Lokmat Sakhi >Social Viral > लिपस्टिक आज पुसणार, उद्या पुन्हा तोंडाला फासणार! #BanLipstick वर चिडले नेटिझन्स, म्हणाले बंद करा आचरटपणा

लिपस्टिक आज पुसणार, उद्या पुन्हा तोंडाला फासणार! #BanLipstick वर चिडले नेटिझन्स, म्हणाले बंद करा आचरटपणा

lipstick ban trend : महाराष्ट्रासारख्या महान राज्यात असले फालतू बॅन लिपस्टिक वगैरे आंदोलन करून काय फायदा.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 03:39 PM2021-12-07T15:39:08+5:302021-12-07T15:53:44+5:30

lipstick ban trend : महाराष्ट्रासारख्या महान राज्यात असले फालतू बॅन लिपस्टिक वगैरे आंदोलन करून काय फायदा.

Netizens angry over on lipstick ban trend of marathi actress goes viral on social media | लिपस्टिक आज पुसणार, उद्या पुन्हा तोंडाला फासणार! #BanLipstick वर चिडले नेटिझन्स, म्हणाले बंद करा आचरटपणा

लिपस्टिक आज पुसणार, उद्या पुन्हा तोंडाला फासणार! #BanLipstick वर चिडले नेटिझन्स, म्हणाले बंद करा आचरटपणा

'बॅन लिपस्टिक' हा हॅशटॅग वापरत आणि ओठावर चोपडलेली डार्क लिपस्टिक भसकन स्वत:च्याच हातानं पुसत तेजस्विनी पंडीत, प्राजक्ता माळी आणि सोनाली खरे यांनी इटुकले व्हिडीओ सोशल मीडीयात टाकले. आता हे काय नवीन म्हणून अनेकांनी त्यांना उत्सुकतेनं प्रश्न विचारले. तर कुणी म्हणाले टिकली लावायची की नाही यावर दिवाळीत चर्चा झाली आता लिपस्टिक लावायची की नाही, पाठिंबा की विरोध, स्त्री स्वातंत्र्य की मेरी मर्जी चॉइस यावर नेटकऱ्यांनीच आपल्याला हवे ते तारे हवी ती बाजू घेऊन तोडायला सुरुवात केली. काहींनी मिम्स लिहिले, काहींनी टवाळ्या केल्या, टिंगलही झाली. काहीजण मात्र गांभिर्याने म्हणाले की, असे काहीतरी पिल्लू सोडून देऊन चर्चेत राहण्याचे हे प्रयत्न स्त्रियांच्या गंभीर प्रश्नांचंही गांभिर्य कमी करतात. (Netizens angry over on lipstick ban trend of marathi actress goes viral on social media)

एक ना अनेक चर्चा. बॅन लिपस्टिक म्हणून हॅशटॅग सुरु करताना कदाचित ही चर्चाच अपेक्षित होती, ती झालीही.  मात्र सोशल मीडियावर या हॅशटॅगने नवीन करमणूक मात्र लोकांना दिली. त्यात जशा महिला होत्या तसे पुरुषही. नंतर तेजस्विनी पंडीत यांनी सोशल मीडियात पोस्ट टाकून लिहिलेच की त्यांच्या एका वेबसिरीजविषयी ते होतं. पण ते जाहीर होईपर्यंत तरी अनेकांना प्रश्न पडला की एरव्ही लिपस्टिक लावून भरपूर मेकअप करुन फिरणाऱ्या या तारका आता आपल्याच ओठांवरची लिपस्टिक पुसून काय सिध्द करण्याचा प्रयत्न करत आहेत?

सगळ्यात आधी तेजस्विनी पंडित ने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत #बॅनलिपस्टिक हा हॅशटॅग वापरला आहे. 'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही. बॅनलिपस्टिक' असे म्हणत तेजस्विनीने लिपस्टिक पुसून टाकली. त्यानंतर प्राजक्ता माळीनंसुद्धा अशाच पद्धतीनं ओठांवरची लिपस्टिक पुसत मला लिपस्टीकचा रंग नको असं म्हणत या ट्रेंडला पाठींबा दिला. अभिनेत्री सोनाली खरेने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने देखील #बॅनलिपस्टिक हॅशटॅग वापरला आहे. शिवाय तिने या व्हिडिओमध्ये तेजस्विनी पंडित ला टॅग केले आहे.

मात्र फॉलोअर्स विचारत असलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिली नाहीत. मात्र चेष्टा, टवाळी, टिंगल हे करणाऱ्यांपलिकडे काही नेटीझन्स मात्र चांगलेच संतापले. त्यांनी कडक भाषेत आपल्या कमेण्ट पोस्ट केल्या. कुणी म्हणाले, 'लिपस्टिक लावून पुसण्यात काय लॉजिक आहे समजत नाही? महाराष्ट्रासारख्या महान राज्यात असले फालतू बॅन लिपस्टिक वगैरे आंदोलन करून काय फायदा. कधी जातीवादबद्दल बोला आणि बॅन जातीवाद वगैरे  आंदोलन चालवा तेव्हा समजू तुम्ही सुशिक्षित आणि सामाजिक भान राखणारे कलाकार आहात.' तर आणखी एका युजरने कमेण्ट केली की, आज पुसणार उद्या परत तोंडाला फासणार .... निषेध तुमच्या भंगार प्रवृत्तीचा!

मिम्स आणि कमेण्टचा भरपूर पाऊस पडला. तेजस्विनी पंडितच्या पोस्टवर मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांनी कमेंट करत 'क्या हुआ भाई' असं विचारलं. तर अनेकांनी स्पष्टच लिहिलं की हे सारं त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनचा भाग असेल. झालेही तसेच. आपल्या नवीन प्रोजेक्टची चर्चा व्हावी म्हणून त्यांनी हे व्हीडिओ केले.. नेटीझन्सची करमणूक झाली.

Web Title: Netizens angry over on lipstick ban trend of marathi actress goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.