lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > काय सांगता, रोमान्स लिव्ह? पगारही कापला जाणार नाही, बायकोची आठवण आली तर मिळणार सुटी!

काय सांगता, रोमान्स लिव्ह? पगारही कापला जाणार नाही, बायकोची आठवण आली तर मिळणार सुटी!

Romance leave to office workers :कर्मचारी वर्षाला 10 सुट्ट्या या कारणासाठी घेऊ शकतात. या सुट्ट्यामध्ये जोडप्यांना पगाराचं टेंशन न घेता रोमान्स करता येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 04:57 PM2021-08-22T16:57:54+5:302021-08-25T14:06:53+5:30

Romance leave to office workers :कर्मचारी वर्षाला 10 सुट्ट्या या कारणासाठी घेऊ शकतात. या सुट्ट्यामध्ये जोडप्यांना पगाराचं टेंशन न घेता रोमान्स करता येणार आहे.

Romance leave : Japan will give romance leave to office workers, salaries will not be deducted | काय सांगता, रोमान्स लिव्ह? पगारही कापला जाणार नाही, बायकोची आठवण आली तर मिळणार सुटी!

काय सांगता, रोमान्स लिव्ह? पगारही कापला जाणार नाही, बायकोची आठवण आली तर मिळणार सुटी!

Highlightsकार्यालयात काम करणाऱ्या जोडप्यांना 10 दिवसांची प्रजनन रजा देण्याची योजना सरकारने आखली आहे. जेणेकरून जोडप्यांचा पगार कापला जाणार नाही. कर्मचारी वर्षाला 10 सुट्ट्या या कारणासाठी घेऊ शकतात. या सुट्ट्यामध्ये जोडप्यांना पगाराचं टेंशन न घेता रोमान्स करता येणार आहे.

ऑफिसला जाणारा प्रत्येकजण सुट्टीसाठी आठवडाभर थांबतो. त्यातही सुट्टीच्या दिवशी काही काम निघालं तर सुट्टी इन्जॉय करण्यासाठी पुन्हा तेवढेच दिवस वाट पाहावी लागते. लोक सुट्ट्यांचा आनंद घेण्याची व्यवस्थित प्लॅनिंग करतात. पण एक असाही देश आहे जिथे ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना आपल्या पत्नीसह एकत्र वेळ घालवण्यासाठी  सुट्टी दिली जाते. वाचून तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. कमी लोकसंख्येमुळे  जपानी सरकार अडचणीत आहे.

कार्यालयात काम करणाऱ्या जोडप्यांना 10 दिवसांची प्रजनन रजा देण्याची योजना सरकारने आखली आहे. जेणेकरून जोडप्यांचा पगार कापला जाणार नाही. ही सुट्टी ऑफर जपानमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. जपान कमी लोकसंख्येच्या संकटातून जात आहे.

जपानची लोकसंख्या 126 दशलक्षांपेक्षा कमी आहे. त्याच वेळी, जपानचा प्रजनन दर सुमारे 1.4% आहे. म्हणून जपान सरकार जोडप्यांना कुटुंब वाढवण्याचे आवाहन करत आहे. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रजननासाठी सुट्टी देत आहेत. 

ही योजना काय आहे?

जपानमधील सर्व कार्यालयांमध्ये जोडप्यांना ही रजा दिली जाईल. कर्मचारी वर्षाला 10 सुट्ट्या या कारणासाठी घेऊ शकतात. या सुट्ट्यामध्ये जोडप्यांना पगाराचं टेंशन न घेता रोमान्स करता येणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी त्याचा पगार कापला जाणार नाही.

जपान लोकसंख्येच्या संकटातून जात आहे. त्यातही जपानमधील वृद्ध लोकसंख्या तरुण लोकसंख्येपेक्षा खूप मोठी आहे. जर हे असेच चालू राहिले तर 2040 पर्यंत जपानच्या एकूण लोकसंख्येच्या 5% लोक  वृद्ध असतील. जपानने तांत्रिकदृष्ट्या खूप सुधारणा केली आहे परंतु  कमी लोकसंख्येमुळे भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.

तरुण जोडप्यांना अधिक मुले होण्यासाठी सरकार आग्रह करत आहे. आकडेवारीनुसार, जपानी जोडप्यांना काम करायची फारशी इच्छा नाही आणि मुलांना एकत्र येऊन काम करायचे आहे. म्हणूनच जपान सरकारला ही योजना आणावी लागली.

Web Title: Romance leave : Japan will give romance leave to office workers, salaries will not be deducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.