Aryan Khan Drug Case : ...या खास व्यक्तीकडून अनन्या पांडे घेते लव्ह लाईफचे सल्ले; बघा कोण ती महत्त्वाची व्यक्ती?

Published:October 21, 2021 05:27 PM2021-10-21T17:27:13+5:302021-10-21T18:18:09+5:30

Aryan Khan Drug Case : Ananya Panday says she goes to BFF Shanaya Kapoor for love advice

Aryan Khan Drug Case : ...या खास व्यक्तीकडून अनन्या पांडे घेते लव्ह लाईफचे सल्ले; बघा कोण ती महत्त्वाची व्यक्ती?

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) चौकशी दरम्यान एका उद्योन्मुख अभिनेत्रीचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर आज एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी चंकी पांडेची लेक अभिनेत्री अनन्या पांडेच्या (Ananya Panday) घरावरही छापा मारला.

Aryan Khan Drug Case : ...या खास व्यक्तीकडून अनन्या पांडे घेते लव्ह लाईफचे सल्ले; बघा कोण ती महत्त्वाची व्यक्ती?

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेला चौकशीसाठीचे समन्स धाडले आहेत. यानिमित्तानं अन्यना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनन्या पांडे हिच्यासोबत आर्यन खान (Aryan Khan) आणि सुहाना खानचे (Suhana Khan) फोटो नेहमी सोशल मीडियावर येत असतात. यामध्ये ती खान कुटुंबाबरोबर किती गहरी दोस्ती आहे हे सांगत असते. आर्यन-अनन्या यांनी एकाच शाळेत, एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे.

Aryan Khan Drug Case : ...या खास व्यक्तीकडून अनन्या पांडे घेते लव्ह लाईफचे सल्ले; बघा कोण ती महत्त्वाची व्यक्ती?

अनन्याला सुहानाचा भाऊ म्हणजेच आर्यन खानच्या व्हॉट्सअप चॅटवरून चौकशीला बोलविण्यात आले आहे. आर्यन-अनन्यामध्ये घरी ड्रग्ज असल्यावरून चॅट झाले होते. ते एनसीबीच्या हाती लागले आहेत. यामुळे एनसीबीने आज आर्यन खान आणि अनन्याच्या घरी छापा टाकला. सुहाना सध्या अमेरिकेत आहे.

Aryan Khan Drug Case : ...या खास व्यक्तीकडून अनन्या पांडे घेते लव्ह लाईफचे सल्ले; बघा कोण ती महत्त्वाची व्यक्ती?

अनन्या पांडे एका मुलाखीतदरम्यान म्हणाली होती की, ती तिची सर्वात चांगली मैत्रिण शनाया कपूरकडून लव्ह लाईफचे सल्ले घेते. जरी ती 'खूप वाईट व्यक्ती' असली तरी. अनन्याने शनायाकडून तिला मिळालेला सर्वोत्तम रिलेशनशिप सल्ल्यांबाबतही सांगितले होते.

Aryan Khan Drug Case : ...या खास व्यक्तीकडून अनन्या पांडे घेते लव्ह लाईफचे सल्ले; बघा कोण ती महत्त्वाची व्यक्ती?

फीट अप विथ द स्टार्सच्या कार्यक्रमादरम्यान अनन्या पांडे म्हणाली की, ''जेव्हा मला रिलेशनशिपविषयी सल्ला हवा असतो तेव्हा शनाया कपूर तीथे असते. ती खूप 'वाईट' व्यक्ती आहे पण तरीही मी तिच्याकडे जाते. तिने मला दिलेला सर्वोत्तम प्रेमाचा सल्ला म्हणजे शांत होणे आणि वेडेपणा करणे थांबवणे. मला अजूनही ते पाळण्याची गरज आहे,''

Aryan Khan Drug Case : ...या खास व्यक्तीकडून अनन्या पांडे घेते लव्ह लाईफचे सल्ले; बघा कोण ती महत्त्वाची व्यक्ती?

शोमध्ये अनन्याने शनाया आणि सुहाना खान यांच्यासोबतच्या संबंधांचाही खुलासा केला. तिनं सांगितलं की, ''आम्ही लहानपणापासून चांगले मित्र आहोत. माझ्या कुटुंबात फक्त ४ लोक आहेत असं मला वाटत नाही. माझे खूप मोठे कुटुंब आहे कारण मी सुहाना आणि शनायाच्या आसपास वाढले आहे आणि आमच्या खूप आठवणी आहेत.

Aryan Khan Drug Case : ...या खास व्यक्तीकडून अनन्या पांडे घेते लव्ह लाईफचे सल्ले; बघा कोण ती महत्त्वाची व्यक्ती?

शनायाची आई (महीप कपूर) जेव्हा गर्भवती होती. तेव्हाही मी तिच्या आईजवळ खेळायचे, त्यामुळे मला असं वाटतं शनायाचा जन्म होण्यापूर्वीपासून माझा तिच्याशी संबंध आहे.''

Aryan Khan Drug Case : ...या खास व्यक्तीकडून अनन्या पांडे घेते लव्ह लाईफचे सल्ले; बघा कोण ती महत्त्वाची व्यक्ती?

अनन्याने असंही सांगितलं की, जेव्हा ती लहान होती तेव्हा सुहाना आणि शनायासह 'आई, आई' खेळायची. ज्यामध्ये ते एकमेकांच्या आईचे अनुकरण करायचे.'' - भावना पांडे, गौरी खान आणि महिप कपूर.

Aryan Khan Drug Case : ...या खास व्यक्तीकडून अनन्या पांडे घेते लव्ह लाईफचे सल्ले; बघा कोण ती महत्त्वाची व्यक्ती?

अनन्या पुरी जगन्नाथच्या लिगर या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. ज्यात विजय देवरकोंडा एक बॉक्सर म्हणून दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये रिलीज होईल.

Aryan Khan Drug Case : ...या खास व्यक्तीकडून अनन्या पांडे घेते लव्ह लाईफचे सल्ले; बघा कोण ती महत्त्वाची व्यक्ती?

याच वर्षी जानेवारीमध्ये अनन्या पांडे तिचा तथाकथित प्रियकर ईशान खट्टरसोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसली. दोघेही नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मालदीवला पोहोचले होते. या दरम्यान, अनन्या बिकिनीमध्ये दिसली, तर ईशान देखील त्याच्या टोन्ड बॉडीला फ्लॉन्ट करताना दिसला.