नवीन कपडे घेतल्याचा आनंद वेगळाच असतो, पण ते पहिल्यांदाच धुतल्यावर रंग सोडू लागले तर त्याची सगळी चमक हरवते आणि कपडे लगेच जुनाट दिसू लागतात. अनेकदा नवीन कपड्यांचा रंग इतर कपड्यांना लागतो किंवा कपडे स्वतःचा रंग सोडून देतात, ज्यामुळे ते लगेच जुने आणि फिके दिसू लागतात. विशेषतः गडद, प्रिंटेड किंवा कलरफुल कपडे धुताना रंग एकमेकांना लागणे ही एक फार मोठी समस्या असते. यामुळे महागडे नवेकोरे कपडे घेऊन देखील त्यांचा रंग निघून जातो आणि ते जुनाट व फिके दिसू लागतात(prevent clothes from losing color).
नव्याकोऱ्या कपड्याचा रंग जाण्याचा किंवा फिका पडण्याचा धोका टाळण्यासाठी अनेकजण नवीन कपडे धुणेच टाळतात किंवा त्यांना वेगळे हाताने धुतात. पण, काळजी करू नका! तुमच्या स्वयंपाकघरात अशा दोन साध्या गोष्टी उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर केल्यास नवीन कपड्यांचा रंग पक्का होतो आणि ते धुतल्यावरही चमकदार आणि नवेकोरे राहतात. या साध्यासोप्या दोन पदार्थांच्या वापरामुळे तुमचा वेळ आणि मेहनत तर वाचेलच, पण तुमचे आवडते नवीन कपडे दीर्घकाळ टिकतील. घरातल्या अगदी साध्या दोन गोष्टी पाण्यात (home remedies to prevent color bleed) घातल्या तर हा रंग जाण्याचा प्रॉब्लेम सहज थांबवता येतो, असे दोन पदार्थ नेमके कोणते ते पाहूयात.
कपड्यांचा रंग पक्का करण्याची सोपी पद्धत...
१. कपड्यांचा रंग पक्का करण्याची एक सोपी पद्धत पाहूयात. यासाठी, सर्वातआधी एका मोठ्या भांड्यात १० ते १२ लिटर पाणी घ्या. यात अंदाजे ५० ते ६० ग्रॅम तुरटीची बारीक पूड करून टाकून चांगली विरघळून घ्या. यानंतर, या पाण्यात दोन मूठ (अंदाजे १०० ग्रॅम) जडे मीठ टाका. आता, ज्या कपड्यांचा रंग फिक्स करायचा आहे, ते या पाण्यात टाका. तुम्ही हवे असल्यास एकाच वेळी अनेक कपडे टाकू शकता. कपड्यांना या मिश्रणात कमीतकमी २ तास भिजवून ठेवा.
फक्त अभ्यास आणि शाळाच पुरेसे नाही, मुलं स्वावलंबी आणि जबाबदारी होण्यासाठी ५ सवयी आवश्यकच...
२ तासांनंतर कपड्यांना स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्या, जेणेकरून मीठ आणि तुरटी पूर्णपणे निघून जाईल. या प्रक्रियेनंतर कपडे पहिल्यांदा रंग सोडू शकतात, पण पुढे त्यांचा रंग पूर्णपणे पक्का होईल आणि दुसऱ्या कोणत्याही कपड्यावर तो रंग लागणार नाही.
२. कपड्यांचा रंग जाऊ नये म्हणून ते धुताना पाण्यात तुरटी आणि जाडे मीठ मिसळल्याने फायदा तर होतो, परंतु या उपायाने कपडे थोडे कडक होतात. यासाठी अशा कडक झालेल्या कपड्यांना मऊमुलायम करण्यासाठी आणखी एक स्टेप करणे आवश्यक आहे. एक बादली पाण्यात २ चमचे व्हिनेगर घाला आणि कपड्यांना यात अर्धा तास भिजवून ठेवा. व्हिनेगर कपड्यांना मऊ बनवण्यासोबतच त्यांचा रंग आणखी टिकाऊ बनवते. यानंतर कपड्यांना हलक्या उन्हात वाळवून घ्या.
कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक-टळेल धोका....
कपड्यांचा रंग कायम टिकून राहावा म्हणून खास टिप्स...
१. नवीन कपडे, विशेषतः गडद रंगाचे कपडे, पहिल्यांदा किंवा पहिल्या काही वेळा इतर कपड्यांपासून वेगळे धुवा.
२. कपडे धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा. गरम पाण्यामुळे कपड्यांचे धागे सैल होतात आणि रंग लवकर सुटतो.
३. कपडे धुण्यापूर्वी त्यांची आतील बाजू बाहेर करा. यामुळे धुताना आणि वाळवताना कपड्याच्या बाहेरील भागावर कमी घासले जाते आणि रंग टिकून राहतो.
४. कपडे वाळवताना त्यांना थेट कडक उन्हात वाळवू नका. थेट सूर्यप्रकाशामुळे रंग फिके पडतात. कपड्यांना सावलीत किंवा उलट्या बाजूने वाळवा.
