sameera-reddys-latest-instagram-post is all about girl child | समीरा रेड्डीची पोस्ट वाचा, डोळ्यात नक्की पाणी येईल!
समीरा रेड्डीची पोस्ट वाचा, डोळ्यात नक्की पाणी येईल!

ठळक मुद्देमुलींचं आईपण करणार्‍या एका अभिनेत्रीचं समृद्ध शेअरिंग

-सखी ऑनलाइन टीम

समीरा रेड्डी म्हटलं की काहींना तिच्या रेस, दे दनादण या सिनेमातल्या उल्लू भूमिका आठवत असतील. पण नव्वदच्या दशकात जेव्हा व्हीडीओ अल्बमचा दौर नव्यानं आला होता. तेव्हा पंकज उधासच्या एका गाण्यातली ती लाजरी, हसरी, रोमॅण्टिक मुलगी मात्र वेगळी दिसत होती. ‘अरे, अहिस्ता किजिए बाते, धडकने कोई सून रहा होगा.’ ही गजल ऐकून त्याकाळी अनेकांच्या काळजात रोमॅण्टिक सर निनादून गेली असेल. त्या गाण्यातली लांबसडक केसांतीली समीरा रेड्डी अजूनही आठवणीत आहे. तर आज त्याच मुलीचं हे एक वेगळं रुप, आता आई म्हणून ती लेकीचे लाडकोड करतेय तेव्हा तिची ‘मन की बात’ तिनं चाहत्यांसह तिच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर शेअर केली आहे.
आणि ते तिचं म्हणणं नक्कीच सर्वाच्या आणि तमाम आयांच्याही काळजाला हात घालणारं आहे.

आपल्या लेकीसह पोस्ट केलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये समीरा म्हणते, ‘आपली एक लेक आहे हा आनंदच किती मोठा आहे. मला कळत नाही आपल्या देशात का लोक मुलींना ओझं मानत होते. मी ‘होते’ असा भूतकाळ वापरतेय कारण हळूहळू का होईना ही मनोवृत्ती बदलते आहे. अर्थात अजूनही कानावर येतंच की, मोठय़ा शहरांत राहणारी बडी कुटुंबही पहिला मुलगाच व्हावा म्हणून आतूर झालेली असतात. अजून त्यांना वाटतं की पहिला मुलगाच झालेला बरा. पण मी माझ्या अनुभवावरुन सांगेन की, आमच्या घरात आम्ही तिघीही मुलीच. पण आमच्या सार्‍या खानदानात आम्ही तिघी बहिणींनी मिळून जितकं कर्तृत्व केलं, नाव कमावलं तेव्हा तर कदाचित कुणी मुलगाही कमावू शकला नसता!’


तिच्या या पोस्टचं चाहत्यांनी उमदेपणानं स्वागत केलं आणि लेक असणं, आई होणं हे किती सुंदर, किती मायेचं नातं आहे याविषयी मनमोकळं केलं. समीरा आता सिनेमे करत नसली तरी तिच्या आईपणाचा प्रवास ती असा शेअर करतेय, समृद्धपणे वाटून घेतेय पालकत्वाचा प्रवास!

Web Title: sameera-reddys-latest-instagram-post is all about girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.