डाळिंब हे निश्चितच पौष्टिक आहे. पण काही लोकांसाठी मात्र ते त्रासदायक ठरू शकतं.
डाळिंबामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट, लोह, व्हिटॅमिन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
ज्या लोकांचं लोह कमी असतं त्यांना तर नियमितपणे डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो.
पण असं असलं तरी काही लोकांनी मात्र डाळिंब खाणं टाळायला हवं.
ज्या लोकांना ऋतू बदलला की त्रास होतो, त्या लोकांनी ऋतू बदलण्याच्या काळात डाळिंब खाऊ नये.
डाळिंब हे थंड फळ आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, कफ असा त्रास असणाऱ्यांनी डाळिंब खाणं टाळावं.
ज्यांना अपचनाचा त्रास होतो त्यांनीही डाळिंब खाऊ नये. कारण त्यामुळे पोटात गॅसेस होणे, पोट जड होणे असा त्रास होतो.