Lokmat Sakhi >Social Viral > Viral Video : तुफान व्हायरल होतोय ऐश्वर्याचा २७ वर्ष जुना व्हिडीओ; जाणून घ्या कारण

Viral Video : तुफान व्हायरल होतोय ऐश्वर्याचा २७ वर्ष जुना व्हिडीओ; जाणून घ्या कारण

Social Viral : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ऐश्वर्या एका लहान बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 06:10 PM2021-09-15T18:10:40+5:302021-09-15T18:23:25+5:30

Social Viral : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ऐश्वर्या एका लहान बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे.

Viral Video: 27 years old video of aishwarya rai going viral on social media know the reason | Viral Video : तुफान व्हायरल होतोय ऐश्वर्याचा २७ वर्ष जुना व्हिडीओ; जाणून घ्या कारण

Viral Video : तुफान व्हायरल होतोय ऐश्वर्याचा २७ वर्ष जुना व्हिडीओ; जाणून घ्या कारण

Highlightsऐश्वर्याचा क्यूटनेस आणि  दयाळूपणा या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. मिस वर्ल्ड झाल्यानंतरही ऐश्वर्या गरीब मुलांमध्ये मिसळते आणि एका लहान मुलाला तिच्या कडेवर उचलते आणि त्यांना गप्प बसवते. या व्हिडिओ  क्लिपमध्ये ऐश्वर्या डोक्यावर मुकुट घातलेली दिसते, ज्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की हा व्हिडिओ मिस वर्ल्ड झाल्यानंतर रेकॉर्ड केला आहे.

बॉलिवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आता सिनेसृष्टीत पुर्वीसारखी सक्रिय नसते हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून तिनं जास्त चित्रपटांमध्ये कामही केलेलं नाही. तरीसुद्धा ऐश्वर्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झालेली नेहमी पाहायला मिळते. सोशल मीडियावर ऐश्वर्याला फॅन्सची काही कमतरता नाही. ऐश्वर्याशी निगडीत कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होते. आता सोशल मीडियावर ऐश्वर्याचा तब्बल २७ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ऐश्वर्या एका लहान बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला असून लोक या व्हिडीओचं कौतुक करत आहेत. ऐश्वर्याच्या चाहत्यांनी तिचे अनेक फॅन पेजेसही तयार केले आहेत. ज्यावर तिच्याशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहेत. आता तिचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. २७ वर्ष जुन्या व्हिडीओत दीपिका शाळेतील मुलांशी बोलताना दिसून येत आहे.

या व्हिडिओ  क्लिपमध्ये ऐश्वर्या डोक्यावर मुकुट घातलेली दिसते. ज्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की हा व्हिडिओ मिस वर्ल्ड झाल्यानंतर रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओच्या एका क्लिपमध्ये ऐश्वर्या रायच्या कडेवर एक लहान मूलही रडताना दिसत आहे. ऐश्वर्या या मुलाला गप्प करते आणि दुसऱ्या क्लिपमध्ये ती शाळेतील मुलांना काही वस्तू वाटताना दिसत आहे. कमाल! फक्त १७ महिन्यात 'ती' नं ३ कोटीचं कर्ज फेडलं; महिलेची 'पैसे वाचवण्याची सुपर टेक्निक'

का व्हायरल होतोय व्हिडीओ?

ऐश्वर्याचा क्यूटनेस आणि  दयाळूपणा या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. मिस वर्ल्ड झाल्यानंतरही ऐश्वर्या गरीब मुलांमध्ये मिसळते आणि एका लहान मुलाला तिच्या कडेवर उचलते आणि त्याला गप्प बसवते. असं व्हिडीओत दिसतंय. आजच्या अभिनेत्रींचा असा  स्वभाव नाही. म्हणूनच ऐश्वर्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना फॅन पेजने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, हा व्हिडिओ 1994 मध्ये ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड बनल्यानंतर शूट करण्यात आला आहे. 'माणिके मॅगे हिते' गाण्यामुळे तुफान व्हायरल झाली तरूणी; वाचा कोण आहे एयर होस्टेस आफरीन

ऐश्वर्या राय बच्चन 2018 मध्ये 'फन्ने खान' चित्रपटात शेवटची दिसली होती. या चित्रपटात तिनं बेबी सिंगची भूमिका साकारली होती. यानंतर त्याने कोणताही चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये काम केले नाही. आता ती तामिळ चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. 2022 मध्ये, तिचा तमिळ चित्रपट Ponniyin Selvan प्रदर्शित होईल.

Web Title: Viral Video: 27 years old video of aishwarya rai going viral on social media know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.