नाश्त्यात करा ‘हा’ लहानसा बदल- वजन भरभर कमी होईल, सगळेच विचारतील तुमचं वेटलॉस सिक्रेट...

Updated:June 13, 2025 18:43 IST2025-06-12T17:06:38+5:302025-06-13T18:43:08+5:30

नाश्त्यात करा ‘हा’ लहानसा बदल- वजन भरभर कमी होईल, सगळेच विचारतील तुमचं वेटलॉस सिक्रेट...

वाढतं वजन कसं नियंत्रित ठेवावं हा प्रश्न सध्या अनेक लोकांना छळतो आहे. काही जण नियमितपणे व्यायाम आणि डाएटिंग करून वजन कमी करतात. पण काही लोकांना मात्र ना उपाशी राहायला जमतं ना त्यांना व्यायामासाठी वेळ काढता येतो.

नाश्त्यात करा ‘हा’ लहानसा बदल- वजन भरभर कमी होईल, सगळेच विचारतील तुमचं वेटलॉस सिक्रेट...

तुमचंही असंच असेल तर रोजच्या नाश्त्यामध्ये काही बदल करून पाहा (simple changes in breakfast that leads to fast weight loss). यामळे वाढलेलं वजन कमी होण्यासाठी निश्चितच मदत होईल. ते बदल नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ लीमा महाजन यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(5 amazing indian breakfast recipe for fast weight loss and fat burn)

नाश्त्यात करा ‘हा’ लहानसा बदल- वजन भरभर कमी होईल, सगळेच विचारतील तुमचं वेटलॉस सिक्रेट...

त्यापैकी पहिला बदल म्हणजे जर तुम्ही नाश्त्याला इडली चटणी खात असाल तर चटणीच्या ऐवजी भरपूर भाज्या घातलेलं सांबार खा. यामुळे इडली थोडी कमी खाल्ली जाईल आणि भाज्यांमधून चांगल्या प्रमाणात फायबर मिळेल.

नाश्त्यात करा ‘हा’ लहानसा बदल- वजन भरभर कमी होईल, सगळेच विचारतील तुमचं वेटलॉस सिक्रेट...

ओट्स आणि फळं असं खाण्याऐवजी चिया सीड्स पुडींग आणि हंगामी फळं असं कॉम्बिनेशन करू शकता.

नाश्त्यात करा ‘हा’ लहानसा बदल- वजन भरभर कमी होईल, सगळेच विचारतील तुमचं वेटलॉस सिक्रेट...

बटाट्याची भाजी आणि डोसा असं खाण्याच्या ऐवजी मुगाच्या डाळीचा डोसा करा आणि त्यात पनीरचं स्टफिंग असू द्या. यामुळे प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात मिळतील.

नाश्त्यात करा ‘हा’ लहानसा बदल- वजन भरभर कमी होईल, सगळेच विचारतील तुमचं वेटलॉस सिक्रेट...

उपमा हा पदार्थ बहुसंख्य भारतीयांच्या नाश्त्यामध्ये असतो. रव्याचा उपमा करण्याऐवजी बाजरी किंवा ज्वारीच्या पिठाचा उपमा करा. किंवा रव्याचा उपमा केला तरी त्यात भरपूर प्रमाणात भाज्या घाला.

नाश्त्यात करा ‘हा’ लहानसा बदल- वजन भरभर कमी होईल, सगळेच विचारतील तुमचं वेटलॉस सिक्रेट...

डाेसा, थालिपीठ, पराठा खाण्याऐवजी मुगाच्या डाळीच्या पिठाचं किंवा हरबऱ्याच्या डाळीच्या पिठाचं धीरडं करून खा. त्यामुळे रक्तातील साखरेचेे प्रमाण नियंत्रित राहण्यास तर मदत होतेच, पण चांगल्या प्रमाणात प्रोटीन्सही मिळतात.