बाथरूम आणि किचन किंवा टॉयलेटमध्ये डाग लागणं खूपच सामान्य आहे. अनेकदा हे हट्टी डाग निघता निघत नाहीत. काही सोपे उपाय करून तुम्ही हे डाग सहज काढून टाकू शकता. जसं की चहा पावडर, एकदा चहा पावडर वापरली की आपण ती लगेच फेकून देतो (Cleaning Hacks). हा घरगुती उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही खास क्लिनर्सची आवश्यकता नाही. याचा मुख्य घटक आहे चहा पावडर. चहा पावडरध्ये नैसर्गिक टॅनिन्स आणि तेल असते ज्यामुळे घाण कमी होण्यास मदत होते. हा उपाय फक्त पर्यावरण पुरक नसून कमी बजेटमधला सुद्धा आहे. याच्या वापरानं टॉयलेट सिंकमध्ये जमा झालेला मळ निघून जाईल. (Desi Chai Patti Jugad For Toilet Sink Stains)
टॉयलेटची साफसफाई करण्यासाठी चहा पावडर व्यवस्थित धुवून सुकवून घ्या. नंतर टॉयलेटब्रशवर चहा पावडर घेऊन टॉयलेट घासा. यामुळे डाग कमी होतील आणि याचा दुर्गंध कमी होईल. हा उपाय महागड्या केमिकल्सयुक्त क्लिनरर्सच्या तुलनेत असरदार आणि सुरक्षित आहे.
बाथरूमच्या सिंकमध्येही तुम्ही चहा पावडरचा वापर करू शकता. सिंकमध्ये तेल आणि मळ कमी करण्यासाठी चहा पावडर घाला. ५ ते १० मिनिटं वाट पाहून ब्रश किंवा स्क्रबरनं सिंगचा भाग रगड. लोखंडाच्या किंवा स्टिलच्या सिंकमध्ये याचा परीणाम खास दिसून येईल. हा उपाय केवळ स्वस्त आणि सोपा नसून केमिकल्स मुक्त होण्याचा एक सुरक्षित पर्याय आहे. सतत महागडे क्लिनर्स किंवा पाईप ब्लॉकेजचं टेंशन घेण्याची काहीच गरज नाही.
सिंकवर डाग पडू नयेत सिंक नेहमी चमकदार दिसावं यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे. सिंकमध्ये चहा, कॉफी, हळद, तेलकट पदार्थ, फळांचे रस जास्तवेळ साचू देऊ नका. रात्री स्वयंपाक झाल्यानंतर लिक्विड डिश वॉश आणि मायक्रोफायबर कापड किंवा सॉफ्ट स्पंज वापरून सिंक घासून घ्या नंतर स्वच्छ पाण्यानं धुवा. यामुळे साचलेले अन्नाचे कण निघून जातात.
स्वच्छता झाल्यानंतर भांडी कोरड्या कापडानं किंवा टॉवेलनं पुसा. सिंकवर पाणी साचून राहिल्यास पाण्याचे डाग पडतात. सिंकमध्ये गरम भांडी किंवा कढई थेट ठेवू नका. आठवडयातून एकदा व्हिनेगर किंवा सौम्य क्लिनरनं बाथरूमची स्वच्छता करा.
