ढाब्यावर मिळतो तसा मऊ, लुशलुशीत नान घरीच करा; ८ टिप्स,घरच्या तव्यावर बनेल परफेक्ट नान
Updated:December 2, 2025 11:20 IST2025-12-02T10:58:42+5:302025-12-02T11:20:04+5:30
How To Make Naan At home : पीठ मळल्यानंतर ते उबदार ठिकाणी झाकून ठेवा. दीड ते २ तासात दुप्पट फुलून येईल.

हॉटेलमध्ये मिळतं तसं मऊ, लुसलुशीत नान घरी करणं एकदम सोपं आहे. त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा. ज्यामुळे नान घरी केले तरी बिघडणार नाहीत आणि परफेक्ट होतील.
नान करताना यीस्ट एक्टिव्हेट करण्यासाठी वापरले जाणारे दूध किंवा पाणी कोमट असावे. यामुळे यीस्ट प्रभावी काम करते.
पिठात ताजे दही मिसळल्यानं नानला मऊपणा येतो आणि आंबट गोड चव येते.
नानचे पीठ पोळीच्या पिठापेक्षा जास्त मऊ आणि थोडे चिकट असायला हवे. ज्यामुळे नान छान फुलतो.
पीठ मळल्यानंतर ते उबदार ठिकाणी झाकून ठेवा. दीड ते २ तासात दुप्पट फुलून येईल.
पीठ मळताना आणि नान लाटल्यावर त्यात थोडं तेल किंवा लोणी घाला. यामुळे चिकटपणा कमी होतो आणि मऊपणा टिकून राहतो.
नान पातळ न लाटता जाडसर ठेवा. ज्यामुळे छान फुललेल आणि फुगलेला पोट मिळेल.नान तव्यावर चिकटण्यासाठी नॉनच्या एका बाजूला पाणी लावून ती बाजू तव्यावर टाका.
नान बुडबुडे आल्यावर तवा उलटा करून गॅसच्या थेट आचेवर भाजल्यानं त्याला हॉटेलसारखा तंदूरी पोत मिळतो.