फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर

Updated:December 2, 2025 17:15 IST2025-12-02T17:08:31+5:302025-12-02T17:15:36+5:30

सोशल मीडियावर फ्रिजला जास्त मॅग्नेट लावल्याने वीज बिल वाढतं असा दावा केला जात आहे.

फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर

लोक अनेकदा आपला फ्रिज सजवण्यासाठी किंवा फोटो चिटकवण्यासाठी मॅग्नेट लावतात. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर फ्रिजला जास्त मॅग्नेट लावल्याने वीज बिल वाढतं असा दावा केला जात आहे.

फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर

काही लोकांना असं वाटतं की, मॅग्नेट फ्रिजच्या काम करण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणतात. तर काही व्हिडिओंमध्ये असा दावा केला आहे की मॅग्नेट फ्रिजवर जास्त प्रेशर आणतात, ज्यामुळे वीज बिल वाढतं. याबाबत जाणून घेऊया...

फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर

वेल्स ऑनलाइनच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, स्पेनची मोठी वीज कंपनी, एंडेसाने स्पष्टपणे म्हटलं आहे की, हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांच्या मते, फ्रिजवरील लहान मॅग्नेटचं चुंबकीय क्षेत्र इतकं कमकुवत आहे की ते फ्रिजच्या दारातून आत जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याचा वीज वापरावर कोणताही परिणाम होत नाही.

फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर

जगप्रसिद्ध कंपनी एलजीने असं म्हटलं की, फ्रिजच्या बाहेर मॅग्नेट ठेवल्याने विजेचा वापर वाढत नाही, फ्रिजचं लाईफ कमी होत नाही किंवा अन्नपदार्थ लवकर खराब होत नाही. ही फक्त एक अफवा आहे.

फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर

व्हर्लपूलने देखील मान्य केलं आहे की, फ्रिजवर लावलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक मॅग्नेटमुळे वीज बिल वाढत नाही. कंपनीने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला.

फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर

काही मॅग्नेट वापरणं ही समस्या नाही, परंतु जास्त वजनदार मॅग्नेट वापरल्याने दरवाजावरचं वजन वाढू शकतं. कालांतराने दरवाजा सैल होऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो.

फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर

जर तुम्ही तुमच्या फ्रिजला रिमाइंडर्स चिकटवण्यासाठी मॅग्नेट वापरत असाल तर हे करणं टाळा. कॉर्क बोर्ड, मॅग्नेटिक बोर्ड किंवा चॉकबोर्ड वापरा. ​​हे भिंतीवर लावता येतात आणि फ्रिज स्वच्छ ठेवता येतो.