दालचिनीचा काढा पिण्याचे ६ फायदे 

दिवसाची सुरुवात दालचिनीचा चहा किंवा काढा पिऊन केल्याने काय फायदे होतात ते पाहूया 

चहा किंवा कॉफीऐवजी दालचिनीचा काढा पिऊन जर तुम्ही दिवसाची सुरुवात केली तर त्याचा तब्येतीवर खूप चांगला परिणाम दिसून येतो.

दालचिनीचा काढा प्यायल्याने चयापचय क्रिया अधिक चांगली होते आणि शरीर वेगाने कॅलरीज बर्न करते. त्यामुळे वेटलॉस होण्यास मदत होते. 

दालचिनीमुळे शरीरातली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. 

दालचिनीचा काढा प्यायल्याने पचनाच्याही अनेक तक्रारी दूर होतात. गॅसेस, ब्लोटिंग, ऍसिडिटी असे त्रास कमी होतात. 

दालचिनीमध्ये अँटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरावरची सूज कमी होते.

काही लोकांच्या तोंडातून सतत दुर्गंध येतो. हा त्रास कमी करण्यासाठीही दालचिनीचा काढा उपयुक्त ठरतो. 

दालचिनीमध्ये असणारे ॲण्टीव्हायरल,  ॲण्टीबॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत करतात.

Click Here