प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न

Updated:December 9, 2025 19:01 IST2025-12-09T18:54:40+5:302025-12-09T19:01:23+5:30

IAS Garima Lohia : आज गरिमाची यशोगाथा देशभरातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे ,ज्या आयुष्यात काहीतरी साध्य करण्याचं स्वप्न पाहतात.

प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न

बिहारची लेक गरिमा लोहिया हिला लहान वयात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वडिलांच्या अचानक निधनाने कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पण तिने कधीही हार मानली नाही. आज तिची यशोगाथा देशभरातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे ,ज्या आयुष्यात काहीतरी साध्य करण्याचं स्वप्न पाहतात.

प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न

गरिमाने बक्सरमधील वूट स्टॉक स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. नंतर सनबीम भगवानपूर येथून बारावी उत्तीर्ण केली. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी दिल्लीला गेली. तिने दिल्ली विद्यापीठाच्या किरोरीमल कॉलेजमधून बी.कॉम. पदवी मिळवली.

प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न

वडील बक्सर जिल्ह्यात कपड्यांचे व्यापारी होते. त्यांचं स्वप्न होतं की, तिची मुलगी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण व्हावी आणि आयएएस अधिकारी व्हावी.

प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट केले. पण जेव्हा ती आयएएस अधिकारी झाली, तेव्हा वडील स्वप्न पूर्ण झालेलं पाहण्यासाठी नव्हते. २०१५ मध्ये त्यांचा हॉर्ट अटॅकने मृत्यू झाला.

प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न

वडिलांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. कुटुंब उद्ध्वस्त झालं. गरिमाच्या आईने केवळ स्वतःला सावरले नाही तर मुलांनाही आधार दिला. नीट काळजी घेतली.

प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न

गरीमा दिल्लीत राहून यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी प्रशिक्षण घेऊ इच्छित होती. पण नंतर कोरोनामुळे सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था बंद पडल्या. गरिमा बक्सरला घरी परतली. पुढे काय होणार आहे हे कोणालाही माहित नव्हते. त्या कठीण काळात ती खंबीर राहिली.

प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न

जेव्हा सर्व दरवाजे बंद होत होते, तेव्हा ऑनलाईन शिक्षणाने पुढील तयारीसाठी नवीन मार्ग उघडला. गरिमाने घरीच यूट्यूब आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरून कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न

गरिमा यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरली. तरीही तिने हार मानली नाही. तिने तिच्या अपयशातून शिकून दुप्पट मेहनत आणि उत्साहाने यूपीएससीची तयारी केली.

प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न

२०२२ मध्ये गरिमाने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अव्वल स्थान मिळवलं आणि देशात दुसरा क्रमांक (यूपीएससी एआयआर-२ रँक) मिळवला. तिने या यशाचे श्रेय तिच्या आईला दिलं.

प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न

एका मुलाखतीत सांगितलं की, आईच्या प्रोत्साहनाशिवाय हे कधीही शक्य झाले नसतं. गरिमाचा प्रवास धैर्य, दृढनिश्चय आणि तिच्या आईच्या पाठिंब्याची कहाणी आहे. आज ती बिहार कॅडरमध्ये आयएएस अधिकारी आहे.