन (weight) आणि शरीरातील उष्णता (heat) दोन्हीही कंट्रोलमध्ये राहू शकतं... त्यासाठीच या काही खास टिप्स

Worried about weight gain and heat problem by eating mango? 7 special tips, weight and heat both will get controlled | आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही

आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही

Highlightsआंब्यांचा मनसोक्त आस्वाद घेता यावा आणि वजन- उष्णता दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये रहावे, यासाठी या काही टिप्स.

आंबा आणि आमरस याशिवाय उन्हाळ्याची मजा काही पुर्ण होत नाही. दररोज एखादा तरी आंबा किंवा मग जेवणात एखादी लहानशी वाटी भरून आमरस हवाच, असं अनेक जणांना वाटतं.. काही जण मनसोक्त आंबा खातात. तरीही त्यांचं ना वजन वाढतं ना शरीरातील उष्णता वाढते. त्याउलट काही जणांना मात्र आंबे खाऊन लगेचच मुठभर मास चढतं.. त्यामुळे मग ते खूप आवडत असूनही आंबा खाणं सोडून देतात किंवा मग आंबे खाणं खूपच कमी करून टाकतात. म्हणूनच तर आंब्यांचा मनसोक्त आस्वाद घेता यावा आणि वजन- उष्णता दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये रहावे, यासाठी या काही टिप्स. (weight gain due to mango?)

 

आंबा खाऊन उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी...
(Increase in body heat by eating mango)
- आंबे खाण्याची आपल्या आईची, आजीची पद्धत थोडी आठवून पाहिली तर एक गोष्ट लक्षात येईल की त्या नेहमी आंबा खाण्यापुर्वी किमान अर्धा तास तरी पाण्यात भिजत ठेवायच्या. त्यानंतर तो थंड झाला की खायच्या. हे करायला आपण विसरतो आणि त्यामुळेच मग आंब्याची उष्णता आपल्याला त्रासदायक ठरते. (why to keep mango in water?)
- आंबा हे फळ उष्ण प्रकृतीचे आहे. त्यामुळे त्यात असणारी उष्णता कमी करण्यासाठी ते काही काळ पाण्यात भिजवत ठेवणे गरजेचे आहे. अर्धा तास पाण्यात भिजवून नंतर पुन्हा १० ते १५ मिनिटे बाहेर तसेच राहू द्या आणि त्यानंतर आंबे खा. या प्रकियेमध्ये आंब्यामध्ये असणारी उष्णता नैसर्गिक पद्धतीने कमी होत जाते आणि त्यामुळे बाधत नाही. 
- आंबा कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये.
- उष्णता वाढेल अशी भीती असल्यास आंबा तसाच खाण्यापेक्षा त्याचा रस करून किंवा शेक करून प्यावा.

 

आंबा खाऊन वजन वाढू नये म्हणून 
- एका मध्यम आकाराच्या आंब्यामध्ये जवळपास १३० ते १५० कॅलरीज असतात. त्यामुळे वजन वाढीची भीती असल्यास दिवसातून एकच आंबा खावा.
- जेवल्यानंतर आंबा खाणे टाळावे. त्याऐवजी जेवणाच्या अर्धा- एक तास आधी आंबा खाल्ल्यास हरकत नाही.
- रात्रीच्या वेळी आंबा, आमरस खाणे टाळा. नाश्ता, दुपारचे जेवण ते रात्रीचे जेवण यामधला काळ किंवा मग नाश्ता ते दुपारचे जेवण यामधला वेळ यावेळी आंबा खा.

 

Web Title: Worried about weight gain and heat problem by eating mango? 7 special tips, weight and heat both will get controlled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.