Lokmat Sakhi >Social Viral > पाण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतो? पाहा तज्ज्ञांनी सुचवलेली बाटली धुण्याची एक सोपी ट्रिक

पाण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतो? पाहा तज्ज्ञांनी सुचवलेली बाटली धुण्याची एक सोपी ट्रिक

Kitchen Hacks: फ्लाक्स किंवा बॉटल्समध्ये पाणीच नाही तर अनेकदा लस्सी, ताक किंवा ज्यूसही स्टोर केला जातो. ज्यामुळे बॉटलमधून वास येतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:22 IST2025-06-23T11:30:18+5:302025-06-23T15:22:53+5:30

Kitchen Hacks: फ्लाक्स किंवा बॉटल्समध्ये पाणीच नाही तर अनेकदा लस्सी, ताक किंवा ज्यूसही स्टोर केला जातो. ज्यामुळे बॉटलमधून वास येतो.

Chef Pankaj Bhadouria shares easy trick to remove odor from flask and bottles | पाण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतो? पाहा तज्ज्ञांनी सुचवलेली बाटली धुण्याची एक सोपी ट्रिक

पाण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतो? पाहा तज्ज्ञांनी सुचवलेली बाटली धुण्याची एक सोपी ट्रिक

Kitchen Hacks: प्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लोकांना किचन आणि खाण्या-पिण्यासंबंधी वेगवेगळ्या टिप्स देत असतात. अलिकडे शेअर केलेल्या एका व्हिडिओत त्यांनी बॉटलमधून येणारा वास कसा दूर करावा याबाबत माहिती दिली आहे. फ्लाक्स किंवा बॉटल्समध्ये पाणीच नाही तर अनेकदा लस्सी, ताक किंवा ज्यूसही स्टोर केला जातो. ज्यामुळे बॉटलमधून वास येतो. तसेच डिटॉक्स वॉटर, चहा किंवा कॉफीचा देखील वास लवकर जात नाही. अशात शेफ पंकज यांनी सांगितलेली एक ट्रिक फायदेशीर ठरू शकते. 

बॉटलचा वास कसा घालवाल?

पाण्याची बॉटल किंवा फ्लाक्समधून वास दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जाऊ शकतो. शेफ पंकज यांनी सांगितलं की, एक चमचा व्हाइट व्हिनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिक्स करा. हे मिश्रण बॉटलमध्ये टाका आणि बॉटल चांगली हलवा. नंतर बॉटल साध्या पाण्यानं चांगली धुवा. बॉटलचा वास निघून जाईल.

इतरही काही उपाय

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरशिवाय लिंबाचा रसही बॉटलची वास घालवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यासाठी बॉटलमध्ये लिंबाचा रस टाका आणि थोडं पाणी टाकून बॉटलचं झाकण बंद करा. नंतर बॉटल चांगली हलवा आणि पाण्यानं धुवून घ्या. 

टी बॅग्स सुद्धा खूप फायदेशीर ठरतात. पाण्याची बॉटल किंवा फ्लास्क ज्याचा वास घालवयचा असेल त्यात पाणी आणि टी बॅग टाकून रात्रभर ठेवा. सकाळी हे पाणी फेका. वास दूर झालेला असेल. 
 

Web Title: Chef Pankaj Bhadouria shares easy trick to remove odor from flask and bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.