Join us
Daily Top 2 Weekly Top 5

होणाऱ्या नवरीकडे असायलाच हव्या ५ प्रकारच्या बांगड्या, पाहा कोणत्या प्रसंगी कोणती बांगडी घालावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2025 16:18 IST

1 / 7
लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर आपल्याकडे एवढे लहान- मोठे कार्यक्रम असतात, की त्यासाठी नवरीला पारंपरिक पद्धतीने तयार व्हावेच लागते. आता पारंपरिक पद्धतीने तयार व्हायचे म्हटलं की हातात बांगड्या आल्याच..
2 / 7
म्हणूनच होणाऱ्या नवरीकडे वेगवेगळ्या बांगड्यांचे कलेल्शन असायलाच हवे. जेणेकरून तिला प्रसंगानुसार साजेशा बांगड्या घालता येतील.
3 / 7
लग्नानंतरच्या वेगवेगळ्या पूजा, धार्मिक कार्यक्रम असतील तर त्यासाठी काठपदर साडी नेसली जाते आणि काठपदर साडीवर काचेच्या बांगड्याच उठून दिसतात. त्यामुळे साड्यांवर मॅचिंग होणाऱ्या वेगवेगळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हव्या.
4 / 7
लग्नानंतर काही नातेवाईकांच्या भेटीगाठी असतील किंवा एखाद्या छोट्या कार्यक्रमाला जायचं असेल तर अशावेळी बऱ्याचदा थ्रेड वर्क, मिरर वर्क केलेल्या बांगड्या परफेक्ट मॅच ठरतात. या बांगड्या तुम्ही साडी किंवा ड्रेसवरही घालू शकता.
5 / 7
रोज हातात घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गोठ तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवा. काचेचे, मेटलचे, मोत्याचे असे कोणतेही गोठ घेऊ शकता.
6 / 7
ऑक्सिडाईज बांगड्यांचा एक सेटही आपल्याकडे असायलाच हव्या. कारण चंदेरी बॉर्डर असणाऱ्या कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर त्या शोभून दिसतात. हल्ली खण साडी किंवा कॉटन साडीवर ऑक्सिडाईज बांगड्या घालण्याचाच ट्रेण्ड आहे.
7 / 7
हल्ली वेल्वेटच्या बांगड्यांचाही खूप ट्रेण्ड आहे. ट्रेण्डी विथ ट्रॅडिशन असा लूक करायचा असेल तर वेल्वेटच्या बांगड्या शोभून दिसतात.
टॅग्स : शुभविवाहखरेदीदागिनेफॅशनस्टायलिंग टिप्स