Lokmat Sakhi >Social Viral > 83 सिनेमातला दीपिकाचा कातील लूक पाहिला? बॉबकट ते बेलबॉटम, एटीजवाली फॅशन पुन्हा चर्चेत

83 सिनेमातला दीपिकाचा कातील लूक पाहिला? बॉबकट ते बेलबॉटम, एटीजवाली फॅशन पुन्हा चर्चेत

83 चित्रपटातला (Movie 83) दीपिकाचा (Deepika Padukon) लूक तुम्ही पाहिला का, चित्रपटाचा ट्रेलर जेवढा गाजतो आहे, तेवढीच चर्चा दीपिकाच्या या चित्रपटातल्या लूकची होते आहे... ८० च्या दशकात भारतात असणारी उच्चभ्रु महिलांची फॅशनची दुनियाच (fashion world)जणू या चित्रपटातून दिसणार आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 04:55 PM2021-11-30T16:55:23+5:302021-11-30T16:56:34+5:30

83 चित्रपटातला (Movie 83) दीपिकाचा (Deepika Padukon) लूक तुम्ही पाहिला का, चित्रपटाचा ट्रेलर जेवढा गाजतो आहे, तेवढीच चर्चा दीपिकाच्या या चित्रपटातल्या लूकची होते आहे... ८० च्या दशकात भारतात असणारी उच्चभ्रु महिलांची फॅशनची दुनियाच (fashion world)जणू या चित्रपटातून दिसणार आहे...

Deepika Padukone plays the role of Romi Dev in the movie 83.. her look and fashion in 80's is very much catchy | 83 सिनेमातला दीपिकाचा कातील लूक पाहिला? बॉबकट ते बेलबॉटम, एटीजवाली फॅशन पुन्हा चर्चेत

83 सिनेमातला दीपिकाचा कातील लूक पाहिला? बॉबकट ते बेलबॉटम, एटीजवाली फॅशन पुन्हा चर्चेत

Highlightsहल्ली असा हेअरकट चुकूनही दिसत नाही. पण हा चित्रपट रिलिज झाल्यानंतर मात्र असा हेअरकट चांगलाच हिट होऊ शकतो.. 

रणवीर सिंग (Ranveer singh)आणि दीपिका पदूकोन यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या 83 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आणि बघता बघता तुफान व्हायरल (viral) झाला. १९८३ साली कपिल देव (kapil dev)आणि त्यांच्या टिमने वर्ल्डकप (world cup)जिंकून रचलेला इतिहास म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब. म्हणूनच तर चित्रपटाचा अवघा एक- दिड मिनिटाचा ट्रेलरही क्रिकेट वेड्या भारतीयांना प्रचंड आवडला आहे. ट्रेलर रिलिज झाल्यानंतर अवघ्या काही तासातच या व्हिडियोला लाखो लाईक्स मिळाले आहेत. कपिल देव आणि त्यांची टिम, ऐन सामन्याच्या वेळी वाढणारी उत्कंठा हे सगळं तर ट्रेलरमध्ये दिसलंच, पण त्यासोबतच आणखी एका गोष्टीने जबरदस्त लक्ष वेधून घेतलं. ती गोष्ट म्हणजे दीपिकाचा ८० च्या दशकातला लूक (Deepika's look)...

 

या चित्रपटात दीपिका कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांच्या भूमिकेत आहे. रोमीचा तेव्हाचा थाट, फॅशन सेन्स आणि कपडे, हेअरस्टाईल यातला बदल चित्रपटात दाखविणे खरोखरंच कसबीचं काम. पण हे चॅलेंज चित्रपटाच्या फॅशन डिझायनरने उत्तमरित्या पेललं आणि म्हणूनच दीपिकाचा एक साधा लूकही आपल्याला थेट २०२१ मधून १९८३ सालात घेऊन जातो.. दीपिकाचे कपडे, तिचे दागिने, न्यूड मेकअप हे सगळं तर तिच्या लूकचा महत्त्वपूर्ण भाग आहेच, पण सगळ्यात उठून दिसली आहे ती तिची हेअरस्टाईल.. या चित्रपटात दीपिकाचा रोमी यांच्यासारखा बॉबकट असून तिचा हा हेअरकट खरोखरंच ८० च्या दशकाची आठवण करून देतो.. हल्ली असा हेअरकट चुकूनही दिसत नाही. पण हा चित्रपट रिलिज झाल्यानंतर मात्र असा हेअरकट चांगलाच हिट होऊ शकतो.. 

 

अशी दाखवली आहे दिपिकाची ८० च्या दशकातली फॅशन 
Fashion in 80's

- या चित्रपटाचा एक सीन ट्रेलरमध्ये दाखविण्यात आला आहे. यामध्ये दीपिकाने पुर्ण बंद गळ्याचे आणि मोठ्या बाह्या असणारे काळ्या रंगाचे टॉप घातले आहे. स्वेटशर्ट असंही आपण याला म्हणू शकतो. अशा पद्धतीचे स्वेटशर्ट आताही आहेत, पण स्वेटशर्टसोबत तिने घातलेली हाय वेस्ट पॅन्ट ही अगदी त्या काळचीच फॅशन.
- या संपूर्ण चित्रपटात दीपिकाचा मेकअप कुठेही खूप ग्लॉसी दाखविण्यात आलेला नाही. प्रत्येक ठिकाणी तिचा मेकअप अतिशय सोबर असून बऱ्याच प्रमाणात तो न्यूड मेकअपकडे झुकलेला आहे. ज्यामुळे तिचा चेहरा अधिकाधिक नॅचरल लूक असणारा दिसत आहे.
- रोमीच्या भुमिकेसाठी या चित्रपटांत खूप दागदागिनेही वापरण्यात आलेले नाहीत. मोत्यांचे छोटे कानातले आणि गळ्यातही मोत्याची सर बऱ्याच सीनमध्ये दिपिकाच्या अंगावर दिसून आले. यातून आपसूकच दीपिकाचा त्या काळच्या उच्चभ्रु, खानदानी आणि फॅशनेबल महिलांचा लूक शोभून दिसत आहे. 


- ट्रेलरमध्ये दीपिका एकदा साडीतही दिसते आहे आणि एकदा पंजाबी ड्रेसमध्येही. ब्लाऊज आणि पंजाबी ड्रेसचा गळा मागच्या बाजूने पुर्ण बंद असून समोरच्या बाजूने यु कट वाटावा असा डिप आहे. ब्लाऊज आणि ड्रेस दोन्हीच्या बाह्या कोपरापर्यंत लांब आहेत. ही स्टाईल दीपिकाला खूपच शोभून दिसत असून हेअर स्टाईलप्रमाणे आता अशा गळ्याच्या ब्लाऊजची आणि ड्रेसची फॅशन पुन्हा आल्यास आश्चर्य वाटायला नको. 
 

Web Title: Deepika Padukone plays the role of Romi Dev in the movie 83.. her look and fashion in 80's is very much catchy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.