रात्री पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पाय ओढल्यासारखे होतात? पाहा त्यामागची ३ कारणं आणि सोपे घरगुती उपाय

Updated:December 2, 2025 13:54 IST2025-12-02T13:35:33+5:302025-12-02T13:54:48+5:30

रात्री पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पाय ओढल्यासारखे होतात? पाहा त्यामागची ३ कारणं आणि सोपे घरगुती उपाय

बहुतांश महिलांना, शाळकरी- महाविद्यालयीन मुलींना रात्री पायात गोळे येण्याचा त्रास होतोच... यामुळे पाय ओढल्यासारखे होतात. पाय एवढे दुखतात की शांत झोपही येत नाही.

रात्री पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पाय ओढल्यासारखे होतात? पाहा त्यामागची ३ कारणं आणि सोपे घरगुती उपाय

हा त्रास कमी करायचा असेल तर त्यामागची कारणं आणि उपाय जाणून घेणं गरजेचं आहे.

रात्री पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पाय ओढल्यासारखे होतात? पाहा त्यामागची ३ कारणं आणि सोपे घरगुती उपाय

याविषयी माहिती देताना डाॅक्टर सांगतात की शरीरातलं पाणी कमी झालं असल्यास पोटऱ्यांमध्ये गोळे येतात. त्यामुळे पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा.

रात्री पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पाय ओढल्यासारखे होतात? पाहा त्यामागची ३ कारणं आणि सोपे घरगुती उपाय

शरीरात वात दोष निर्माण झाल्यानेही पायात गोळ येतात. वात दोष निर्माण होणे म्हणजे अपचनाचा त्रास होेणे.

रात्री पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पाय ओढल्यासारखे होतात? पाहा त्यामागची ३ कारणं आणि सोपे घरगुती उपाय

म्हणूनच अपचनाचा त्रास कमी करायचा असेल तर सकाळी किंवा रात्री थोडा ओवा बारीक चावून खा आणि त्यावर ग्लासभर कोमट पाणी घ्या. वातदोष कमी होऊन पायात गोळे होण्याचं प्रमाणही कमी होईल.

रात्री पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पाय ओढल्यासारखे होतात? पाहा त्यामागची ३ कारणं आणि सोपे घरगुती उपाय

आंघोळीला जाण्याच्या आधी तिळाचं तेल कोमट करून त्याने पायाला मालिश करा. बराच आराम वाटेल.

रात्री पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पाय ओढल्यासारखे होतात? पाहा त्यामागची ३ कारणं आणि सोपे घरगुती उपाय

शरीरातलं मॅग्नेशियम कमी झाल्यानेही पोटऱ्यांमध्ये गोळे येण्याचं प्रमाण वाढतं. त्यासाठी मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचं आहारातलं प्रमाण वाढाव. यासाठी केळी, चिया सीड्स, ॲव्हाकॅडो, पालक, सोया मिल्क, भोपळ्याच्या बिया, डार्क चॉकलेट्स, सुकामेवा असे पदार्थ खाऊ शकता.

रात्री पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पाय ओढल्यासारखे होतात? पाहा त्यामागची ३ कारणं आणि सोपे घरगुती उपाय

व्हिटॅमिन बी १२ आणि डी ३ युक्त पदार्थ जास्त प्रमाणात खा. त्यामुळेही हे दुखणं कमी होण्यास मदत होऊ शकते, अशी माहिती डॉक्टरांनी healyourselfwith_manasikrishna या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.