stay away from complaining friends, they make your life measurable | तुमच्या मैत्रिणी सतत कटकट, तक्रार करतात? -मग सावधान, तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात!
तुमच्या मैत्रिणी सतत कटकट, तक्रार करतात? -मग सावधान, तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात!

ठळक मुद्देकम्प्लेन मोडवर जाणं बंद करणंच उत्तम!

-सखी ऑनलाइन टीम

सतत कुरकुर, सतत तक्रार करण्याची अनेकजणींना खरंतर बहुतेकजणींना सवय असते. मी होते म्हणून टिकले, एवढं सोसलं असं आपण किती पटकन बोलून जातो. अनेकदा घरचेही म्हणतातच की, तुझी सतत भूणभूण, सतत तक्रारी, काहीच तुला बरं वाटत नाही. तुला कशानंच आनंद होत नाही. काय हा सतत कम्प्लेन मोड ऑन असतो? पण खरंच विचार केलाय की असं का होत असेल? आपण अशा कट्कटय़ा आहोत की, आपल्या अवतीभोवती, आपल्या मैत्रिणी आणि सहकारी, नातेवाईक यापैकी कुणी जवळचं सतत अशा कम्प्लेन मोडवर असतं?
विचार करुन पहा, अनेकदा फोन झाला मैत्रिणींचा की काहीजणी सकाळी उठल्यापासूनच्या तक्रारी करतात, आज काय जागच लवकर आली नाही, आज काय मुलंच लवकर उठत नाही, नवरा घरकामात मदत करत नाही, गाडीच पंर झाली, आज भाजीलाच काही नव्हतं, सासूच्या तर तक्रारी अनंत, शेजारीणीच्या, नणंदेच्याही भयंकर तक्रारी. अशा सतत तक्रारी करणार्‍या मैत्रिणी आजूबाजूला असतील तर आपल्याही नकळत आपण तशाच तक्रारखोर बनतो आणि सतत चिडचिड करत राहतो.
त्यामुळे जरा तपासा की, आपल्या अवतीभोवती अशा मैत्रिणी आहेत का? आणि असतील तर जरा त्यांच्यापासून लांब रहा. त्याचं कारण असं की, एका अमेरिकन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला अभ्यास सांगतो की, जर अवतीभोवती सतत तक्रार करणारी माणसं असतील तर त्यांच्या सहवासाने आपला आनंद नासतो आणि आपल्याही नकळत आपण तक्रारी करायला लागतो. जगण्यातला आनंद, चांगुलपणा दिसणंच बंद होतो आणि उरतात फक्त कटकटी, चिडचिड आणि तक्रारी.
त्यामुळे अशा माणसांपासून लांब रहा.
नेमकं होतं काय अशी तक्रारखोर, कटकटी माणसं आपल्या अवतीभोवती असतील तर?
हा अमेरिकन अभ्यास म्हणतो की ढोबळमानाने आपल्यावर त्याचे तीन परिणाम होतात.


1. निगेटिव्ह  मोड


सतत कुणी तक्रार करत असेल आणि आपण तेच ते ऐकत असू तर आपल्याही डोक्यात नकारात्मक विचार तयार होतात. आपला मेंदू तसाच विचार करायला लागतो. आणि आपण नकारात्मक मानसिकता घेऊन वावरतो. त्यामुळे आपल्या जगण्यातली पॉझिटिव्हीटीच संपून जाते.


2. स्मरणशक्तीवर परिणाम

दुसरा सगळ्यात महत्वाचा धोका म्हणजे आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम.आपण चांगल्या गोष्टी विसरायला लागतो आणि कटू, कटकटय़ा आठवणीच कुरवाळत बसतो.


3. स्ट्रेस वाढतो


सतत नकारात्मक विचार, सतत इतरांविषयी तक्रारी, आनंदच न होणं यातून मनावरचा ताण वाढतो आणि परिणाम म्हणजे त्यातून तब्येतीच्या तक्रारी सुरु होतात.
अनेक महिलांच्या संदर्भात या गोष्टी सर्रास दिसतात त्यामुळे तक्रारींपासून लांब राहणं हे तब्येतीसाठी उत्तम.

Web Title: stay away from complaining friends, they make your life measurable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.