कायम सुदृढ राहायचंय तर रोजच्या आहारात हव्यातच 10 गोष्टी; लक्षात ठेवा आहार हेच औषध

Published:June 21, 2022 03:59 PM2022-06-21T15:59:46+5:302022-06-21T16:14:15+5:30

आजार टाळायचे तर पोषक आहार (Nutritious diet) महत्त्वाचा आणि पोषक आहारात 10 गोष्टींचा ( healthy food) समावेश हवाच!

कायम सुदृढ राहायचंय तर रोजच्या आहारात हव्यातच 10 गोष्टी; लक्षात ठेवा आहार हेच औषध

सुदृढ राहायचं तर संतुलित आहार आवश्यक आयुर्वेदात रोजच्या आहारात पोषक आहाराला महत्व दिलं आहे. पोषक पदार्थांमुळे पेशींचं आणि ऊतींचं पोषण होतं. पोषक आहार हा मर्यादित प्रमाणात घेतल्यास त्याचा लाभ शरीराला होतो असं म्हटलं आहे. आयुर्वेद तज्ज्ञ डाॅ. वरलक्ष्मी यनामंद्र यांच्या मते पोषक आहार शरीरातील वात, पित्त, कफ हे तीन दोष संतुलित ठेवण्याचं काम करतो. या तीन दोषांचं शरीरातील संतुलन बिघडलं की आजार निर्माण होतात. आजार टाळायचे असतील तर पोषक आहार महत्त्वाचा. आणि पोषक आहारात डाॅ. वरलक्ष्मी यनामंद्र यांच्या मते 10 गोष्टींचा समावेश हवा.

कायम सुदृढ राहायचंय तर रोजच्या आहारात हव्यातच 10 गोष्टी; लक्षात ठेवा आहार हेच औषध

हातसडीचा तांदूळ: पांढऱ्या भाताच्या तुलनेत हातसडीचा लाल तांदळात पोषक मूल्यं अधिक असतात. हातसडीच्या तांदळात लोह, मॅग्नीज, मॅग्नेशियम, ॲण्टिऑक्सिडण्टस आणि फ्लेवोनाॅइड्स यांचं प्रमाण चांगलं असतं. हे घटक चयापचय क्रियेचा वेग वाढवतात. शरीराच्या पेशी सुदृढ राहातात. तसेच हातसडीच्या तांदळातील हे घटक वजन नियंत्रित ठेवतात. मधुमेह, ह्दयाचे आजार, श्वसनासंबंधीचे आजार यांचा धोका कमी करतात. शरीरावरील सूज,ॲलर्जी , मुक्त मुलकांचा सामना करण्यासाठी हे घटक महत्वाचे असतात.

कायम सुदृढ राहायचंय तर रोजच्या आहारात हव्यातच 10 गोष्टी; लक्षात ठेवा आहार हेच औषध

हिरवे मूग: हिरव्या मुगाच्या डाळीत ( मुगाच्या सालीच्या डाळीत) प्रथिनं, पोटॅशियम, फाॅस्फरस, मॅग्नेशियम, लोह, बी 6जीवनसत्व, नियासिन, थायमिन आणि फोलेट हे घटक असतात. हिरव्या मुगामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं. हिरवे मूग सेवन केल्यास पचन सुधारतं. शरीराला पोषण देवून आजारांचा धोका कमी करण्यासाठी आहारात हिरेवे मूग असणं महत्वाचं मानलं जातं.

कायम सुदृढ राहायचंय तर रोजच्या आहारात हव्यातच 10 गोष्टी; लक्षात ठेवा आहार हेच औषध

साजूक तूप: साजूक तुपात आरोग्यदायी फॅट्स असतात. तसेच यात जीवनसत्वं, ॲण्टिऑक्सिडण्टस, ओमेगा 3, कन्जुगेटेड आइनोलिक ॲसिड यांचं प्रमाण चांगलं असतं. साजूक तुपातील या पोषक घटकांंमुळे मेंदूचं आरोग्य चांगलं राहातं. वजन कमी होतं, वजन नियंत्रित राहातं. दृष्टी सुधारते. गंभीर आजारांचा धोका कमी करण्याचं काम साजूक तुपातील पोषक घटक करतात.  

