Lokmat Sakhi >Shopping > रेडिमेड फॅशनेबल ब्लाऊज ऑनलाइन खरेदी करताय? या ५ गोष्टी चेक केल्या का?

रेडिमेड फॅशनेबल ब्लाऊज ऑनलाइन खरेदी करताय? या ५ गोष्टी चेक केल्या का?

Online shopping : टेलरकडे कापड घेऊन जा, मापे द्या, ब्लाऊज (readymade blouse) शिवायला टाका.... ही कटकटचं नको म्हणून अनेक जणी रेडिमेड ब्लाऊज ऑनलाईन मागवतात. पण ब्लाऊजची ऑनलाईन खरेदी करण्यापुर्वी या ५ गोष्टी (must verify 5 rules)नक्कीच तपासून पहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 04:48 PM2021-11-29T16:48:09+5:302021-11-29T16:49:30+5:30

Online shopping : टेलरकडे कापड घेऊन जा, मापे द्या, ब्लाऊज (readymade blouse) शिवायला टाका.... ही कटकटचं नको म्हणून अनेक जणी रेडिमेड ब्लाऊज ऑनलाईन मागवतात. पण ब्लाऊजची ऑनलाईन खरेदी करण्यापुर्वी या ५ गोष्टी (must verify 5 rules)नक्कीच तपासून पहा...

Online shopping for readymade blouse? you must check these 5 things | रेडिमेड फॅशनेबल ब्लाऊज ऑनलाइन खरेदी करताय? या ५ गोष्टी चेक केल्या का?

रेडिमेड फॅशनेबल ब्लाऊज ऑनलाइन खरेदी करताय? या ५ गोष्टी चेक केल्या का?

Highlightsकाही गोष्टींची काळजी घ्या. म्हणजे मग ऑनलाईन खरेदीचा हा प्रयत्न आपल्या अंगलट येणार नाही आणि घरबसल्या छान खरेदी झाल्याचा आनंदही मिळेल. 

आजकाल सगळंच कसं ऑनलाईन झालं आहे. शिक्षणही ऑनलाईन, कामंही ऑनलाईन तशी आता खरेदीही ऑनलाईन. मोबाईलवर शॉपिंग साईट्स (shopping sites) सर्च करायच्या, त्यातून आपल्याला हवी ती वस्तू निवडायची आणि फटाफट ऑर्डर देऊन मोकळं व्हायचं... एवढं सगळं सोपं झालं आहे. म्हणूनच तर आता कपड्यांची खरेदीही बऱ्याचदा ऑनलाईन केली जाते. अगदी ब्लाऊजचीही.. तुम्हालाही टेलरकडे कापड घेऊन जा, मापे द्या, ब्लाऊज शिवायला टाका, पुन्हा ब्लाऊज घ्यायला एक चक्कर मारा.. अशी सगळी कटकटचं नको असेल, तर तुम्हीही रेडिमेड फॅशनेबल ब्लाऊज ऑनलाईन मागवू शकता. फक्त त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्या. म्हणजे मग ऑनलाईन खरेदीचा हा प्रयत्न आपल्या अंगलट येणार नाही आणि घरबसल्या छान खरेदी झाल्याचा आनंदही मिळेल. 

 

साड्यांवर (saree and blouse)जे ब्लाऊजपीस येतं, ते त्याच साडीवर चालू शकतं. ते ब्लाऊज दुसऱ्या कोणत्या साडीवर घालण्याचा आपण विचारही करू शकत नाही. पण वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये येणारे रेडिमेड ब्लाऊज मात्र आपण दोन- तीन साड्यांवर नक्कीच घालू शकतं. त्यामुळे पैशांची बचत या दृष्टीकोनातून जरी विचार केला तरी रेडिमेड ब्लाऊज घेणं फायद्यात जातं.. हा फायदा तेव्हाच मिळू शकतो, जेव्हा ब्लाऊजची निवड आपण काळजीपुर्वक करतो. 

