Lokmat Sakhi >Shopping > दिवाळीत टेरेसमध्ये लायटिंग डेकोरेशनच्या ८ जबरदस्त कल्पना; असा झगमगाट की दिवाळी होईल स्पेशल!

दिवाळीत टेरेसमध्ये लायटिंग डेकोरेशनच्या ८ जबरदस्त कल्पना; असा झगमगाट की दिवाळी होईल स्पेशल!

दिवाळीच्या सजावटीत टेरेसला विसरुन मुळीच जमत नाही. म्हणूनच तर खास दिवाळीसाठी अशा खास पद्धतीने सजवा तुमचं टेरेस.... टेरेसमध्येही करून टाका दिव्यांचा झगमगाट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 06:59 PM2021-10-25T18:59:56+5:302021-10-25T19:08:16+5:30

दिवाळीच्या सजावटीत टेरेसला विसरुन मुळीच जमत नाही. म्हणूनच तर खास दिवाळीसाठी अशा खास पद्धतीने सजवा तुमचं टेरेस.... टेरेसमध्येही करून टाका दिव्यांचा झगमगाट.

8 Great Ideas for Lighting Decoration in Diwali Terrace; Such a blaze that Diwali will be special! | दिवाळीत टेरेसमध्ये लायटिंग डेकोरेशनच्या ८ जबरदस्त कल्पना; असा झगमगाट की दिवाळी होईल स्पेशल!

दिवाळीत टेरेसमध्ये लायटिंग डेकोरेशनच्या ८ जबरदस्त कल्पना; असा झगमगाट की दिवाळी होईल स्पेशल!

Highlightsटेरेस डेकोरेशन करताना जेवढी जागा आपल्याकडे आहे, तिचा आपण खूप छान उपयोग करणार आहोत हे पक्क मनाशी ठरवून घ्या आणि आता त्यानुसार तयारीला लागा. 

हल्ली मोठ्या शहरांमध्ये जमिनीवरचं, अंगण असलेलं टुमदार घर हे एक स्वप्न्च झालं आहे. दिवाळी किंवा कोणता सण- समारंभ असेल किंवा पाहुणे येणार असतील, तर अशा अंगणाची खूपच आठवण येते. पण अंगणाची आठवण येऊन असं खट्टू होऊ नका. मोकळंचाकळं अंगण नसलं म्हणून काय झालं. आपलं मोकळं आकाश दाखविणारी आणि आपल्या हक्काची बाल्कनी किंवा टेरेस तर आपल्याला आहेच ना? याच टेरेसमध्ये, बाल्कनीमध्ये तुमची कलाकुसर दाखवा आणि अगदी कमी पैशात तुमच्या या बाल्कनीचं रूपडं पालटवून टाका. यावर्षी दिवाळीत अशा पद्धतीने टेरेस डेकोरोशन करा आणि तुमच्या घराचा कोपरा न कोपरा उजळवून टाका. 

 

टेरेस डेकोरेशन करताना सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात पक्की फिक्स करून टाका. ते म्हणजे जर जागा मोठी असेल, तरच छान डेकोरेशन करता येतं, असं मुळीच नसतं. खूप लोक असतात जे टेरेस डेकोरेशनचा विषय काढताच म्हणतात की इथे तर एवढीशीच जागा. एवढ्याश्या जागेत कसं काय सजावट करायची, मोठी जागा असेल तर डेकोरेशन केलं असतं, असा विचार करून ही मंडळी अजिबातच हालचाल करत नाहीत आणि जेवढी केवढी जागा उपलब्ध आहेत, ती देखील धड उपयोगात आणत नाहीत. म्हणूनच टेरेस डेकोरेशन करताना जेवढी जागा आपल्याकडे आहे, तिचा आपण खूप छान उपयोग करणार आहोत हे पक्क मनाशी ठरवून घ्या आणि आता त्यानुसार तयारीला लागा. 

 

असं करा टेरेस डेकोरेशन
१. दिवाळीला अनेक घरांमध्ये रंगकाम करतात. जर तुम्ही घरामध्ये रंग देणार असाल तर टेरेसदेखील रंगवून घ्या. पण जर घरात रंग देणार नसाल तरी देखील टेरेसपुरता रंग आणा एक मस्त ब्रश आणा आणि आपलं आपण टेरेस छान रंगवून घ्या. टेरेस रंगवलं की ते छान फ्रेश दिसतं. त्यामुळे टेरेस रंगवण्यापासून आपल्या टेरेस डेकोरेशनची एक चांगली सुरुवात करता येईल.
२. टेरेसमध्ये कुंड्या असतील तर त्या एकदा मस्त स्वच्छ धुवून पुसून चकाचक करून घ्या. तुटलेल्या कुंड्या बदलून टाका. टेरेसमध्ये छान एकसारख्या कुंड्या असतील तर त्याचा लूक आणखी छान येतो. 


३.दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक शहरातल्या ज्या नर्सरी असतात, त्याठिकाणी मातीच्या अनेक सजावटीच्या वस्तू विकायला येत असतात. यामध्ये मातीचे वेगवेगळ्या आकारातले कंदील, दिवे खूप छान मिळतात. आपल्या टेरेसमध्ये आपण किती ठेवू शकतो, त्यानुसार या कंदीलाची, मातीच्या दिव्यांची खरेदी करा. हे दिवे जर वर टांगता येत असतील, तर तसे टांगा. कारण यामुळे टेरेसला खूपच छान लूक मिळतो.
४. अशा मातीच्या दिव्यांमध्ये ठेवायला बॅटरीवर चालणाऱ्या पणत्या आणा. एक पणती साधारण १० ते १५ रूपयाला मिळते आणि ती जवळपास ३० ते ३५ तास चांगली चालते. अशा पणत्या जर या कंदिलात ठेवल्या तर कंदिल दूरुन पाहिले तरी खूपच आकर्षक दिसतात. 


५. टेरेसच्या एका कोपऱ्यात एक छान पितळी किंवा तांब्याचं मोठं बाऊल किंवा गंगाळ ठेवा. या बाऊलमध्ये पाणी टाका. पाण्यात गुलाबाच्या किंवा झेंडूच्या पाकळ्या टाका आणि त्यामध्ये फ्लोटिंग कॅण्डल ठेवा. असे एकसारखे गंगाळ किंवा बाऊल तुमच्याकडे एकपेक्षा जास्त असतील तर टेरेसमधील दोन- तीन कोपरे तुम्ही अशा पद्धतीने उजळवून टाकू शकता.


६. दिवाळीच्या दिवसात तुमच्या टेरेसला झेंडूच्या माळांची मस्त महिरप करायला विसरू नका. बाजारात कृत्रित झेंडूच्या फुलांच्या अनेक आकर्षक माळा उपलब्ध असतात. या माळा आणा आणि सगळ्या बाजूने टेरेसला छान तोरण लावून सजवून टाका.
७. टेरेसला जर ग्रील असेल तर त्यावर एखादी एलईडी लाईटींग गुंडाळून टाका.
८. प्रत्येक कुंडीत झाडाच्या मुळाशी तुम्ही इलेक्ट्रिक कॅण्डल ठेवू शकता. ही कॅण्डल फ्लेमलेस असल्याने ती झाडांना कोणतंही नुकसान करत  नाही. या कॅण्डलजर प्रत्येक कुंडीत ठेवल्या तर निश्चितच प्रत्येक झाड उजळून निघाल्याचा भास होतो. 

 

Web Title: 8 Great Ideas for Lighting Decoration in Diwali Terrace; Such a blaze that Diwali will be special!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.