कायम सुदृढ राहायचंय तर रोजच्या आहारात हव्यातच 10 गोष्टी; लक्षात ठेवा आहार हेच औषध

आवळा: आवळ्यामध्ये क जीवनसत्वं असतं. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. त्वचा, केस, पोटाशी निगडित समस्या दूर करण्याचे गुणधर्म आवळ्यामध्ये असतात. आवळ्याचं नियमित सेवन केल्यानं हाडं मजबूत होतात. आवळ्यामुळे मधुमेह, रक्तदाब आणि ह्दयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

कायम सुदृढ राहायचंय तर रोजच्या आहारात हव्यातच 10 गोष्टी; लक्षात ठेवा आहार हेच औषध

गायीचं ए2 दूध: गायीचं ए2 दूध आरोग्यास पोषक मानलं जातं. ए2 हा घटक देशी गायीच्या दुधात आढळतो. ए1 जातीच्या दुधापेक्षा ए2 दुधात प्रथिनं आणि पोषक घटक जास्त असतात. हे घटक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतत आणि आरोग्याचं गंभीर आजारांपासून संरक्षण करतात.

कायम सुदृढ राहायचंय तर रोजच्या आहारात हव्यातच 10 गोष्टी; लक्षात ठेवा आहार हेच औषध

जव: जवामधील गुणधर्म आरोग्यासाठी महत्वाचे मानले जातात. जवामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. जवामुळे वजन कमी होतं , पचन व्यवस्था सुधारते. जवामध्ये उष्मांक, प्रथिनं, कॅल्शियम, फॅट्स,लोह, कर्बोदकं, फाय्बर, मॅग्नेशियम, फाॅस्फरस आणि पोटॅशियम हे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रोजच्या आहारात जव असण्याला महत्व आहे.

कायम सुदृढ राहायचंय तर रोजच्या आहारात हव्यातच 10 गोष्टी; लक्षात ठेवा आहार हेच औषध

मध: मधामध्ये सूजविरोधी, ॲण्टि सेप्टिक आणि जिवाणूरोधक गुणधर्म असतात. मधामध्ये क, ब6 जीवनसत्वं, कर्बोदकं, अमीनो ॲसोड यासारखे पोषक घटक असतात. मधातील गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. मधामुळे सर्दी, खोकला सारखे संसर्गजन्य आजार रोखले जातात.

कायम सुदृढ राहायचंय तर रोजच्या आहारात हव्यातच 10 गोष्टी; लक्षात ठेवा आहार हेच औषध

डाळिंबं: डाळिंबामध्ये ॲण्टि व्हायरल आणि ॲण्टि बॅक्टेरियल गुणधर्म असतात. डाळिंबातील हे घटक आजारांपासून आरोग्याचं रक्षण करतात. डाळिंबाच्या दाण्यात ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण जास्त असतात. डाळिंबामुळे त्वचेचा रंग उजळतो. डाळिंबाच्या सेवनामुळे रक्ताची कमतरता दूर होते.

कायम सुदृढ राहायचंय तर रोजच्या आहारात हव्यातच 10 गोष्टी; लक्षात ठेवा आहार हेच औषध

सैंधव मीठ: नेहमीच्या पांढऱ्या मिठाच्या तुलनेत सैंधव मीठ फायदेशीर असतं.  सैंधव मिठात खनिजं जास्त असतात. ही खनिजं आजारांपासून संरक्षण करतात. सैंधव मीठ गुणानं थंडं असतं. सैंधव मिठामुळे शरीरातील उष्णता कमी होते. सैंधव मिठामुळे पित्त दोष दूर होतो.

कायम सुदृढ राहायचंय तर रोजच्या आहारात हव्यातच 10 गोष्टी; लक्षात ठेवा आहार हेच औषध

मनुके: मनुके खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हाडं मजबूत होतात. पचन सुधारण्यास, वजन नियंत्रित ठेवण्यास मनुक्यातील गुणधर्म फायदेशीर ठरतात. लैंगिक आजार बरे करण्यास मनुके फायदेशीर ठरतात.