शिल्पा शेट्टी ते सारा अली खान, त्वचा तुकतुकीत चमकदार ठेवण्यासाठी काय करतात?

Published:December 4, 2022 09:19 PM2022-12-04T21:19:47+5:302022-12-04T21:28:08+5:30

Skin Glowing Secrets रोज सकाळी हे पेय पिल्याने तुम्हाला दिवसभर फिट, चेहरा गलो आणि ताजेतवाने ठेवेल..

शिल्पा शेट्टी ते सारा अली खान, त्वचा तुकतुकीत चमकदार ठेवण्यासाठी काय करतात?

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री स्वतःला फिट आणि चेहरा ग्लोइंग ठेवण्यासाठी अनेक उपाय करताना दिसून येतात. त्यांचे डाएट सिक्रेट त्या स्वतःहून कधी - कधी मुलाखतीच्या दरम्यान सांगतात. तुम्हाला देखील या अभिनेत्रींसारखी ग्लोइंग त्वचा हवी असेल, तर रोज सकाळी या शरीराला डिटॉक्स करणाऱ्या पेयांबद्दल माहिती जाणून घ्या.

शिल्पा शेट्टी ते सारा अली खान, त्वचा तुकतुकीत चमकदार ठेवण्यासाठी काय करतात?

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती तिच्या चमकदार त्वचेसाठी दररोज सकाळी काकडीचा ज्यूस पिते. हे पेय आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात.

शिल्पा शेट्टी ते सारा अली खान, त्वचा तुकतुकीत चमकदार ठेवण्यासाठी काय करतात?

अभिनेत्री कियारा अडवाणीने आपल्या ग्लोइंग त्वचेच्या जोरावर अनेकांना घायाळ केलं आहे. ती आपलं डाएट प्रॉपर फॉलो करते. त्वचा तजेलदार दिसण्यासाठी ती एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिते.

शिल्पा शेट्टी ते सारा अली खान, त्वचा तुकतुकीत चमकदार ठेवण्यासाठी काय करतात?

योगा गर्ल शिल्पा शेट्टी आपल्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. ती आपल्या दिनक्रमाची सुरुवात एक ग्लास डिटॉक्सिफायिंग तुळशीच्या पाण्याने करते, ते चयापचय नियंत्रित करते आणि आपल्याला तंदुरुस्त राहण्यास मदत करते.

शिल्पा शेट्टी ते सारा अली खान, त्वचा तुकतुकीत चमकदार ठेवण्यासाठी काय करतात?

अल्पावधीतच लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री क्रिती सॅनन, रोज एक ग्लास पाण्यात लिंबू आणि मध मिसळून पिते. यामुळे चेहऱ्यावर चमक येते, ताजेपणा येतो आणि थंडीच्या दिवसात उबदारपणाही येतो.

शिल्पा शेट्टी ते सारा अली खान, त्वचा तुकतुकीत चमकदार ठेवण्यासाठी काय करतात?

क्यूट गर्ल आलिया भट्ट आपल्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिते. लिंबूमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि व्हिटॅमिन सी चेहऱ्याला पोषक तत्वे देतात.

शिल्पा शेट्टी ते सारा अली खान, त्वचा तुकतुकीत चमकदार ठेवण्यासाठी काय करतात?

चूलबुली अभिनेत्री सारा अली खान तिच्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी, हळद आणि पालकाने बनवलेल्या डिटॉक्स पाण्याने करते. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने रक्त प्रवाह वाढतो, विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि वजन नियंत्रित राहते.