Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Home Remedies For Weight Loss?: वजन कमी करायचं, व्यायाम करायला वेळ नाही? आहारात करा छोटा बदल, 5 पर्याय- वजन कमी

Home Remedies For Weight Loss?: वजन कमी करायचं, व्यायाम करायला वेळ नाही? आहारात करा छोटा बदल, 5 पर्याय- वजन कमी

Solutions For Weight Loss: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या आहारात हा छोटा बदल करून बघा. ५ सोपे, घरगुती उपाय आहेत. बघा यापैकी तुम्हाला कोणता जमतोय ते... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 07:50 PM2022-04-28T19:50:15+5:302022-04-28T19:50:54+5:30

Solutions For Weight Loss: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या आहारात हा छोटा बदल करून बघा. ५ सोपे, घरगुती उपाय आहेत. बघा यापैकी तुम्हाला कोणता जमतोय ते... 

Home Remedies For Weight Loss ?: Trying for weight loss? 5 simple solutions, definitely helps you to control weight | Home Remedies For Weight Loss?: वजन कमी करायचं, व्यायाम करायला वेळ नाही? आहारात करा छोटा बदल, 5 पर्याय- वजन कमी

Home Remedies For Weight Loss?: वजन कमी करायचं, व्यायाम करायला वेळ नाही? आहारात करा छोटा बदल, 5 पर्याय- वजन कमी

Highlightsयापैकी जो उपाय तुम्हाला आवडेल किंवा करायला सोपा वाटेल, तो पुढचे काही आठवडे नियमित करा. वजनात चांगला फरक पडलेला जाणवेल. 

वाढत्या वजनाला कंट्रोलमध्ये (how to control weight) आणणं हा अनेकांपुढचा यक्ष प्रश्न. थोडंसं खाण्यात हुकलं की लगेच वजनाचा काटा झरझर उजवीकडे जाऊ लागतो. हा काटा आहे त्याच ठिकाणी ठेवणं हे खरंतर अवघड काम. हे अवघड काम सोपं करण्यासाठी हे बघा काही सोपे उपाय. अर्थात हे उपाय चालू ठेवताना तुम्हाला तुमचं नियमित डाएट (diet and exercise) आणि जो कोणता व्यायाम असेल तो तर नियमित करायचाच आहे. पण त्यासोबतच आणखी एक ॲडिशन म्हणून हे काही उपाय करून बघायला हरकत नाही.

 

हे उपाय इन्स्टाग्रामच्या hairskinfitnesss या पेजवर शेअर करण्यात आले आहेत. उपाय काही अवघड नाहीत. कदाचित यातले काही उपाय तुम्हाला माहितीही असतील. हे सगळे उपाय एकदम करू नका. यापैकी जो उपाय तुम्हाला आवडेल किंवा करायला सोपा वाटेल, तो पुढचे काही आठवडे नियमित करा. वजनात चांगला फरक पडलेला जाणवेल. 

 

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय (home remedies for weight loss)
१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे लिंबू- मध आणि पाणी. हा उपाय करण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या. पाणी जास्त गरम असू नये. या पाण्यात अर्धे लिंबू पिळून टाका. त्यात १ टी स्पून मध घाला. मिश्रण चांगले हलवा आणि प्या. सकाळी रिकाम्या पोटी हा उपाय करावा. तसेच दुपारचे जेवण ते रात्रीचे जेवण या गॅपमध्येही करावा. 
२. एक कप गरम पाण्यात एक टीस्पून ग्रीन टी टाका. ५ ते ७ मिनिटे त्यात ठेवल्यानंतर काढून घ्या. त्यानंतर लगेचच हे पाणी प्या. साध्या चहाऐवजी हे पेय घेत चला. दिवसातून दोन ते तीन वेळा घेतलं तरी हरकत नाही.


३. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा टीस्पून दालचिनी पावडर टाका. त्यात अर्धे लिंबू पिळा आणि अर्धा चमचा मध टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवा आणि प्या. दिवसातून एकदाच हा उपाय करा. तो ही सकाळी रिकाम्या पोटी केल्यास अधिक चांगला परिणाम दिसून येईल. 
४. एका भांड्यात एक कप पाणी घ्या. त्यात एक टीस्पून किसलेलं अद्रक टाका. हे मिश्रण चांगलं उकळून घ्या. गाळून घेतल्यानंतर त्यात एक टीस्पून लिंबाचा रस टाका आणि गरम गरम हा काढा पिऊन घ्या. दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाआधी हा काढा प्या.
५. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची ७ ते ८ पाने चावून खा. 
 

Web Title: Home Remedies For Weight Loss ?: Trying for weight loss? 5 simple solutions, definitely helps you to control weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.