शॉर्ट फुग्यांच्या बाह्यांचे शिवा ब्लाऊज; ८ नवे पॅटर्न्स, ब्लाऊज सुंदर दिसेल-युनिक लूक मिळेल
Updated:December 2, 2025 20:49 IST2025-12-02T20:35:23+5:302025-12-02T20:49:59+5:30
Short Puff Arms Blouse Designs : पार्टीवेअर किंवा स्टायलिश साड्यांसाठी ही अधुनिक डिझाईन वापरली जाते.

सध्या फॅशनमध्ये असलेल्या आणि साडीला आकर्षक लूक देणाऱ्या ब्लाऊजच्या फुग्याच्या शॉर्ट बाह्यांच्या काही लोकप्रिय डिझाईन्स आणि त्यांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. (Short Puff Arms Blouse Designs)
फुग्यांच्या बाह्या या नेहमीच क्लासिक आणि ट्रेंडी असतात. बाह्यांना व्हॉल्यूम आणि आकर्षकता देण्यासाठी याचा वापर केला जातो. (Short Puff Sleeves Blouse Designs)
क्लासिक कफ पफ स्लिव्हज ही सर्वात सामान्य आणि लोकप्रिय डिझाईन आहे. यामध्ये बाहीच्या वरच्या बाजूला भरपूर प्लेट्स किंवा चुण्या घेतल्या जातात.
रोजच्या वापरातील कॉटन आणि साध्या सिल्क साड्यांसठी उत्तम ठरते.
या डिझाईन्समध्ये फुगा केवळ वरच्या बाजूला नसतो तर बाहीच्या संपू्र्ण मध्यभागाला व्हॉल्यूम दिला जातो.
बाहीचा आकार फुग्यासारखा किंवा गोल दिसतो बाहीच्या तोंडावर बारीक इलास्टीक किंवा डोरी वापरली जाते.
ऑर्गेंझा किंवा सेमी शिअर फ्रॅब्रिकमध्ये ही डिझाईन अधिक आकर्षक दिसते.
या बाह्यांचा फुगा केवळ चुण्यांनी न बनवता बाहीच्या तोंडाजवळ आणि कधी कधी खांद्यावजळ स्ट्रेचेबल टेक्स्चर दिले जाते.