Lokmat Sakhi >Social Viral > लॉंग शर्ट आणि नो पॅण्ट! ही कोणती अजब फॅशन, अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर होताहेत ट्रोल

लॉंग शर्ट आणि नो पॅण्ट! ही कोणती अजब फॅशन, अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर होताहेत ट्रोल

Fashion Trend: काही अभिनेत्रींचे फोटो तुम्ही पाहिले का? लांब शर्ट आणि नो पॅण्ट (long shirt or t shirt with no pants) अशा लूकमधले? त्यांच्याकडे पाहून आपल्याला काहीतरी चुकल्याचुकल्या सारखं वाटतं... पण हे असंच असतं म्हणे.... फॅशनची नवी तऱ्हा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 03:20 PM2021-12-05T15:20:52+5:302021-12-05T15:22:40+5:30

Fashion Trend: काही अभिनेत्रींचे फोटो तुम्ही पाहिले का? लांब शर्ट आणि नो पॅण्ट (long shirt or t shirt with no pants) अशा लूकमधले? त्यांच्याकडे पाहून आपल्याला काहीतरी चुकल्याचुकल्या सारखं वाटतं... पण हे असंच असतं म्हणे.... फॅशनची नवी तऱ्हा....

New trend of fashion: No pant trend, long shirt or T shirt with no wearing pants | लॉंग शर्ट आणि नो पॅण्ट! ही कोणती अजब फॅशन, अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर होताहेत ट्रोल

लॉंग शर्ट आणि नो पॅण्ट! ही कोणती अजब फॅशन, अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर होताहेत ट्रोल

Highlights ४ ते ५ वर्षांपुर्वी ही फॅशन युरोप, अमेरिकेत भलतीच ट्रेण्डमध्ये होती. आता त्याचे वारे आपल्याकडे येऊ लागले आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

फॅशन कशी आणि कोणती असेल, फॅशनच्या नावाखाली काय प्रकार केले जातील, काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना, आजकाल अशा खूप अभिनेत्रींचे फोटो आपण सोशल मिडियावर (social media)पाहतो आहोत. यामध्ये त्यांनी एक लाँग म्हणजे मांडीपर्यंत लांब येणारा टीशर्ट किंवा शर्ट घातलेला असताे. आता असा लांब टीशर्ट असला तर त्याच्याखाली पॅण्ट घातलेली असावी, असा आपला अंदाज असतो. पण त्याच्याखाली त्यांनी पॅण्ट, स्कर्ट असं काहीही घातलेलं नसतं. ते पाहून आपल्याला एकदम वेगळंच वाटत असलं, तरी असेच कपडे घालण्याची एक जुनी फॅशन (fashion trend) नव्याने येऊ बघत आहे.

 

सध्या अशाच कपड्यांवरून ट्रोल (troll) होत आहे मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil). ती सध्या मालदिवला (Maldives) गेलेली आहे. तिने तिथले  तिचे काही हॉट फोटो इन्स्टग्रामवर (instagram) शेअर केले आहेत. यामध्ये ती कमालीची ग्रेसफुल दिसत असली तरी कपड्यांमुळे मात्र तिला नेटीझन्सकडून काहीबाही ऐकावं लागत आहे. या फोटोंमध्ये रसिका एका बीचवर आहे. समोर निळाशार समुद्र पसरलेला आहे. यावेळी रसिकाने निळे आणि केशरी चट्ट- पट्टे असणारा एक शर्ट घातला आहे. मोकळे सोडलेले केस, गॉगल अशा लूकमध्ये ती अतिशय बोल्ड दिसत आहे. पण त्यापेक्षाही जास्त चर्चा तिने हे काय घातलं आहे, याचीच होत आहे...

 

काही दिवसांपुर्वी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pande),अभिनेत्री शिल्पा शेट्टीदेखील (Shilpa Shetty) अशाच अवतारात दिसल्या होत्या. तेव्हा त्या दोघीही चांगल्याच ट्रोल झाल्या होत्या. 'पॅण्ट घालायला विसरली की काय?', 'हिने पॅण्ट आज धुवायला टाकली वाटतं...', 'गडबडीत बिचारी तशीच आली आणि पॅण्ट घालायची राहूनच गेली...' अशा पद्धतीच्या कमेंट या दोघींनाही ऐकाव्या लागल्या होत्या. आता थोड्याफार फरकाने रसिकालाही अशाच कमेंट येत आहेत. त्यांचे असे फोटो पाहून नेटीझन्सच्या मनात असा विचार येणे साहिजक आहे. पण त्या काहीही विसरलेल्या नाहीत. उलट नवा फॅशन ट्रेण्ड त्या सगळ्याजणी फॉलो करत आहेत. 

 

लांब शर्ट किंवा टी शर्ट आणि त्याखाली पॅण्ट, स्कर्ट असं काहीही नाही. ही म्हणे जुनीच फॅशन आहे. ४ ते ५ वर्षांपुर्वी ही फॅशन युरोप, अमेरिकेत भलतीच ट्रेण्डमध्ये होती. आता त्याचे वारे आपल्याकडे येऊ लागले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. असे लाँग शर्ट किंवा टिशर्ट घातल्यामुळेही शरीर योग्य पद्धतीने झाकल्या जातं. त्यामुळे तिथे ती फॅशन चांगलीच चालली आणि स्विकारली गेली. हॉलीवूडच्या अनेक स्टार, सेलिब्रिटी आणि मॉडेल काही वर्षांपुर्वी अशा अवतारात दिसून आल्या होत्या. तसंच आता आपल्याकडच्या अभिनेत्री करत आहेत. 

 

अशी फॅशन करण्याचा तुमचाही विचार आहे का?
- कॅज्यूअल (casual look) लूक देणारी ही स्टाईल असून तुमचा कूल लूक यातून दिसून येताे. त्यामुळे तुम्हीही अशी फॅशन करायचा विचार करत असाल तर बीच, हिलस्टेशन अशा ठिकाणी असे कपडे घालणं ठिक दिसतं.
- यामध्ये घातले जाणारे शर्ट- टीशर्ट हे मांड्यांपर्यंत लांब असतात.
- पॅण्टच्या ऐवजी शर्टशी मिळताजुळता रंग असणारे शॉर्ट्स वापरा. 
- असे शर्ट घातल्यानंतर पायात शक्यतो स्निकर्स किंवा शूज घाला.
- यावर घालण्यासाठी तुम्ही ट्रेण्डी आणि फंकी प्रकारातली ॲक्सेसरीज निवडा.  
 

Web Title: New trend of fashion: No pant trend, long shirt or T shirt with no wearing pants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.