Mango Seed Kernel Benefits : आंबे खाल्ल्यावर कोय फेकून देता? थांबा, घातक कॉलेस्टेरॉलसह, पोटाचे त्रास दूर करेल कोय, 'असा' करा वापरा

Published:April 28, 2022 03:34 PM2022-04-28T15:34:37+5:302022-04-29T12:41:10+5:30

Mango Seed Kernel Benefits : आंबा खाण्याच्या फायद्यांबद्दल बोलताना, तज्ज्ञ आणि अनेक अभ्यासांचे असे मत आहे की आंब्याचे नियमित सेवन केल्याने कर्करोग, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, डोळ्यांच्या समस्या इत्यादी टाळण्यास मदत होते.

Mango Seed Kernel Benefits : आंबे खाल्ल्यावर कोय फेकून देता? थांबा, घातक कॉलेस्टेरॉलसह, पोटाचे त्रास दूर करेल कोय, 'असा' करा वापरा

उन्हाळात घरोघरी भरपूर आंबे खाल्ले जातात. स्वादिष्ट आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येकजण या ऋतूची आतुरतेने वाट पाहत असतो. आंबा चवदार तर आहेच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. (Benefits of using the Mango seed) जीवनसत्त्वे, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स, लोह, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यांसारखे पोषक घटक आंब्यामध्ये आढळतात. हे सर्व घटक शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक आहेत. (Mango Seed Kernel Benefits)

Mango Seed Kernel Benefits : आंबे खाल्ल्यावर कोय फेकून देता? थांबा, घातक कॉलेस्टेरॉलसह, पोटाचे त्रास दूर करेल कोय, 'असा' करा वापरा

आंबा खाण्याच्या फायद्यांबद्दल बोलताना, तज्ज्ञ आणि अनेक अभ्यासांचे असे मत आहे की आंब्याचे नियमित सेवन केल्याने कर्करोग, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, डोळ्यांच्या समस्या इत्यादी टाळण्यास मदत होते. फक्त आंबाच नाही तर त्याची कोय देखील आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. (Amazing Benefits Of Mango Seeds For Health)

Mango Seed Kernel Benefits : आंबे खाल्ल्यावर कोय फेकून देता? थांबा, घातक कॉलेस्टेरॉलसह, पोटाचे त्रास दूर करेल कोय, 'असा' करा वापरा

आंब्याप्रमाणेच कोय आणि बीमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, ज्यात कोलेस्ट्रॉल, डायरिया आणि हृदयाशी संबंधित आजारांशी लढण्याची क्षमता असते. आंब्याची कोय आरोग्य राखण्यासाठी किती प्रभावी आहेत आणि त्याचा कसा वापर करायचा जाणून घ्या. (Mango seed facts and benefits)

Mango Seed Kernel Benefits : आंबे खाल्ल्यावर कोय फेकून देता? थांबा, घातक कॉलेस्टेरॉलसह, पोटाचे त्रास दूर करेल कोय, 'असा' करा वापरा

जुलाबासारख्या पचनाच्या समस्या टाळण्यासाठी, आंब्याच्या बीया किंवा कर्नल पावडर घेण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी आंब्याची कोय नीट वाळवून बारीक करून बारीक पावडर बनवा. ही पावडर एका ग्लास पाण्यात मिसळून आणि त्यात थोडे मध घालून सेवन करू शकता. एका वेळी 1 ग्रॅमपेक्षा जास्त कर्नल पावडर घेऊ नका.

Mango Seed Kernel Benefits : आंबे खाल्ल्यावर कोय फेकून देता? थांबा, घातक कॉलेस्टेरॉलसह, पोटाचे त्रास दूर करेल कोय, 'असा' करा वापरा

आंब्याची कोय रक्ताभिसरणाला चालना देते आणि त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. आंब्याच्या कर्नेल पावडरचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहते.

Mango Seed Kernel Benefits : आंबे खाल्ल्यावर कोय फेकून देता? थांबा, घातक कॉलेस्टेरॉलसह, पोटाचे त्रास दूर करेल कोय, 'असा' करा वापरा

आंब्याचे दाणे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास देखील मदत करतात. यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि आंब्याची पूड खाल्ल्याने शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे होतात. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी ही पावडर रोज १ ग्राम पाण्याबरोबर घ्या.

Mango Seed Kernel Benefits : आंबे खाल्ल्यावर कोय फेकून देता? थांबा, घातक कॉलेस्टेरॉलसह, पोटाचे त्रास दूर करेल कोय, 'असा' करा वापरा

अॅसिडिटीचा अनेकदा त्रास होतो त्यांच्यासाठी आंब्याची कोय हा चांगला उपाय आहे. आंब्याच्या दाण्यांमध्ये फिनॉल आणि फिनोलिक संयुगे असतात, जे पचनास मदत करतात. पावडरचे सेवन केल्याने अँटिऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

Mango Seed Kernel Benefits : आंबे खाल्ल्यावर कोय फेकून देता? थांबा, घातक कॉलेस्टेरॉलसह, पोटाचे त्रास दूर करेल कोय, 'असा' करा वापरा

व्हिटॅमिन सी समृद्ध, आंब्याची पावडर स्कर्वीच्या रुग्णांसाठी प्रभावी उपायाप्रमाणे काम करते. तुम्हाला फक्त एक भाग आंब्याची पूड दोन भाग गूळ आणि चुना मिसळून खावी लागेल. व्हिटॅमिन सीचा तुमचा दैनंदिन डोस पूर्ण करण्यासाठी तुम्ही याचे रोज सेवन करू शकता.