Lokmat Sakhi >Shopping > गोड आंबा कसा ओळखावा? ५ सोप्या ट्रिक्स! आंबे खरेदी करताना लक्षात ठेवा, खरेदी होईल चवदार

गोड आंबा कसा ओळखावा? ५ सोप्या ट्रिक्स! आंबे खरेदी करताना लक्षात ठेवा, खरेदी होईल चवदार

Tips To Buy Sweet Mango: आंबे गोड निघतच नाहीत.. ही अनेक जणांची तक्रार. म्हणूनच तर आंब्याची निवड कशी करायची, म्हणजे ते हमखास गोड निघतील, यासाठी जाणून घ्या हे खास तंत्र..(how to identify ripen mango?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 05:44 PM2022-05-17T17:44:03+5:302022-05-17T17:47:11+5:30

Tips To Buy Sweet Mango: आंबे गोड निघतच नाहीत.. ही अनेक जणांची तक्रार. म्हणूनच तर आंब्याची निवड कशी करायची, म्हणजे ते हमखास गोड निघतील, यासाठी जाणून घ्या हे खास तंत्र..(how to identify ripen mango?)

Mango Shopping: 5 Tips to understand whether mango in sweet and ripen or not  | गोड आंबा कसा ओळखावा? ५ सोप्या ट्रिक्स! आंबे खरेदी करताना लक्षात ठेवा, खरेदी होईल चवदार

गोड आंबा कसा ओळखावा? ५ सोप्या ट्रिक्स! आंबे खरेदी करताना लक्षात ठेवा, खरेदी होईल चवदार

Highlightsया काही ट्रिक्स वापरून पहा. आंब्यांचं गणित थोडं समजून घ्या.म्हणजे मग आपली आंबा खरेदी अगदी उत्तम, गोड आणि चवदार होईल..

सध्या आंब्यांचा सिझन. वर्षातून खरेतर दिड- दोन महिनेच मिळणारं हे फळ. त्यामुळे सिझन असेपर्यंत भरपूर आंबे खाऊन घ्यावेत, असं सगळ्यांनाच वाटतं. आपण भरपूर उत्साहाने बाजारात आंबे खरेदी (buying mango) करायला जातो. विक्रेता आपल्याला आंब्याची एक फोड चाखायला देतो आणि खूप गोड आहेत, असं सांगतो. आपणही त्याच्यावर विश्वास ठेवतो कारण त्याने दिलेली फोड खरोखरच गोड, चवदार असते. मग काय भरपूर आंबे घेऊन घरी येतो. उत्साहाने खायला बसतो, पण हाय रे देवा.. अगदी एखाद दुसरा सोडला तर सगळेच आंबे नुसते आंबट ढॅण निघालेले असतात..

 

आंबे खरेदीसाठी गेलेल्या प्रत्येकाने थोड्याफार फरकाने हा अनुभव घेतलेलाच असतो. त्यामुळे मग खरं तर खूप हिरमोड होतो.. चांगला आंबा तर चाखायला मिळतच नाही, वर पुन्हा एवढे मोठे पैसेही वाया जातात. त्यामुळेच तर आता असे नुकसान पुन्हा व्हायला नको, यासाठी या काही ट्रिक्स वापरून पहा. आंब्यांचं गणित थोडं समजून घ्या. म्हणजे मग आंबाविक्रेत्याने आपल्याला त्याच्या गोड बोलण्यात कितीही आणण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्यात अडकणार नाही आणि आपली आंबा खरेदी अगदी उत्तम, गोड आणि चवदार होईल..

 

गोड, चवदार आंबा ओळखण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स 
१. आंब्याची सगळ्यात पहिली ओळख म्हणजे त्याचा सुगंध. जर आंब्यातून सुगंध येत असेल तरच तो आंबा खाण्यायोग्य आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवला आहे, हे लक्षात घ्या. आंबा दिसायला केशरी आहे, पण सुगंध येत नसेल तर असे आंबे घेणं टाळा. कारण ते आंबे रासायनिक पदार्थ टाकून पिकवलेले असण्याची शक्यता अधिक आहे.
२. सुगंधानंतर आंब्याचा स्पर्श कसा जाणवतो ते बघा. आंबा हाताला थोडासा मऊसर लागायला हवा. तरच तो घेण्यायोग्य आहे.


३. आंब्याचा रंगही अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या आंब्याचा रंग मध्येच कुठेतरी हिरवा आणि बाकी ठिकाणी पिवळट केशरी दिसतो, आहे, असे आंबे घेणं टाळा. ते आंबट निघतात. ज्या आंब्यांचा रंग सगळ्याच बाजूने एकसारखा असतो, ते आंबे गोड निघतात.
४. ज्या आंब्याचा एखादाच भाग मऊ आणि उर्वरित भाग कडक असतो, असे आंबे घेऊ नका. ते सडके निघण्याची शक्यता जास्त असते. 
५. आंबा पिकला आहे की नाही, हे पाहण्यासाठी आंब्याचा खालचा भाग म्हणजे देठ जिथे असतं, त्याच्या अगदी विरुद्ध भाग हलकासा दाबून पहा. जर हा भाग सहज दाबला गेला, तर आंबा पिकला आहे, असे समजावे. असा आंबा गोड निघतो. 


 

Web Title: Mango Shopping: 5 Tips to understand whether mango in sweet and ripen or not 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.