पावसाळी चपला घेतल्या का? पावसाळी चपलांच्या नावाखाली फसू नका, पाहा कोणत्या चपलांनी होतं पायांचं नुकसान

Updated:May 22, 2025 17:45 IST2025-05-22T17:39:04+5:302025-05-22T17:45:39+5:30

Did you buy rain shoes? Don't be fooled by the name of rain shoes, see which shoes damage your feet : पावसाळी चपला पावसाळ्यात वापरायलाच हव्यात. पण पावसाळी चपलेच्या नावाखाली फसू नका. पाहा कोणत्या चपला टाळायला हव्यात.

पावसाळी चपला घेतल्या का? पावसाळी चपलांच्या नावाखाली फसू नका, पाहा कोणत्या चपलांनी होतं पायांचं नुकसान

पावसाळ्यात कपड्यांपेक्षा चपला महत्त्वाच्या असतात. चपला खराब होतात. पायाला चपला लागतात त्यामुळे दुखापत होते. फोड येतात पायाची सालं जातात. पायाला चपल चावली असे आपण म्हणतो. चपल घाण आहे म्हणतो मात्र तसे नसून ती चपल फक्त पावसाळ्यासाठी चांगली नाही असा त्याचा अर्थ होतो.

पावसाळी चपला घेतल्या का? पावसाळी चपलांच्या नावाखाली फसू नका, पाहा कोणत्या चपलांनी होतं पायांचं नुकसान

हे सगळे टाळता येते ते फक्त योग्य चपल वापरुनच. पावसाळ्यासाठी खास पावसाळी चपला बाजारात मिळतात. अनेक जण रोजच्याच चपला पावसाळ्यात वापरतात मात्र तसे करु नका. पावसासाठी वेगळ्या चपला घ्या. म्हणजे पायाला काहीही त्रास होणार नाही. तसेच बिनधास्त चालता येईल. पावसाचा त्रास होणार नाही.

पावसाळी चपला घेतल्या का? पावसाळी चपलांच्या नावाखाली फसू नका, पाहा कोणत्या चपलांनी होतं पायांचं नुकसान

कॅनव्हास शूज किंवा कोणतेही इतर शूज पावसाच्या दिवसात वापरु नका. त्यात पाय उबतात. शिवाय शूजही खराब होतात. वाळता वाळत नाहीत. असे शूज फार महाग असतात, चांगल्या कॉलिटीचे असले तरी ते पावसाळ्यात खराब होतातच.

पावसाळी चपला घेतल्या का? पावसाळी चपलांच्या नावाखाली फसू नका, पाहा कोणत्या चपलांनी होतं पायांचं नुकसान

कापडी चपला महिलांना फार आवडतात. मात्र पावसाळ्यात अशा चपला वापरणे म्हणजे विचित्रपणाच ठरेल. कापडाच्या चपला बाहेर पाऊस पडत नसतानाही वापरु नका. कापडी चपला दिसतात फार छान पण कापड पावसात भिजले की कुजते.

पावसाळी चपला घेतल्या का? पावसाळी चपलांच्या नावाखाली फसू नका, पाहा कोणत्या चपलांनी होतं पायांचं नुकसान

उंच टाचांच्या चपलाच वापरु नका. सगळीकडे घसरडे झाले असते. पाय घसरला तर दुखापत होईल. त्यापेक्षा अशा चपला टाळणेच योग्य ठरेल. चालताना पायांना त्रास होतो. पावसासाठी खास अशाही हिल्स मिळतात मात्र त्याही वापरणे टाळा. सपाट चपलाच वापरा.

पावसाळी चपला घेतल्या का? पावसाळी चपलांच्या नावाखाली फसू नका, पाहा कोणत्या चपलांनी होतं पायांचं नुकसान

साध्या स्लिपर किंवा फ्लिप-फ्लॉप्सच्या चपला वापरणेही टाळाच. त्यांना योग्य तशी पकड नसते. त्यामुळे घसरण्याची शक्यता जास्त असते. तसेच चालतानाही त्रास होतो. स्लिपरला खाली ग्रीप दिलेली असेल तरच त्या चपला घ्यायच्या.

पावसाळी चपला घेतल्या का? पावसाळी चपलांच्या नावाखाली फसू नका, पाहा कोणत्या चपलांनी होतं पायांचं नुकसान

काही चपला बाहेरुन वेगळ्या आणि आत कापडी अस्तर असलेल्या असतात. त्या ही वापरु नका. कारण त्या सुकत नाहीत. कापड खराब होते. त्याला फार वाईट वास येतो. त्याचे कापड कुजते कापड कुजल्यावर चपल वायाच जाते.

पावसाळी चपला घेतल्या का? पावसाळी चपलांच्या नावाखाली फसू नका, पाहा कोणत्या चपलांनी होतं पायांचं नुकसान

पावसाळ्यात रबर किंवा PVC च्या चपलाच वापराव्या. चांगली पकड असलेल्या सुटसुटीत चपलाच वापरावा. पायाला त्रास होणार नाही अशीच चपल वापरा. चालताना घसरणार नाहीत आणि खाली सोल चांगला असेल व बाहेरच्या बाजूलाही ग्रीप असेल अशी चपल निवडा.