Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कुठल्याही पार्टीत मिळेल फुल अटेंशन, दिसाल क्लासी, पाहा ५ ड्रेस- व्हा पार्टी की शान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2025 17:45 IST

1 / 7
बर्थडे पार्टी म्हटलं की उत्साह, आनंद आणि भरपूर शॉपिंग. पण सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो आज नेमकं घालायचं काय? खरं सेलीब्रेशन तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण सगळ्यांमध्ये उठून दिसतो. पार्टीत प्रवेश करताच सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे वळाव्यात, तुमच्या लूककडे सगळे थक्क होऊन पाहत राहावेत. अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. (Party dress ideas)
2 / 7
आजच्या फॅशनच्या दुनियेत, योग्य ड्रेस निवडणं हा एकच नियम सिंपल पण एलिगंट, स्टायलिश पण क्लासी. जर तुम्हालाही बर्थडे पार्टीला जायचे असेल तर ड्रेसचे ट्रेण्डी कलेक्शन पाहा. (Classy party looks)
3 / 7
हिवाळ्यात वेलवेटचा ड्रेस हा चांगला पर्याय आहे. यामुळे आपला लूक उठून दिसतो.हा रॅप ड्रेस आपल्याला पार्टी लूक देईल. यासोबत स्टेटमेंट इअररिंग्ज आणि हिल्स घाला.
4 / 7
आपल्या साधा पण हटके लूक हवा असेल तर टर्टलनेक स्वेटर ड्रेस निवडा. हिवाळ्यात आपल्याला उबदार आणि स्टायलिश लूक देईल.
5 / 7
पार्टीसाठी सॅटिन ड्रेसची निवड अनेकांची असते. यात आपण लांब बाह्यांचा सॅटिन मिडी ड्रेस घालू शकतो. त्याला शोभतील असे दागिने आणि ब्लॉक हिल्स ट्राय करा.
6 / 7
फॉक्स फर कोट ड्रेस हा आपल्याला रिच लूक देईल. ज्यामुळे पार्टीत आपण सगळ्यांमध्ये उठून दिसू. यावर आपण बूट आणि लांब कोट घालू शकतो.
7 / 7
क्लासी आणि ट्रेंडी शोधत असाल तर पेन्सिल स्कर्टसह ऑफ-शोल्डर स्वेटर घाला. हा आपल्याला बोल्ड आणि आकर्षित लूक देईल. पार्टीसाठी हा उत्तम पर्याय आहे.
टॅग्स : फॅशनमहिला