Lokmat Sakhi >Social Viral > नातवाच्या लग्नात शुटर आजीचा झिंगाट डान्स! व्हायरल व्हिडिओ, तापसी पन्नूलाही आवडला आजीचा...

नातवाच्या लग्नात शुटर आजीचा झिंगाट डान्स! व्हायरल व्हिडिओ, तापसी पन्नूलाही आवडला आजीचा...

Social viral: २०१९ साली आलेला 'सांड की आंख' हा चित्रपट (hindi movie sand ki aankh) आठवतोय... हा चित्रपट ज्या आजीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर आधारित होता त्या आजीचा म्हणजेच प्रकाशी तोमर यांचा हा झिंगाट डान्स सध्या सोशल मिडियावर धुम करतो आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 02:30 PM2022-02-22T14:30:38+5:302022-02-22T14:32:38+5:30

Social viral: २०१९ साली आलेला 'सांड की आंख' हा चित्रपट (hindi movie sand ki aankh) आठवतोय... हा चित्रपट ज्या आजीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर आधारित होता त्या आजीचा म्हणजेच प्रकाशी तोमर यांचा हा झिंगाट डान्स सध्या सोशल मिडियावर धुम करतो आहे...

Shooter dadi Prakashi Tomar's dance in her grand son's wedding, Actress Taapsee Pannu liked this dance | नातवाच्या लग्नात शुटर आजीचा झिंगाट डान्स! व्हायरल व्हिडिओ, तापसी पन्नूलाही आवडला आजीचा...

नातवाच्या लग्नात शुटर आजीचा झिंगाट डान्स! व्हायरल व्हिडिओ, तापसी पन्नूलाही आवडला आजीचा...

Highlightsप्रकाशी तोमर यांचा हा झिंगाट डान्स सध्या सोशल मिडियावर धुम करतो आहे...

घरी एखादं लग्न- कार्य असलं की सगळं घर कसं आनंदून जातं.. उत्साह आणि आनंदाच्या भरात वयाचही भान नसतं.. लहान मुलांच्या, तरूणांच्या मजा मस्तीत मग घरातली वयस्कर मंडळीही सहभागी होतात आणि कार्यक्रमाची मजा आणखीनच वाढते. असंच काहीसं झालं आहे आपल्या शुटर आजीचं (shooter dadi).. आजीने त्यांच्या नातवाच्या लग्नात असा काही दणकून डान्स केला की सोशल मिडियावर (social viral) या डान्सने अक्षरश: धुम केली. 

 

२०१९ साली आलेला 'सांड की आंख' हा चित्रपट चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर (Prakashi Tomar) या दोघींच्या आयुष्यावर आधारित होता. चंद्रची भुमिका भुमी पेडनेकरने तर प्रकाशीची भुमिका तापसी पन्नू हिने केली होती. त्याच प्रकाशी आजीने आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'यमला पगला दिवाना...' या गाण्यावर एक मस्त डान्स केला आहे. आजीच्या या डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्याshooterdadi या पेजवर शेअर करण्यात आला असून 'नाती की शादी मैं धूम धमाका' असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. 

 

आजीचा हा धूम धमाका फक्त लग्नापुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर सोशल मिडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्यात आजीसोबत त्यांचा नातू, नातसून आणि इतर वऱ्हाडी मंडळीही ठुमका लावत आहेत. तापसी पन्नूलाही (Actress Taapsee Pannu) आजीचा हा डान्स आणि तिचा स्वॅग भलताच आवडला आहे बरं का.. 

 

 

Web Title: Shooter dadi Prakashi Tomar's dance in her grand son's wedding, Actress Taapsee Pannu liked this dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.