lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > गलतीसे गलती की..झक मार के! एअर होस्टेसचा व्हायरल व्हिडिओ, दीपिकापेक्षा भारी

गलतीसे गलती की..झक मार के! एअर होस्टेसचा व्हायरल व्हिडिओ, दीपिकापेक्षा भारी

डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, वा क्या बात है....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 11:01 AM2022-01-17T11:01:26+5:302022-01-17T11:11:28+5:30

डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, वा क्या बात है....

Make a mistake by mistake .. Zhak Mar Ke! Viral video of air hostess, heavier than Deepika | गलतीसे गलती की..झक मार के! एअर होस्टेसचा व्हायरल व्हिडिओ, दीपिकापेक्षा भारी

गलतीसे गलती की..झक मार के! एअर होस्टेसचा व्हायरल व्हिडिओ, दीपिकापेक्षा भारी

Highlightsएअर हॉस्टेसचा उत्साह पाहून आपल्यालाही छान वाटेल रिल्सच्या जमान्यात एअर हॉस्टेसही मागे नाहीत

एअर हॉस्टेस रिकाम्या विमानात डान्स करत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. प्रवाशांना विमानात सेवा देतानाचा त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. एअर हॉस्टेसचे अशाप्रकारे डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होताना दिसतात. हाच ट्रेंड कायम राखत स्पाइसजेटच्या एका एअर हॉस्टेसने नुकताच आपला एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला आहे. तिचा डान्स नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. उमा मिनाक्षी असे या एअर हॉस्टेसचे नाव असून दिपिका पदुकोणच्या झक मार के या देसी बॉईजमधील गाण्यावर ती डान्स करत असल्याचे दिसून येत आहे. तिच्या या व्हिडिओला नेटीझन्सनी पसंती मिळाली असून यासाठी तिचे भरपूर कौतुक केले आहे. 

उमा हिने अशाप्रकारचा व्हिडिओ अपलोड करायची ही काही पहिलीच वेळ नाही. तर याआधीही तिने काही डान्स किंवा रील्स आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते आणि त्यासाठी तिची वाहवा ही करण्यात आली होती. आताच्या व्हिडिओमध्ये उमा सुरुवातीला कारमध्ये देसी बॉईज या चित्रपटातील झक मारके या गाण्यावर लीप सिंकींग करताना दिसत आहे. यामध्ये तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. त्यानंतर अचानक व्हिडिओ आपल्याला रीकाम्या विमानात नेतो ज्याठिकाणी सीटच्या मधल्या जागेत उमा अतिशय उत्तमरितीने आपले डान्सचे कौशल्य सादर करताना दिसते. यामध्ये तिच्या अदांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

नेटीझन्सनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लाईक केला असून तिच्या या डान्सचे भरपूर कौतुक होताना दिसत आहे. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया देत नेटीझन्स तिच्या या व्हिडिओवर व्यक्त झाले आहेत. तिची डान्स करतानाची एनर्जी आणि हावभाव पाहून आपल्यालाही तिच्यातील उत्साह भावल्याशिवाय राहणार नाही. सध्या इन्स्टाग्रामवर रील्सचे बरेच फॅड असताना एअर हॉस्टेसही यात मागे नाहीत आणि आपल्या कामातून वेळ काढत त्या स्वत:ला आनंदी ठेवायचा प्रयत्न करत असल्याचेच यातून दिसून येते.  सर्व प्रकारची सुरक्षेची योग्य ती काळजी घेऊन आणि परवानगी घेऊन हा व्हिडिओ विमानात शूट करण्यात आल्याचेही तिने आपल्या पोस्टच्या खाली स्पष्ट केले आहे. 

Web Title: Make a mistake by mistake .. Zhak Mar Ke! Viral video of air hostess, heavier than Deepika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.