हिवाळ्यात घशाची खवखव दूर करणारे ७ पारंपरिक उपाय... 

हिवाळयात कडाक्याच्या थंडीने घशाची खवखव सतावते, अशावेळी करता येतील असे घरगुती उपाय...

हिवाळ्यात घसा खवखवणे, घसा दुखणे किंवा कोरडा खोकला यांसारख्या समस्या त्रास देतात.

स्वयंपाकघरात अनेक पारंपरिक उपाय दडलेले आहेत, जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय घशातील खवखव मुळापासून दूर करू शकतात.

एक ग्लास कोमट पाण्यात १/२ चमचा मीठ मिसळून दिवसातून ३ ते ४ वेळा गुळण्या करा. घशातील सूज कमी होते आणि बॅक्टेरियाच नाश होतो.

गरम दुधात चिमूटभर हळद आणि थोडे मध मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्या. हळदीतील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म घशातील वेदना आणि खवखव कमी करतात.

आल्याचा छोटा तुकडा किसून पाण्यात उकळा. गाळून त्यात १ चमचा मध मिसळून प्या. आले कफ कमी करते, तर मध घशाला आराम देतो.

तुळशीची ५ ते ६ पाने आणि २ ते ३ लवंगा चहात किंवा गरम पाण्यात उकळून प्या. तुळस रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि लवंग घसा सुन्न करून वेदना कमी करते.

गरम पाण्यात ओवा टाकून वाफ घ्या. यामुळे श्वासोच्छ्वास मोकळा होतो आणि घशातील कोरडेपणा कमी होतो.

ज्येष्ठमधाचा छोटा तुकडा तोंडात ठेवून हळूहळू चघळावा. यात नैसर्गिकरीत्या घशाला आराम देणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे घसादुखी आणि कोरडा खोकला थांबतो.

कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि १ चमचा मध मिसळून प्या. लिंबूमधील व्हिटॅमिन-सी ज्यामुळे इम्युनिटी वाढते आणि मध घशातील जळजळ शांत करते.

Click Here