मटार सोलायचं किचकट काम होईल सोपं; ७ ट्रिक्स, झटपट सोलून होतील २ किलोभर मटार
Updated:December 7, 2025 23:58 IST2025-12-07T23:15:54+5:302025-12-07T23:58:49+5:30
How To Peel Green Peas Faster : मटारच्या शेंगा सोलण्यापूर्वी १० ते १५ मिनिटं फ्रिजरमध्ये ठेवा. थंडीमुळे शेंगांचे कवच आकसते आणि मटार लवकर सुटे होतात.

मटार सोलायला वेळ लागतो आणि हातालाही त्रास होतो. हे काम पटापट पूर्ण करण्यासाठी खालील ८ ते १० सोप्या ट्रिक्स वापरू शकता. (How To Peel Green Peas Faster)
मटारच्या शेंगा गरम पाण्यात फक्त २ ते ३ मिनिटं बुडवून ठेवा. या शेंगाचे बाह्य कवच मऊ पडते आणि मटार सहज बाहेर येतात.
मटारच्या शेंगा सोलण्यापूर्वी १० ते १५ मिनिटं फ्रिजरमध्ये ठेवा. थंडीमुळे शेंगांचे कवच आकसते आणि मटार लवकर सुटे होतात.
शेंगांच्या एका टोकावर किंचित कट मारा आणि मग शेंगा दाबून मटार बाहेर काढा.
शेंगांच्या मध्यभागी हलकं दाबा. यामुळे शेंगा उघडायला लागतात आणि मटार बाहेर काढणं सोपं होतं.
शेंगा उघडण्यासाठी नखांऐवजी अंगठ्याच्या बाजूचा वापर करा. यामुळे नखांना त्रास होणार नाही आणि शेंगा लवकर उघडतील.
बाजारातून मोठ्या आणि जाड शेंगा निवडा. लहान शेंगांपेक्षा त्या लवकर सोलल्या जातात.
शेंगांना टेबलाच्या किंवा काऊंटरच्या कडांवर किंचिंत दाबून बाजूनं रोल करा. यामुळे शेंगांचे जोड तुटतात आणि त्या लवकर उघडतात.