 

ऑनलाईन रेडिमेड ब्लाऊज खरेदी करताना या ५ गोष्टी तपासा
१. साईजचा अंदाज परफेक्ट हवा (blouse size)

ब्लाऊजची मजा तेव्हाच येते, जेव्हा ते अगदी व्यवस्थित फिटिंगला बसतं. ढिलं, सैलसर ब्लाऊज महागड्या साडीचा सगळा लूक बिघडवून टाकू शकतं. म्हणूनच तर अजूनही अनेक जणी रेडिमेड ब्लाऊजची ऑनलाईन खरेदी करताना घाबरतात. त्यामुळेच रेडिमेड ब्लाऊज खरेदी करताना त्याचे माप अगदी अचूक निवडण्यासाठी तुम्हाला आधी तुमचे माप माहिती पाहिजे. सामान्यपणे ब्रा ची साईज आणि ब्लाऊजची साईज एकसारखी मानली जाते. त्यामुळे तुमच्या ब्रा चे अचूक माप माहिती करा आणि त्यानुसार ब्लाऊज मागवा. साईटवर दिलेल्या साईज चार्टची मदतही तुम्ही घेऊ शकता. 

२. साडीचा कपडा आणि ब्लाऊजचा कपडा जाणून घ्या (fabric of blouse and saree)
ब्लाऊजचा रंग, डिझाईन साडीपेक्षा वेगळं असलं तरी चालतं. मात्र ब्लाऊज आणि साडीचा कपडा एकमेकांशी मिळता जुळताच हवा. त्यामुळे ब्लाऊजचा कपडा कसा आहे, तो साडीसोबत मॅच होईल ना, याचा बारकाईने अंदाज घ्या आणि त्यानंतरच ब्लाऊजची ऑर्डर द्या.

 

३. स्टार आणि रिव्ह्यू बघा... (star and reviews)
कोणत्याही गोष्टीची ऑनलाईन खरेदी करताना या दोन गोष्टी सगळ्यात आधी तपासल्या पाहिजेत. बऱ्याचदा ब्लाऊजचा डिस्प्ले फोटो आणि वास्तवातले ब्लाऊज यात खूप मोठा फरक असतो. त्यामुळे जरी डिस्प्ले फोटोमध्ये ब्लाऊज खूप छान दिसत असले, तरी त्या ब्लाऊजला आधीच्या ग्राहकांकडून मिळालेले स्टार बघा आणि रिव्ह्यू काळजीपुर्वक वाचा. ग्राहकांनी ब्लाऊजचे फोटोही टाकलेले असतात. ते सगळे फोटोही काळजीपुर्वक बघा. यातूनच ब्लाऊजचे कापड, रंग याचा अचूक अंदाज येतो.

४. ब्लाऊजची उंची बघा.. (height of blouse)
ज्यांची उंची खूप जास्त किंवा खूप कमी आहे, अशा महिलांसाठी रेडिमेड ब्लाऊजची उंची हा कधीकधी तापदायक विषय ठरू शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी ब्लाऊजची उंची तपासा. तुमचे जे इतर ब्लाऊज आहेत, त्याच्याशी मिळती- जुळती उंची असेल, तरच खरेदी करा. अन्यथा खूप उंच किंवा खूपच उंचीने कमी असणारे ब्लाऊज अजिबात शोभून दिसत नाहीत.

 

५. रिर्टन पॉलिसी बघा (return policy for online shopping)
ऑनलाईन वस्तू खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये, म्हणून हा मुद्दा सगळ्यात आधी तपासून पहावा. जर ब्लाऊज आपल्याला हवे तसे नसले, तर ते बदलून घेता येते. त्यामुळे ज्या ब्लाऊजला रिटर्न पॉलिसी आहे, असेच ब्लाऊज घेण्यास प्राधान्य द्यावे. 
 

Web Title: Online shopping for readymade blouse? you must check these 5 things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.