हिवाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो.(winter geyser safety tips) रात्री आणि सकाळी थंड जास्त प्रमाणात जाणवते.(how to use geyser safely in winter) थंडीचे दिवस सुरु झाले की आपण गरम पाण्याने आंघोळ करतो. बऱ्याच घरांमध्ये हिटर, गिझरचा वापर जास्त प्रमाणात होतो. सकाळी आंघोळीला पाणी गरम करण्यासाठी बरेच जण गिझरचा वापर करतात.(geyser maintenance tips in cold weather) हिवाळा संपून उन्हाळा सुरु झाल्यानंतर अनेकजण गिझरचा वापर कमी करतात.बरेच महिने गिझर बंद असल्यामुळे पुन्हा सुरु करताना त्याचे पार्ट्स गंजतात, खराब होतात.(prevent electric shock from geyser) इतकंच नाही तर गिझर खूप जास्त प्रमाणात वीज खर्च करतो. ज्यामुळे लाईट बिल जास्त येण्याची शक्यता असते. गिझर वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यातर लाईट बिल कमी येईल आणि शॉक लागण्याचा धोकाही राहणार नाही.
बरेच लोक आंघोळ करताना गिझर सुरु ठेवतात. या छोट्या चुकीमुळे आपला अपघात होण्याची शक्यता जास्त असते. वीजेमध्ये चढ-उतार झाल्यास पाण्यात विजेचा धक्का लागण्याचा धोका वाढतो. तसेच गिझर वापरल्यानंतर तो व्यवस्थित बंद करा आणि अनप्लग करा.
बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडचे गिझर पाहायला मिळतात. त्यामुळे जेव्हाही गिझर खरेदी कराल, तेव्हा नेहमी ब्रँडेड किंवा चांगल्या कंपनीचा गिझर निवडा. स्वस्त किंवा कमी बजेटमध्ये मिळणारे गिझर सुरक्षेच्या नावाखाली तडजोड करतात, ज्यामुळे समस्या येऊ शकतात.
आपण पहिल्यांदा गिझर वापरत असू तर ते व्यवस्थित तपासून घ्या. ते वापरण्यापूर्वी आपण स्वत: सर्व्हिसिंग करु शकता. गिझरमधून आवाज येणे, पाणी लीक होणे यांसारख्या लहानसहान गोष्टी तपासा. आपली एक छोटीशी चूक महागात पडू शकते.
कधीकधी आपल्याला माहित नसते आणि पाणी खूप गरम होते. यामुळे आपल्या त्वचा भाजण्याची किंवा चटका लागू शकतो. त्यासाठी गिझरचे तापमान चेक करा. गरम पाणी बादलीत काढताना गिझर आधी बंद करा. गिझर जास्त गरम होत राहिल्यास इलेक्ट्रिशियनकडून तपासा.
