मंगळसूत्राच्या २ वाट्या सासर माहेरची खूण! नव वधूसाठी घ्या छोटं वाटी मंगळसूत्र; १० युनिक पॅटर्न्स
Updated:December 2, 2025 10:11 IST2025-12-02T09:32:06+5:302025-12-02T10:11:03+5:30
Vati Mangalsutra For Newly Married Gold Short Mangalsutra : वाट्यांमध्येही बरेच प्रकार असतात तुम्हाला आवडेल तो पॅटर्न तुम्ही निवडू शकता.

लग्न म्हटलं की मंगळसूत्राची खरेदी आलीच बरेचजण मोठ्या मंगळसूत्रासोबतच लहान मंगळसूत्रसुद्धा बनवून घेतात.छोट्या मंगळसूत्राचे काही युनिक, नवीन पॅटर्न्स पाहूयात.(Short Vati Mangalsutra Designs)
लहान मंगळसूत्रात कितीही नवीन पॅटर्न आले तरी वाट्यांचं मंगळसूत्र एव्हरग्रीन आहे. संस्कृती जपणारं वाट्यांचं मंगळसूत्र आजही मुलींना तितकंच आवडतं. (Vati Mangalsutra For Newly Married)
छोट्या मंगळसूत्रात तुम्हाला एकापेक्षा एक नवीन डिझाईन्सस मिळतील त्यासोबतच अगदी कमी ग्रॅममध्ये मिनिमलिस्टिक डिझाइन्सही उपलब्ध होतील. (Vati Mangalsutra Designs)
वाट्यांमध्येही बरेच प्रकार असतात तुम्हाला आवडेल तो पॅटर्न तुम्ही निवडू शकता. हे पॅटर्न ऑफिसवेअरसाठीही सुंदर दिसेल.
सध्या नववधूंमध्ये छोटे आणि नाजूक डिझाईन्स असलेले मंगळसूत्र खूपच लोकप्रिय आहेत.
सोन्याच्या वाट्या मंगळसूत्राचा अत्यावश्यक भाग आहेत. पारंपारीक दोन वाट्या ज्या सासर-माहेरची खूण म्हणून ओळखल्या जातात.
छोटे मंगळसूत्र ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी आरामदायक असतात आणि ते वेस्टर्न तसंच भारतीय अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांवर शोभून दिसतात.
मंगळसूत्राची डिझाईन निवडताना वधूची आवड आणि तिच्या व्यक्तीमत्वाला साजेसा नमुना निवडा.
सिंपल गोल वाट्या न निवडता तुम्ही अशा डिझाईन्स घेऊ शकता ज्या फॅन्सी लूक देतील.
वाट्यांच्या खाली काळ्या मण्यांचे लटकन असतील तर या डिझाईन्ससुद्धा उत्तम दिसतात.