simple ideas for belted saree fashion, new trend of saree with belt, how to wear saree with belt
Diwali : साडीवर बेल्ट लावण्याची पाहा ट्रेण्डी फॅशन! यंदा दिवाळीत दिसा सगळ्यांपेक्षा सुंदर- आकर्षकPublished:October 26, 2024 04:38 PM2024-10-26T16:38:34+5:302024-10-26T17:51:00+5:30Join usJoin usNext सध्या 'Belted Saree' म्हणजेच साडीवर बेल्ट लावण्याची फॅशन खूपच ट्रेण्डिंग आहे. त्यामुळे दिवाळीत जर सगळ्यांपेक्षा वेगळा लूक करण्याची तुमची इच्छा असेल तर असं काहीतरी एकदम हटके तुम्ही ट्राय करून पाहू शकता.(simple ideas for belted saree fashion) लेदर बेल्ट फक्त पॅण्टसाठीच वापरायचे असं आपण अगदी आतापर्यंत ऐकत होतो. पण आता मात्र हा ट्रेण्ड पुर्णपणे बदलला असून चक्क साडीवर लेदर बेल्ट लावला जात आहे.(new trend of saree with belt) साडीवर बेल्ट लावल्याने किती आकर्षक लूक येऊ शकतो ते पाहा.. अशी प्लेन साडी आणि त्यावर डिझायनर ब्लाऊज आणि जवळपास त्याच रंगाच बेल्ट असंही ट्राय करून पाहू शकता. ऑफिसमधली मिटिंग किंवा अन्य एखादा फॉर्मल कार्यक्रम असेल तर तिथे जाताना अशा पद्धतीने बेल्टेड साडी नेसून जायला हरकत नाही. साडी आणि ब्लाऊज एकसारख्या रंगाचंच असेल तर अशा पद्धतीने त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाचा बेल्ट लावा. एकदम ग्रेसफूल दिसाल. कंबरपट्टा आपल्याकडे खूप पुर्वीपासून लावला जातो. हा मोत्याचा बेल्ट म्हणजे त्याचेच एक अधुनिक रूप आहे. एखाद्या पारंपरिक प्रकारातल्या साडीवर असा मोत्याचा बेल्ट लावायला हरकत नाही. हा एक सुंदर प्रकार पाहा. कोणत्याही चमकदार रंगाच्या काठपदर साडीवर असा बेल्ट खूप छान दिसेल. साडी तर आपण नेहमीच नेसतो. पण बेल्ट लावल्यामुळे आपला लूक किती बदलून जातो, हे सांगणारं हे एक उत्तम उदाहरण आहे. टॅग्स :फॅशनदिवाळी 2024साडी नेसणेस्टायलिंग टिप्सfashionDiwalisaree drapingStyling Tips