वयाच्या तिशीतच बसता- उठता गुडघ्यातून कट- कट आवाज येतो? ७ पदार्थ खा- गुडघ्यांमध्ये ताकद येईल

Updated:June 9, 2025 17:58 IST2025-06-09T17:52:02+5:302025-06-09T17:58:20+5:30

वयाच्या तिशीतच बसता- उठता गुडघ्यातून कट- कट आवाज येतो? ७ पदार्थ खा- गुडघ्यांमध्ये ताकद येईल

पुर्वी चाळिशी, पंचेचाळिशीनंतर गुडघे दुखू लागायचे. पण आता मात्र वयाच्या तिशीतच अनेकजणांना गुडघेदुखीचा त्रास होऊ लागला आहे. बसता उठता गुडघ्यातून कट- कट आवाज येताे आणि त्रासही होतो.(how to get rid of knee pain?)

वयाच्या तिशीतच बसता- उठता गुडघ्यातून कट- कट आवाज येतो? ७ पदार्थ खा- गुडघ्यांमध्ये ताकद येईल

हा त्रास टाळायचा असेल तर काही पदार्थ नियमितपणे तुमच्या आहारात असायला हवे (superfood for knee). ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती युएनसी हेल्थ या वेबसाईटवर शेअर करण्यात आली आहे (healthy food for strong knee). हे पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्यास गुडघेदुखी तर कमी होईलच पण सांधेदुखीचा त्रासही थांबेल, असं तज्ज्ञ सांगतात.(how to get relief from knee pain?)

वयाच्या तिशीतच बसता- उठता गुडघ्यातून कट- कट आवाज येतो? ७ पदार्थ खा- गुडघ्यांमध्ये ताकद येईल

सगळ्यात पहिले आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. दही, तूप, ताक, दूध हे पदार्थ भरपूर प्रमाणात घ्या. योगर्ट आवडत असेल तर ते ही खा. त्यातूनही कॅल्शियम मिळते आणि हाडांना बळकटी येते.

वयाच्या तिशीतच बसता- उठता गुडघ्यातून कट- कट आवाज येतो? ७ पदार्थ खा- गुडघ्यांमध्ये ताकद येईल

हिरव्या पालेभाज्यांमधून कॅल्शियमसोबतच व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियमही मिळते. ते देखील हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते.

वयाच्या तिशीतच बसता- उठता गुडघ्यातून कट- कट आवाज येतो? ७ पदार्थ खा- गुडघ्यांमध्ये ताकद येईल

बदाम, चिया सीड्स, जवस यांच्यामधून कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस मिळते. हे तिन्ही घटक हाडांना मजबूत बनवतात.

वयाच्या तिशीतच बसता- उठता गुडघ्यातून कट- कट आवाज येतो? ७ पदार्थ खा- गुडघ्यांमध्ये ताकद येईल

प्रोटीनयुक्त पदार्थ हाडांना बळकटी देतात. त्यामुळे कमी वयातच गुडघ्यांचं दुखणं सुरू झालं असेल तर तुमच्या आहारात प्रोटीन योग्य प्रमाणात आहेत की नाही हे एकदा तपासून पाहा.

वयाच्या तिशीतच बसता- उठता गुडघ्यातून कट- कट आवाज येतो? ७ पदार्थ खा- गुडघ्यांमध्ये ताकद येईल

आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी योग्य प्रमाणात असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे मग शरीरातलं कोलॅजीनही वाढतं. हाडांचे टिश्यू बळकट ठेवण्यासाठी कोलॅजीन उपयुक्त ठरतं. त्यामुळे व्हिटॅमिन सी देणारे फळंही आपल्या आहारात असायला हवे.