Lokmat Sakhi >Social Viral > Turmeric Glow Trend: हळद चालली वाया पण दीदी को ट्राय करना है! मांजर आणि चमचाभर हळदीचा पाहा चमत्कार..

Turmeric Glow Trend: हळद चालली वाया पण दीदी को ट्राय करना है! मांजर आणि चमचाभर हळदीचा पाहा चमत्कार..

Turmeric Glow Trend Viral Videos, have you tried it ? Instagram is filled with viral videos, see this magical trend : पाण्यात हळद मिसळून पाहण्याची काय ही नवीन भानगड? जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2025 13:02 IST2025-06-22T13:41:29+5:302025-06-23T13:02:12+5:30

Turmeric Glow Trend Viral Videos, have you tried it ? Instagram is filled with viral videos, see this magical trend : पाण्यात हळद मिसळून पाहण्याची काय ही नवीन भानगड? जाणून घ्या.

Turmeric glow trend, have you tried it ? Instagram is filled with viral videos, see this magical trend | Turmeric Glow Trend: हळद चालली वाया पण दीदी को ट्राय करना है! मांजर आणि चमचाभर हळदीचा पाहा चमत्कार..

Turmeric Glow Trend: हळद चालली वाया पण दीदी को ट्राय करना है! मांजर आणि चमचाभर हळदीचा पाहा चमत्कार..

पूर्वी सध्या काय चालू आहे असा प्रश्न विचारला की त्याचा एकच अर्थ असायचा. की एखाद्याच्या आयुष्यात तो सध्या काय करतो असे त्याला आपुलकीचे कोणी विचारते. पण आता सध्या काय चालू आहे या वाक्याचा आणखी एक अर्थ काढता येतो. (Turmeric glow trend, have you tried it ? Instagram is filled with viral videos, see this magical trend  )सध्या कोणता ट्रेंड सुरु आहे. कोणते गाणे लोक ऐकत आहेत आणि कशावर रील तयार करत आहेत असा अर्थ आजकाल जास्त लावावा लागतो. कोणी एक काहीतरी व्हिडिओ टाकतो आणि तो वाऱ्यासारखा सगळ्याच देशांमध्ये पसरतो. मग जगभरातून लोकं त्या ट्रेंड फॉलो करत अगदी तसेच व्हिडीओ तयार करतात. अनेक व्हिडिओ तर अर्थहीन असतात. मात्र तरी तयार करणारे लाखात कमवतात. इंस्टाग्रामवर कधी कोणता व्हिडिओ चालेल याची काही खात्री देता येत नाही. 
 



व्हायरल ट्रेंडसाठी वाया घालवण्यापेक्षा रोज प्याल हळदीचं पाणी, पावसाळ्यात तर फार आवश्यक कारण..




कधी एखादा नृत्यप्रकार प्रसिद्ध होतो तर कधी एखादे गाणे. जास्त गाजणारे व्हिडीओ जरा हास्यास्पदच असतात. लोक लाईक मिळवण्यासाठी अगदी काहीही करतात. काही रिल्स चांगलेही असतात. काही उगाचच गाजतात. सध्या मात्र एक आगळावेगळा रिल सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. या ट्रेंडला टर्मरीक ग्लो ट्रेंड असे नाव आहे. फार काही वेगळे करावे लागत नसल्याने आणि घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीत करता येत असल्याने हा ट्रेंड घरोघरी केला जात आहे. 

हा ट्रेंड प्रथम टिकटॉकवर सुरु झाला  जेफ व लिझ नावाच्या कंटेंट क्रिएटर्सनी पहिला व्हिडिओ टाकला होता नंतर भराभर अनेकांनी ट्रेंड फॉलो करा. हा व्हायरल ट्रेंड टिकटॉकवरुन इंस्टाग्रामलाही झटकन आला. आता इंस्टाग्रावर उघडल्यावर सगळीकडे पिवळंच दिसतं. खरे तर यात फार वेगळे असे काही नाही. शाळेत वैज्ञानिक प्रयोग आणि कला यांचा मेळ घालून जे उपक्रम घेतले जातात. त्यापैकीच हा प्रकार आहे. 

हळदीचा ग्लो ट्रेंड Reel कसा बनवायचा जाणून घ्या 

मोबाइलचा फ्लॅशलाईट लावायचा. त्यावर पाण्यानी भरलेला ग्लास ठेवायचा. लाईट बंद करायचे आणि काळोख करुन चमचाभर हळद त्या पाण्यात ओतायची. सगळीकडे पिवळा प्रकाश पसरतो आणि दिसायला ते छान वाटते. हा ट्रेंड करताना त्यामध्ये पाण्याकडे पाहून प्रतिक्रिया देणाऱ्या मांजरी, कुत्रे, लहान बाळं, वयस्कर माणसं व्हिडिओमध्ये दिसतात. त्यांच्या प्रतिक्रियांसाठी हा ट्रेंड व्हायरल होत आहे. लहान मुलांचे मनोरंजन करणे निव्वळ या उद्देशाने सुरु झालेल्या ट्रेंडमध्ये मांजरींच्या प्रतिक्रिया जास्त लोकप्रिय ठरत आहेत. मग तुम्ही पण करुन पाहीला की नाही ?  

 

Web Title: Turmeric glow trend, have you tried it ? Instagram is filled with viral videos, see this magical trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.