साडी नीट नेसता येत नाही? रेडी टू वेअर साड्यांचे १० डिझाईन्स, ८०० रूपयांच्या आत सुंदर साड्या
Updated:December 7, 2025 16:25 IST2025-12-07T16:03:22+5:302025-12-07T16:25:41+5:30
Ready To Wear Saree Collection : काही रेडी टू वेअर साड्यांमध्ये पदरही फिक्स केलेला असतो. या साड्या तुम्हाला मापानुसार शिवलेल्या असल्यानं त्यांचे फिटिंग खूपच चांगले बसते.

रेडी टू वेअर साडी म्हणजे तयार निऱ्या शिवलेली साडी आजकाल बरीच प्रसिद्ध होत आहे. कारण ज्यांना साडी अजिबात नेसता येत नाही त्यांच्यासाठी ही साडी उत्तम पर्याय आहे. (Ready To Wear Saree Collection)
साडी नेसण्यात बराचवेळ जातो तर काहीजण व्यवस्थित वेळ काढून साडी नेसतात. तरीही फिनिशिंग व्यवस्थित येत नाहीत. यावर उपाय म्हणून तुम्ही रेडी टू वेअर साडी नेसू शकता. (Ready To Wear Saree For Daily Use And Office Wear)
या साड्या परिधान करायला अगदी ड्रेस घालण्या इतक्या सोप्या असतात. साडी नेसण्यात जो वेळ आणि मेहनत लागते ती रेडी टू वेअर साड्यांमुळे वाचते.
यात पारंपारीक साडीचा आकर्षक लूक मिळतो पण ती नेसण्याची गुंतागुंत नसते. या साड्यांना झिप, हूक किंवा इलास्टिक बॅण्ड दिलेला असतो.
पहिल्यांदाच साडी नेसणाऱ्यांसाठी हा खूपच आरामदायक प्रकार आहे. या साडीमुळे तुम्हाला झटपट तयार होण्यास मदत होईल.
सध्या बाजारात विविध प्रकारच्या आणि डिझाईन्सच्या रेडी टू वेअर साड्या उपलब्ध आहेत.
तुम्ही पार्टीवेअर किंवा दैनंदिन वापरासाठी अशा साड्या निवडू शकता. या साड्यांमुळे साडी नेसण्याची काळजी न करता तुम्ही आत्मविश्वासानं साडी नेसू शकता.
काही रेडी टू वेअर साड्यांमध्ये पदरही फिक्स केलेला असतो. या साड्या तुम्हाला मापानुसार शिवलेल्या असल्यानं त्यांचे फिटिंग खूपच चांगले बसते.
जॉर्जेट, कॉटन, लिनन, शिफॉन अशा फॅब्रिक्समध्ये डिझायनर काम केलेले प्रकार मिळतात.
तुम्ही ऑफिसवेअरसाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी अशा साड्या नेसू शकता.