Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

Published:November 22, 2021 07:34 PM2021-11-22T19:34:25+5:302021-11-22T19:58:25+5:30

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल हे अजय देवगणचे पहिले प्रेम होते असे तुम्हाला वाटते का? बॉलीवूडमध्ये हिरो-हिरोईनमधील अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो, परंतु अशा प्रेमकथांबद्दल लोकांना क्वचितच माहिती असेल.

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

अॅक्शन असो की कॉमेडी, प्रत्येक पात्रात स्वत:ला सर्वोत्कृष्ट सिद्ध करणारं बॉलीवूडचं जोडपं अजय देवगण आणि काजोल नेहमीच चर्चेत असतात. आजच अजय देवगणने बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण केली आहेत. यावेळी अक्षय कुमारने जुने दिवस आठवत अजय देवगणला शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमारशिवाय अमिताभ बच्चन यांनीही अजय देवगणचे अभिनंदन केले आहे.

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अजय देवगणने चित्रपटसृष्टीत 30 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्तानं आम्ही तुम्हाला अजय काजोलच्या लव्ह लाईफबद्दल सांगणार आहोत. अजय देवगण आणि काजोल यांचं लव्ह मॅरेज झालं होता. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सध्या दोघांचा 'तानाजी' हा चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटाला खूप चांगले रिव्ह्यू मिळाले.

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

अजय देवगण आणि काजोलची प्रेमकहाणी इतर प्रेमकथांपेक्षा थोडी वेगळी आहे. अजय देवगण हा खूप शांत स्वभावाचा तरी सेटवर त्याच्याशी कोणीही त्याची चेष्टा करू शकत नव्हते. अजय देवगण आणि काजोल हे एकमेकांच्या अगदी विरुद्ध असले तरी बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट आहे. 24 फेब्रुवारी 1999 रोजी अजय आणि काजोलचे लग्न झाले होते. त्यावेळी काजोल 25 वर्षांची होती आणि तिचे बॉलीवूडमधील करिअर उंच भरारी घेत होते आणि अजय देवगणचे करिअर चांगले चालले होते परंतु काजोलसारखे नव्हते.

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

एका मुलाखतीत काजोलने खुलासा केला होता की तिला करिअरमध्ये विराम गॅप हवा होता. याच कारणामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. काजोलने सांगितले की, तिने लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ती जवळपास 9 वर्षे बॉलिवूडमध्ये काम करत होती. दरवर्षी 4-5 चित्रपट येत होते. पैसा, प्रसिद्धी आणि यश सर्वकाही होते पण स्वत:साठी ना वेळ होता ना शांतता. मोठा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ होती. त्यावेळी काजोलने ठरवले की ती ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याशीच लग्न करेल आणि योग्य वेळी करेल.

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

अजय देवगण आणि काजोलच्या प्रेमकथेची सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे दोघांनीही एकमेकांना प्रपोज केले नव्हते पण दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याचे दोघांनाही ठाऊक होते. बॉलीवूडमध्ये अशी लव्हस्टोरी दुसरी कोणाचीही नसेल. अजय आणि काजोलच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली आहेत, पण अजय चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी संघर्ष करत असताना काजोलने अजयला आपला साथीदार म्हणून निवडले.

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

अजय आणि काजोल जवळ येण्याची कहाणीही खूप रंजक आहे. 'हॉस्टेल' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काजोल आणि अजय एकमेकांच्या जवळ आले आणि बघता बघता त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी 1999 मध्ये लग्न केले. या बॉलिवूड स्टार जोडप्याला न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत.

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

काजोल हे अजय देवगणचे पहिले प्रेम होते असे तुम्हाला वाटते का? बॉलीवूडमध्ये हिरो-हिरोईनमधील अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो, परंतु अशा प्रेमकथांबद्दल लोकांना क्वचितच माहिती असेल. अजय आणि काजोलची प्रेमकहाणी तेव्हा सुरू झाली जेव्हा अजय चित्रपटांमध्ये संघर्ष करत होता पण काजोलने एक खास स्थान निर्माण केले होते. फूल और कांटे या चित्रपटात अभिनय केलेल्या अजयचे एकेकाळी बॉलिवूडची नंबर वन अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत संबंध होते.

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

बॉलीवूडच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर ही जोडी त्या काळात सर्वात हॉट कपल मानली जात होती. त्यावेळी मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा करिश्मा अजयच्या आयुष्यात आली तेव्हा अजय रवीना टंडनला डेट करत होता. म्हणजे अजयने काजोलच्या आधी करिश्मा आणि रवीनाला डेट केले होते.

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपे अजय आणि काजोल यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव न्यासा देवगण आणि मुलाचे नाव युग देवगण आहे. हे दोघेही अनेकदा पालकांसोबत स्पॉट झाले असले तरी आई-वडील नेहमीच त्यांना या स्पॉट लाइटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अजय आणि काजोलने परस्पर संमतीने मुलांना मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते की, मुलांना अनावश्यक दबावापासून दूर ठेवले पाहिजे असे तिला वाटत होते. तिच्यामुळे मुलांनी मीडिया आणि कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक दबावाला सामोरे जावे असे तिला वाटत नाही. त्यांना काय व्हायचे आहे ही त्यांची निवड आहे. त्यांना ज्या व्यासपीठावर उभे राहायचे आहे ते आम्ही त्यांना देऊ. मुलांना त्यांचे बालपण जगू दिले पाहिजे. असं तिचं म्हणणं होतं.