Mirabai Chanu : मीराबाईनं शेअर केल्या फिटनेस टिप्स; समोर आले हार्ड वर्कआऊटचे फोटो

Published:July 28, 2021 11:49 AM2021-07-28T11:49:45+5:302021-07-28T12:37:45+5:30

Mirabai Chanu Fitness : तिने आपल्या चाहत्यांना तिच्या फिटनेस फोटो, कोट्स आणि टिप्स सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

Mirabai Chanu : मीराबाईनं शेअर केल्या फिटनेस टिप्स; समोर आले हार्ड वर्कआऊटचे फोटो

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून जबरदस्त सुरूवात झाली आणि पहिल्याच दिवशी भारताच्या महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं ४९ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक मिळवून दिले. पदकाची मानकरी होताच मीराबाईनं गेल्या पाच वर्षांपासून बाळगलेलं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. मीराबाईचं हे यश पाहता तिच्याकडून प्रेरणा घेत अनेकांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटण्याची तयारी दाखवली आहे. सध्या सोशल मीडियावर मीराबाईच्या फिटनेसची खूपच चर्चा रंगली आहे. (Image Credit- Saikhom Mirabai Chanu/Instagram)

Mirabai Chanu : मीराबाईनं शेअर केल्या फिटनेस टिप्स; समोर आले हार्ड वर्कआऊटचे फोटो

'आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला जवळजवळ प्रशिक्षण सोडावे लागले, पण माझे प्रयत्न सुरूच होते,' असे रौप्यपदक विजेता मीराबाईनं इन्स्टाग्रामवर जाहीर केले. (Image Credit- Saikhom Mirabai Chanu/Instagram)

Mirabai Chanu : मीराबाईनं शेअर केल्या फिटनेस टिप्स; समोर आले हार्ड वर्कआऊटचे फोटो

२०१८ मध्ये एका गंभीर पाठीच्या दुखापतीनंतर मीराबाई काळजीत होती की ती पुन्हा कधीही उठू शकणार नाही, परंतु ती पुढे जात राहिली. (Image Credit- Saikhom Mirabai Chanu/Instagram)

Mirabai Chanu : मीराबाईनं शेअर केल्या फिटनेस टिप्स; समोर आले हार्ड वर्कआऊटचे फोटो

''मी माझ्या समुदायासाठी धडपडत आहे'', 'असं 26 वर्षांच्या तरुणांनी सांगितलं होतं. जी आज अनेक तरुण मुलांसाठी प्रेरणा बनली आहे. (Image Credit- Saikhom Mirabai Chanu/Instagram )

Mirabai Chanu : मीराबाईनं शेअर केल्या फिटनेस टिप्स; समोर आले हार्ड वर्कआऊटचे फोटो

तिने आपल्या चाहत्यांना तिच्या फिटनेस फोटो, कोट्स आणि टिप्स सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. (Image Credit- Saikhom Mirabai Chanu/Instagram )

Mirabai Chanu : मीराबाईनं शेअर केल्या फिटनेस टिप्स; समोर आले हार्ड वर्कआऊटचे फोटो

मीराबाईंच्या म्हणण्यानुसार, 'फिट होण्यासाठी योग्य वेळ किंवा जागा गरजेची आहे असं नाही. तुमच्यातला अ‍ॅथलीट जागा करा आणि जगाला आपले खेळाचे मैदान बनवा. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवल्यास तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.' (Image Credit- Saikhom Mirabai Chanu/Instagram )

Mirabai Chanu : मीराबाईनं शेअर केल्या फिटनेस टिप्स; समोर आले हार्ड वर्कआऊटचे फोटो

मीराबाईच्यामते योग हा स्वत: चा प्रवास आहे. योगा रोजच्या रूटीनचा एक भाग असायला हवा.

Mirabai Chanu : मीराबाईनं शेअर केल्या फिटनेस टिप्स; समोर आले हार्ड वर्कआऊटचे फोटो

नेहमी 'उच्च लक्ष्य ठेवा.' स्वत: वर विश्वास ठेवल्यास ध्येय गाठण्यास काहीच वाटत नसलेल्या मीराबाई सांगते. (Image Credit- Saikhom Mirabai Chanu/Instagram )