भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार?

Published:March 28, 2022 01:55 PM2022-03-28T13:55:30+5:302022-03-28T14:00:26+5:30

भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार?

१. चहा (Tea/ Chai) भारतातली टॉप १० पेय कोणती असं म्हटलं तर हमखास सगळ्यात आधी नाव येतं ते चहाचं.. चहा हे भारतातलं सगळ्यात जास्त प्यायल्या जाणारं पेय आहे. पण चहासोबतच हे काही भारतीय पेयेदेखील प्रसिद्ध आहेत.. बघा कोणत्या प्रांताचे कोणते पेय प्रसिद्ध आहे ते...

भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार?

२. गोली सोडा किंवा लिंबू सोडा (goli or banta soda) हा प्रकार लिंबू सरबतापेक्षाही भारतात जास्त प्रसिद्ध आहे. यालाच बंता सोडा असंही काही प्रांतात म्हणतात. लिंबू सरबत आणि त्यात सोडा असं हे कॉम्बिनेशन बहुसंख्य लोकांना जाम आवडतं. आंबट- गोड आणि थोडंसं स्पाईसी असणारं हे पेय दिल्लीकरांची उन्हाळ्यातली पहिली पसंती आहे.

भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार?

३. ऊसाचा रस (Sugarcane Juice) हे पेय भारतातलं आणखी एक प्रसिद्ध पेय. अनेक प्रांतात ते प्यायलं जातं. महाराष्ट्रात तर जानेवारी- फेब्रुवारीतच रसवंती सुरू होतात. पंजाबमध्येह ऊसाचा रस खूप जास्त प्रसिद्ध आहे.

भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार?

४. फेणी (Fenny) फेणी म्हणजे शेवयाच्या खिरीसारखा प्रकार असं समजून कन्फ्यूज होऊ नका. या दोन पदार्थांच्या नावात साम्य आहे. पण ते दोन्हीही पुर्णपणे वेगळे आहेत. ही प्रसिद्ध असणारी फेणी हे गोव्याचं प्रसिद्ध ड्रिंक असून त्यात अल्कोहोलची मात्रा असते. चवीला थोडीशी गोडसर असणारी ही फेणी अनेकांची पहिली पसंती आहे.

भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार?

५. जिगरथंडा (Jigar thanda) या पदार्थाचं नावच त्याचा अर्थ सांगून जातं. हे ड्रिंक प्यायलं की मन आणि शरीर तृप्त होतं असं तामिळनाडूच्या लोकांचं ठाम मत. दूध, बदाम, आईस्क्रिम यापासून हे पेय तयार केलं जातं.

भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार?

६. काहवा (Kahva) काश्मिरला कधी गेलात तर हे पेय प्यायला विसरू नका. काश्मिरच्या गुलाबी थंडी गरमागरम काहवा पिण्याचा आनंद काही वेगळाच. हा एक प्रकारचा ग्रीन टी असून त्यामध्ये दालचिनी, वेलची, लवंग, केशर टाकलं जातं. याच पेयाला मुगल चाय म्हणूनही ओळखलं जातं. हा चहा सर्व्ह करण्याची किटली मेटलची असते. तिच्यावरची कलाकुसर बघण्यासारखीच आहे.

भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार?

७. ओकाली (Ookali) पश्चिम भारतात थंडीच्या दिवसांत प्यायलं जाणारं हे पेय. हे पेय तयार करण्यासाठी प्रामुख्याने कोथिंबीर वापरली जाते.

भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार?

८. कोकम सरबत (Kokam Sarbat) महाराष्ट्र, गुजरात या भागातल्या किनारपट्टी प्रदेशातलं हे एक प्रसिद्ध पेय. कोकम सरबत पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळेच ते अतिशय आरोग्यदायी मानलं जातं.

भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार?

९. कांजी (Kaanji) ब्लॅक कॅरट, मोहरी, हिंग आणि इतर काही मसाले वापरून तयार करण्यात येणारं हे पेय उत्तर भारतात होळीच्या दिवशी अतिशय आवडीने प्यायल्या जातं. कांजीशिवाय तिथली होळी साजरी होतच नाही. ३ ते ४ दिवस फर्मेंटेशन करून कांजी बनवली जाते आणि ती मेदूवड्यासोबत पितात.

भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार?

१०. तन्काव तोराणी (Tankaw Toranni) शिजवलेल्या भातापासून तयार करण्यात येणारा हा पदार्थ ओडिसामध्ये गेल्यावर आवर्जून चाखूप पहा. जगन्नाथाला जो महानैवेद्य दाखविण्यात येतो त्यापदार्थांमध्ये तन्काव तोराणी असतेच. समर ड्रिंक म्हणून हा पदार्थ प्रसिद्ध आहे.