आजच्या पिढीला मोबाईलाशिवाय जगातच येत नाही. या मोबाईलने आपल्या संपूर्ण मनाचा ताबा घेतला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण हा मोबाईल पाहात असतो.(landline-style phone) कुटुंबासोबत बसलो तरी नजर कायम स्क्रीनवर, जेवताना हातात फोन, झोपतानाही फोन.. यामुळे नात्यातील संवाद, उब आणि प्रामाणिकपणा कमी होताना दिसत आहे. (screen time reduction device)
अशातच एका टेक कंपनीने DIY रेट्रो लँडलाइन-शैलीचा फोन पुन्हा बाजारात आणला. ज्यामुळे स्क्रीन टाइम कमी होईल.(digital detox gadgets) या लँडलाइनमधून कंपनीने ३ दिवसांत १ कोटी रुपये कमावले. दोन वर्षांपूर्वी कॅट गोएत्झे जिला ऑनलाइन कॅटGPT म्हणून लोक ओळखतात. ही स्मार्टफोनच्या वापरामुळे वैतागली होती. दिवसभर स्क्रीनकडे पाहत बसण्यापेक्षा, तिला जुन्या काळातील त्या साध्या, मनमोकळ्या लँडलाइनवरील गप्पांची उब पुन्हा एकदा अनुभवायची होती.
Gold Nose Pins : रोज वापरण्यासाठी पाहा भन्नाट डिझाइन्सच्या ५ सुंदर नोजपिन्स, नाकात रिंग दिसेल शोभून
ती म्हणते मी तशीच बसून विचार करत होते की आजही आपल्या घरात लँडलाइन फोन असता आणि आपण दोरी फिरवून नंबर लावला असता, मग मित्रांशी हसतखेळत गप्पा मारता आल्या असत्या. किती गोड वाटलं असतं ना! तो विचारच मला खूप नॉस्टॅल्जिक आणि आकर्षक वाटला, असं तिनं CNBC Make It ला सांगितलं. जेव्हा तिला कळाल की सध्याच्या काळात लँडलाइन घ्यायचा म्हणजे नवीन नंबर, वेगळ्या कनेक्शनची फी आणि अडचणींना सामोरे जावे लागेल. तेव्हा तिनं आपणच काही तरी करुया असा विचार केला.
विविध प्रयोग करुन तिने एक छोटासा गुलाबी रंगाचा क्लॅमशेल हँडसेट घेतला, त्याचं सिस्टम “हॅक” केल्यासारखं बदललं आणि तो ब्लूटूथवर चालणारा फोन तयार झाला. बघता बघता हा फोन तिच्या अपार्टमेंटचं एक हटके आकर्षण बनला. घरी कुणीही आलं की या लँडलाइनकडे कौतुकाने बघायचे.
हिवाळ्यात वाढवा ताकद रोज खा पौष्टिक मल्टीग्रेन डोसा, मऊ जाळीदार डोशासाठी पाहा सोपी ट्रिक-मस्त रेसिपी
तिने या लँडलाइनला जुलै २०२५ मध्ये सुरु केले. सगळ्यात आधी ऑनलाइन डिव्हाइस लोकांपर्यंत पोहोचवलं, त्याला अनेकांनी छान प्रतिसाद दिला.तिला वाटलं होतं की १५-२० प्रीऑर्डर्स मिळतील, पण फिजिकल फोन्स नावाच्या या प्रोजेक्टने फक्त ३ दिवसांत $१२०,००० ची विक्री केली. ऑक्टोबरपर्यंत ३,००० पेक्षा जास्त युनिट्स विकले गेले आणि महसूल $२८०,००० च्या वर पोहोचला.
आता हे फोन्स $90 ते $110 मध्ये पाच वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये मिळतात. उत्पादन वाढवण्यासाठी तिने एक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकाशी करार केला असून त्याची पहिली शिपमेंट डिसेंबरमध्ये जाणार आहे. हे डिव्हाइस ब्लूटूथने आयफोन-Android शी जोडले जाते आणि WhatsApp, Instagram, Facetime, Snapchat वरील कॉल्ससाठी वाजते. अनेक लोक स्क्रीन टाइमपासून दूर जाण्यासाठी विविध मार्ग शोधतात. ती म्हणते आपली लक्ष देण्याची क्षमता कमी होते. सतत मानसिक ताण, डोळ्यावर ताण येतो. डिजिटल लाइफपासून थोडं दूर राहण्याचा निर्णय घेऊया. मी तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही. फक्त संतुलन हवं, एवढंच माझं म्हणणं.
