महिलांनाच जास्त होतो ॲनिमियाचा त्रास, अंगात रक्त कमी आहे सांगणारी ७ लक्षणं-जीवाला धोका

Updated:June 13, 2025 18:22 IST2025-06-12T12:08:14+5:302025-06-13T18:22:11+5:30

Signs of Low Hemoglobin : जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन लेव्हल सामान्यापेक्षा कमी असेल तर शरीराला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होतात.

महिलांनाच जास्त होतो ॲनिमियाचा त्रास, अंगात रक्त कमी आहे सांगणारी ७ लक्षणं-जीवाला धोका

Signs of Low Hemoglobin : एखादं हलकं काम केलं किंवा काही नाही केलं तरी थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात रक्त कमी झालेलं असू शकतं. सामान्यपणे पुरूषांच्या महिलांमध्ये रक्त कमी होण्याची समस्या अधिक बघायला मिळते (Anemia in Women). शरीरात आयर्न कमी झाल्यावर हिमोग्लोबिन कमी होतं, ज्याला ॲनिमिय असं म्हणतात. या स्थितीला सामान्य भाषेत रक्ताची कमतरता असं म्हणतात. हिमोग्लोबिन लाल रक्तपेशींमधील एक प्रोटीन असतं, जे फुप्फुसांमधून ऑक्सिजन घेऊन शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचवतं.

महिलांनाच जास्त होतो ॲनिमियाचा त्रास, अंगात रक्त कमी आहे सांगणारी ७ लक्षणं-जीवाला धोका

पण जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन लेव्हल सामान्यापेक्षा कमी असेल तर शरीराला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होतात. अशात काही लक्षणांच्या मदतीनं तुम्ही रक्त कमी झाल्याचं ओळखू शकता.

महिलांनाच जास्त होतो ॲनिमियाचा त्रास, अंगात रक्त कमी आहे सांगणारी ७ लक्षणं-जीवाला धोका

हिमोग्लोबिन कमी झाल्यावर सेल्सना भरपूर ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे व्यक्तीला फार जास्त थकवा जाणवतो. या स्थितीत एखादं हलकं काम केल्यावरही थकवा जाणवतो. तसेच कमजोरी सुद्धा जाणवते.

महिलांनाच जास्त होतो ॲनिमियाचा त्रास, अंगात रक्त कमी आहे सांगणारी ७ लक्षणं-जीवाला धोका

ऑक्सिजन कमी झाल्यानं श्वास भरून येण्याची समस्या होऊ शकते, खासकरून पायऱ्या चढताना किंवा एखादं काम करताना. याचं कारण शरीराला ऑक्सिजन देण्यासाठी फुप्फुसांना अधिक मेहनत करावी लागते.

महिलांनाच जास्त होतो ॲनिमियाचा त्रास, अंगात रक्त कमी आहे सांगणारी ७ लक्षणं-जीवाला धोका

हिमोग्लोबिन कमी झाल्यावर त्वचा, नखं आणि डोळ्यांच्या आत पिवळेपणा दिसू लागतो. हिमोग्लोबिनच रक्ताला लाल रंग देतं. पण तेच कमी झालं तर स्किन आणि नखं पिवळे दिसू लागतात.

महिलांनाच जास्त होतो ॲनिमियाचा त्रास, अंगात रक्त कमी आहे सांगणारी ७ लक्षणं-जीवाला धोका

मेंदुपर्यंत पुरेसं ऑक्सिजन पोहोचत नसल्यानं चक्कर येणे, डोकेदुखी किंवा बेशुद्ध पडणे अशा समस्या होऊ शकतात. तुम्हालाही नेहमीच चक्कर येत असेल किंवा डोकं दुखत असेल तर हा हीमोग्लोबिन कमी झाल्याचा संकेत असू शकतो.

महिलांनाच जास्त होतो ॲनिमियाचा त्रास, अंगात रक्त कमी आहे सांगणारी ७ लक्षणं-जीवाला धोका

शरीरातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी फुप्फुसांसोबतच हृदयाला सुद्धा जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हार्ट बीट सामान्यापेक्षा वाढतात.

महिलांनाच जास्त होतो ॲनिमियाचा त्रास, अंगात रक्त कमी आहे सांगणारी ७ लक्षणं-जीवाला धोका

शरीरात ब्लड सर्क्युलेशन योग्यपणे होत नसल्यानं हात-पाय थंड पडतात आणि त्यांमध्ये झिणझिण्याही जाणवतात. त्यामुळे असं काही होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

महिलांनाच जास्त होतो ॲनिमियाचा त्रास, अंगात रक्त कमी आहे सांगणारी ७ लक्षणं-जीवाला धोका

शरीरात आयर्न कमी झाल्यानं केसगळती आणि नखं तुटणे किंवा पातळ होणे अशा समस्या होतात. तुम्हालाही असं काही होत असेल तर हा हिमोग्लोबिन कमी असल्याचा संकेत असू शकतो.