आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी

Published:June 27, 2022 03:39 PM2022-06-27T15:39:16+5:302022-06-27T15:50:47+5:30

Alia Bhat Ranbir Kapoor Good News : लग्नाला दोन महिने होताच दिली गोड बातमी, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी

आलिया भट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपे आहे. दोन महिन्यांपूर्वीच एप्रिल २०२२ मध्ये या दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याच्या आणाभाका घेत लग्नाच्या गाठी बांधल्या (Alia Bhat Ranbir Kapoor Good News).

आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी

लग्नाला अवघे दोन महिनेच होत असताना आता आलियाने आपल्याकडे गुड न्यूज असल्याचे सांगितले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास फोटो शेअर करत आलियाने ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आणि चाहत्यांनी आणि बॉलिवूडमधील दिग्गजांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी

आलिया आणि रणबीर यांची केमिस्ट्री आपल्या सगळयांनाच माहित असून हे दोघेही एकमेकांसाठीच बनलेले आहेत असे त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटते. या दोघांच्या लग्नाची, त्यांच्या लूकची सगळीकडे जोरदार चर्चा झाली होती. यावेळी आलिया आणि रणबीर यांचा जोडा खूपच सुंदर दिसत होता.

आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी

मागील ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेले हे क्यूट कपल लग्न कधी करणार याबाबत चाहत्यांना खूप उत्सुकता होती. अखेर दोन महिन्यांपूर्वी लग्नाची गाठ बांधत त्यांनी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. आता त्यांच्या या संसारवेलीवर एक फूल येणार असल्याने त्यांचे कुटुंबिय आणि चाहते खूप खुश आहेत.

आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी

या दोघांनीही आपल्या उत्तम अभिनयाने चाहत्यांच्या मनात जागा तयार केली आहे. तर आलिया लहान वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली आणि अभिनयाने स्वत:चे स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी

आलिया आता २९ वर्षांची असून ३० वर्षाच्या आत आई होण्याची कपूर घराण्याची परंपरा आलियाने कायम राखली आहे. मात्र आई झाल्यावर आलिया आपली अभिनयाची कारकिर्द सुरू ठेवणार की बाळाला आणि कुटुंबाला वेळ देणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी

गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय नाजूक आणि सुंदर गोष्ट असते. या गोष्टीचा तिचा अनुभव घेणे आणि नव्याने येणारी ही जबाबदारी उत्तमरित्या सांभाळणे हे आव्हान हे क्यूट कपल कसे पेलणार असा प्रश्न आता चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी

रणबीर सध्या आपल्या शमशेरा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र सोनोग्राफीसाठी हे दोघे सोबत गेल्याचे आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे. स्क्रीनवर सोनोग्राफीचे रिपोर्ट दिसत असून रणबीर आणि आलिया अतिशय उत्सुकतेने स्क्रीनकडे पाहत असल्याचे दिसते. आलियाने या स्क्रीनवर मोठा लाल हार्ट टाकला आहे.