रेखा ते दीपिका! 'या' ७ हिरोईन्सने केली प्लास्टिक सर्जरी - जुने फोटो पाहून विश्वासच बसणार नाही..!
Updated:December 9, 2025 19:00 IST2025-12-09T19:00:00+5:302025-12-09T19:00:02+5:30
Bollywood actresses plastic surgery: Rekha plastic surgery: Deepika Padukone plastic surgery: पाहूया इंड्रस्टीमधली अशा काही अभिनेत्री ज्यांनी प्लास्टिक सर्जरी केली आहे.

बॉलिवूड हे सगळ्यांसाठी एक चमचमणारे ग्लॅमर वर्ल्ड आहे. रेड कार्पेटवर चमकणाऱ्या हिरोईन्स, त्यांचा लूक, नितळ त्वचा, शार्प फीचर्स आणि सौंदर्य पाहून अनेकांना वाटतं आपणंही त्यांच्या सारखं दिसावं. पण कॅमेऱ्यामागची खरी कहाणी मात्र वेगळीच असते. जगभरात जसा प्लास्टिक सर्जरीचा ट्रेंड वाढला, तसंचे बॉलिवूडमध्ये देखील त्याचे वेध वाढले. (Bollywood actresses plastic surgery)
कॅमेरा, लाईट्स, लाखो चाहत्यांच्या नजरा आणि सोशल मीडियावर टिकून राहिल्यानंतर या बॉलिवूड अभिनेत्रींनी स्वत:कडे लक्ष द्यायला सुरुवात केली. पाहूया इंड्रस्टीमधली अशा काही अभिनेत्री ज्यांनी प्लास्टिक सर्जरी केली आहे.(Rekha plastic surgery)
श्रीदेवीने खूप लहान वयात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिच्या शारीरिक स्वरूपातील सतत बदलांमुळे ती अनेक वादात अडकली होती.असे म्हटलं जातं की तिने त्वचेला उजळवण्याच्या उपचारांव्यतिरिक्त नाकाची शस्त्रक्रिया केली होती.
शिल्पा शेट्टीने तिच्या त्वचेबाबतीत अनेक उपाचारांबद्दल सांगणे टाळले. पण पूर्वीचे काही फोटो आणि आताच्या फोटोनुसार तिच्या चेहऱ्यामध्ये बराच फरक पाहायला मिळतो.
एव्हरग्रीन ब्यूटी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या रेखा किंवा भानुरेखा गणेशन ही एक काळ्या रंगाची, गुबगुबीत किशोरी. जिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. पण कालातंराने त्यांच्या चेहऱ्यामध्ये बराच फरक पाहायला मिळतो. असंही म्हटलं जातं की त्यांनी अनेक ब्यूटी ट्रिटमेंट्स केल्या आहेत.
देसी गर्ल प्रियंका चोप्राने देखील अनेक शस्त्रक्रिया केल्या. तिचा मिस वर्ल्डचा फोटो आणि आताच्या चेहऱ्यामध्ये बरच फरक पाहायला मिळतो.
काजोलच्या गोऱ्या त्वचेमुळे तिच्यात झालेला बदल पाहून सर्वांचे लक्ष वेधले गेले. ९० च्या दशकातील काजोल आणि आताच्या काजोलच्या चेहऱ्यामध्ये बरीच तफावत पाहायला मिळते. तिने देखील अनेक ब्यूटी ट्रिटमेंट्स केल्या आहेत.
दीपिका पदुकोण अनेकदा तिच्या त्वचेच्या रंगामुळे चर्चेत आली आहे. सुरुवातीला सावळी दिसणारी दीपिका अचानक तिच्या रुपामुळे ओळखू लागली. चेहऱ्याची जॉलाईन, स्किन टाईटनिंग आणि subtle बदलावामुळे दीपिकाचा लूक अजून शार्प आणि कॅमेऱ्यासमोर चमकदार दिसतो.