Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वरुण धवनने शेअर केला सिक्रेट फिटनेस फॉर्म्युला, आकर्षक पर्सनॅलिटीसाठी हे रुटीन फॉलो करा..

वरुण धवनने शेअर केला सिक्रेट फिटनेस फॉर्म्युला, आकर्षक पर्सनॅलिटीसाठी हे रुटीन फॉलो करा..

Weight loss diet in Marathi : वरुणने करिअरच्या सुरूवातीपासूनच त्याचे एब्स, बायसेप्स आणि टोन लेग्समुळे लाखो चाहत्यांची मने जिंकली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 03:53 PM2021-06-02T15:53:22+5:302021-06-02T17:24:53+5:30

Weight loss diet in Marathi : वरुणने करिअरच्या सुरूवातीपासूनच त्याचे एब्स, बायसेप्स आणि टोन लेग्समुळे लाखो चाहत्यांची मने जिंकली होती.

Weight loss diet : Varun dhawan reveals his fitness secret and diet plan you can also follow by these tips for weight loss | वरुण धवनने शेअर केला सिक्रेट फिटनेस फॉर्म्युला, आकर्षक पर्सनॅलिटीसाठी हे रुटीन फॉलो करा..

वरुण धवनने शेअर केला सिक्रेट फिटनेस फॉर्म्युला, आकर्षक पर्सनॅलिटीसाठी हे रुटीन फॉलो करा..

वाह, कसला भारी दिसतो ना, त्याचे मसल्स किती अक्ट्रॅक्टिव्ह आहेत...! फिटनेस मॉडेल किंवा  डॅशिंग अभिनेत्याला  पाहिल्यानंतर सगळ्यात आधी हाच विचार मनात येतो. पण यासाठी त्यांनाही तितकीच मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठे  चांगली शरीरयष्टी मिळवता येते. बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आपल्या अभिनयामुळेच नाही तर आपल्या फिटनेसमुळे लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. चाहत्यांच्या आग्रहास्तव त्यानं आपल्या फिटनेसचं सिक्रेट शेअर केलं आहे. वरुणने करिअरच्या सुरूवातीपासूनच त्याचे एब्स, बायसेप्स आणि टोन लेग्समुळे लाखो चाहत्यांची मने जिंकली होती.

तुम्हालाही त्यांच्याइतकंच तंदुरुस्त, फिट राहायचं असेल तर तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. अलीकडेच, वरुणने आपले फिटनेस गुपित उघड केले आहे, ज्याचे अनुसरण करून आपणही शरीर आकर्षक ठेवू शकता. चला, जाणून घ्या वरुण धवनच्या फिटनेसचे रहस्य काय आहे. 

चाहत्यांच्या आग्रहास्तव वरूणनं सांगितलं सीक्रेट

सेलिब्रेटींजवळ प्रत्यक्षात प्रशिक्षकांची फौज असते ज्यांच्या सल्ल्यानुसार ते वागतात. पण शरीर चांगलं ठेवण्यासाठी त्यांना स्वतःहून खूप मेहनत घ्यावी लागते. यादरम्यान स्ट्रिक्ट डाएट फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. वरूण धवनला त्याच्या डाएट प्लॅनबद्दल विचारल्यास त्यानं सांगितलं की, १४ ते १६ तासांचे इंटरमिटेंट फास्टिंग फॉलो करतो.

अनेक अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार वजन कमी करण्यासाठी  तुम्हाला इंटरमिटेंट फास्टींगचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तसंच सगळयात जास्त परिणामकारक सुद्धा आहे. यासाठी महिलांनी आपलं एनर्जी इनटेक ५०० कॅलरीज आणि पुरूषांनी ६०० कॅलरीजपर्यंत  घ्यायला हवेत.

उदाहरणार्थ, जर कोणी सोमवारी दुपारचे जेवण घेत असेल तर तो मंगळवारी उपवास करू शकतो. आपण आठवड्यातून अनेक वेळा हा प्रकार करू शकता. वजन कमी करण्यासाठी हा उपवास करणे हा एक उत्तम पर्याय आहे आणि यामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होणार नाही. कॉफी, चहा, सफरचंद, सफरचंदाचा रस अशी पेयं अधून मधून घेतो, असं तो सांगतो. वरूणच्या आधीही इतर सेलिब्रिटींनी या प्रकराच्या डाएटचा अवलंब केला आहे. 

वरुणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सांगितले की, तो 14 ते 16 तास उपवास करतो आणि उर्वरित 10 ते 8 तासांत कॅलरीज घेतो. अभिनेता पुढे म्हणाला, ''मी दिवसाची सुरुवात कॉफीच्या कपसह करतो. यानंतर, मी न्याहारीसाठी अंडी, एग्स व्हाईट आणि ओट्स खातो. दुपारच्या जेवणात मला चिकन आणि हिरव्या भाज्या खायला आवडतात. मी दुपारच्या जेवणासाठी मखाणे खातो. यात प्रोटिन्स मोठ्या प्रमाणावर असून कमीत कमी कॅलरीज असतात.''

घरचं जेवण आरोग्यासाठी चांगलं ..

वरुणला घरी शिजवलेले जेवण आवडतं. तो नेहमीच साधं  जेवण पसंत करतो. चव बदलण्यासाठी काही पदार्थांची अदलाबदला करतो. मागील मुलाखतीत त्याने सांगितले होते की आईने शिजवलेले जेवण त्याला आवडते.  वरुण सांगतो की, तुमची आई जे सांगते ते खा. ताक, तूप, पराठे असे पौष्टीक पदार्थ.  जर तुम्हाला फिटनेस कायम ठेवायचा असेल तर रात्री फार जास्त कार्ब खाऊ नयेत.

वरुण पुढे म्हणाला,  '''हा माझा तंदुरुस्तीचा मंत्र आहे जो मी काटेकोरपणे पाळतो''  माझा आहार प्रामुख्याने प्रथिनांनी समृध्द असतो आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. मासपेशी तयार करण्यासाठी आणि खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यासाठी प्रथिनेयुक्त आहार आवश्यक आहे.''

Web Title: Weight loss diet : Varun dhawan reveals his fitness secret and diet plan you can also follow by these tips for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.